एक्स्प्लोर

Girish Mahajan : खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापले जाणार का? पत्रकारांच्या प्रश्नावर गिरीश महाजन यांचं सूचक उत्तर

Girish Mahajan : खासदार रक्षा खडसे यांचे तिकीट कापले जाणार का असा प्रश्न पत्रकारांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विचारलं. त्यावर महाजन यांनी सूचक उत्तर दिलं.

Girish Mahajan : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची सून म्हणून खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) यांचे तिकीट कापले जाणार का असा प्रश्न पत्रकारांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी विचारलं. त्यावर महाजन यांनी सूचक उत्तर दिलं. "ऐनवेळी काहीही होऊ शकते, आजच काही सांगता येणार नाही," असं गिरीश महाजन म्हणाले. मात्र महाजन यांचं हे उत्तर राजकीय क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.

'भाजपच्या पार्लमेंटरी बोर्डमध्येच उमेदवारांची नावं ठरतात'

"भाजपमध्ये पार्लमेंटरी बोर्ड आहे, तिथूनच सर्व नावं ठरतात. त्यामुळे ऐनवेळी काय होईल हे सांगता येत नाही. मागच्या वेळी तुम्ही पाहिलं असेल की ऐनवेळी तिकिटं कशी बदलतात. स्वर्गीय हरिभाऊ जावळे यांचं तिकीट कसं बदललं हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे आज हे सांगणं कठीण होईल. पार्लमेंट बोर्ड हे सक्षम आहे आणि योग्य वेळी योग्य निर्णय ते घेतं," असं गिरीश महाजन यांनी म्हटलं.

'ऐनवेळी काहीही होऊ शकतं'

दरम्यान रावेर लोकसभा मतदारसंघाच्या जागेबाबत प्रश्न विचारल्यावर पुढे बोलताना मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, रावेर लोकसभा मतदारसंघ हा सुरुवातीपासून भाजपचाच मतदारसंघ राहिलेला आहे. रक्षा खडसे यांनी केलेला दावा योग्यच आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अनेक योजना मतदारसंघात राबवल्या, चांगल्या पद्धतीने काम केलं. मात्र उमेदवारीबाबत भाजपचे निर्मय हे हायकमांड घेत असतं. गेल्या काही वर्षांत पाहिलं तर भाजपचे माजी खासदार स्वर्गीय हरिभाऊ जावळे असतील, आमदार स्मिता वाघ असतील, तसेच खासदार उमेश पाटील ऐनवेळी कशा पद्धतीने या उमेदवारांची तिकिटं कापण्यात आली." "त्यामुळे हा भाजपच्या हायकमांडचा निर्णय आहे. ऐनवेळी काहीही होऊ शकतं, असं म्हणत रक्षा खडसे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

रक्षा खडसे यांचं तिकीट कापणार की पुन्हा उमेदवारी मिळणार?

गिरीश महाजन यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघाच्या प्रतिक्रियेवरुन असं दिसून येत आहे की भाजपमध्ये असताना एकनाथ खडसे यांचं तिकीट कशाप्रकारे कापलं होतं. आता नाव न घेता मंत्री गिरीश महाजन यांनी खासदार रक्षा खडसेंच्या उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत रावेर लोकसभा निवडणुकीत रक्षा खडसे यांचं तिकीट कट होतं का की त्यांना पुन्हा उमेदवारी मिळते, अशा चर्चांना आता उधाण आलं आहे.

हेही वाचा

Jalgaon News: माझ्यामागे ईडी लावली, म्हणून तुझ्यामागे मोक्का लावला; एकनाथ खडसेंचा खळबळजनक गौप्यस्फोट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 8 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 10 October 2024 : 07 PM : ABP MajhaNair Hospital Case : डीनची बदली, विरोधकांची टीका; सुळे, पटोलेंचा हल्लाबोलBadlapur Case : बदलापूर प्रकरणातील सहआरोपी फरार, कोर्टाने सरकारला झापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 ऑक्टोबर 2024 | मंगळवार
Bangkok  : टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
टायर फुटल्याने शाळेच्या बसला आग, 25 विद्यार्थ्यांचा होरपळून मृत्यू; सहलीला जाताना काळाचा घाला
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Embed widget