Jalgaon : भुसावळ तालुक्यात एकाच रात्रीत तिहेरी हत्याकांड, दोन भावांचा खून, एका सराईत गुन्हेगारालाही संपवलं
Bhusawal Crime : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांत एकाच रात्रीच तिघांच्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे.
जळगाव : जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात दोन वेगवेगळ्या घटनांत एकाच रात्रीच तिघांच्या हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. भुसावळ शहरालगत असलेल्या कंडारी गावात पूर्व वैमनस्यातून दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत भुसावळ (Bhusawal City) शहरात श्रीराम नगर भागातील सराईत गुन्हेगार निखिल राजपूतची हत्या करण्यात आली आहे. संपूर्ण घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
भुसावळ शहर (Bhusawal) एकाच रात्रीत झालेल्या तिहेरी हत्याकांडाने हादरले असून दोन सख्या भावांसह एका सराईत गुन्हेगाराची (Crime) हत्या करण्यात आली आहे. रात्री 11 वाजेच्या सुमारास कंडारी परिसरात शांताराम भोलानाथ साळुंखे व राकेश भोलानाथ साळुंखे या दोन सख्ख्या भावांवर अज्ञातांनी चाकूने व तलवारीने वार करत हत्या केली. या घटनेच्या काही तासानंतर श्रीराम परिसरात निखिल राजपूत याची मेव्हण्यानेच गळ्यावर वार करून हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आपल्या बहिणीला सोडून अन्य महीलेसोबत संबंध असल्याच्या संशयावरून निखिल राजपूतची हत्या करण्यात आल्याचं पोलिस तपासात समोर आले आहे. कंडारी येथील दोन भावांची हत्या प्रकरणी पोलिसांनी (Bhusawal Police) तीन जणांना ताब्यात घेतले आहे. तर निखिल राजपूत हत्या प्रकरणी आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
भुसावळ तालुक्यातील कंडारी (Kandari Village) गावातील साळुंखे कुटुंबातील भावंडाचा परिसरातीलच एका कुटुंबाशी वाद आहे. याच वादातून शुक्रवारी रात्री काही जणांनी साळुंखे कुटुंबातील सदस्यांवर सशस्त्र हल्ला केला. चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून शांताराम भोलानाथ साळुंखे व राकेश भोलानाथ साळुंखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हल्ल्यात रमेश अमोल इंगळे व विकी साळुंखे हे गंभीर जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या दोघांवर भुसावळ येथील ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. खुनाच्या दोन्ही घटनांमधील संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिहेरी हत्याकांडाने भुसावळ शहर हादरले आहे.
सराईत गुन्हेगाराचा खून
दरम्यान, पोलिसांच्या रेकॉर्डवरील कुविख्यात गुन्हेगार निखील राजपूतचा अनैतिक संबंधातून शालक नीलेश ठाकूर यानेच चाकूचे सपासप वार करीत खून केला. ही घटना शनिवारी पहाटे दोन वाजता श्रीराम नगरातील पाण्याच्या टाकीवर घडली. निखीलचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. ही बाब त्याचा शालक नीलेश ठाकूरला खटकत होती. शनिवारी रात्री निखील भुसावळात आल्यानंतर पाण्याच्या टाकीवर त्याचे नीलेशशी वाद झाले. नीलेशने निखीलच्या गळ्यावर व मानेवर चाकुचे वार केल्याने त्याचा मृत्यू झाला.
इतर महत्वाची बातमी :