एक्स्प्लोर

Jalgaon News : शरद पवार यांचं प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकणं मोठी चूक, आमदार रोहित पवार यांचा हल्लाबोल 

Jalgaon News : प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर आमदार रोहित यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

जळगाव : 'शरद पवार   (Sharad Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल (Prafull Patel) यांच्यावर विश्वास टाकून मोठी चूक केली. जेव्हा आपली सत्ता आली होती, तेव्हा केंद्रात प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद दिलं होतं. मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी अनेक मंत्रीपदे आपल्याला मिळाली होती. आपल्या सर्वांना मंत्रीपद मिळावे, म्हणून आपल्या पक्षाने त्यावेळी मुख्यमंत्रीपद सोडलं', असे स्पष्टीकरण आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी प्रफुल्ल पटेल यांच्या वक्तव्यावर दिले आहे. 

आमदार रोहित पवार हे जळगाव (Jalgaon) जिल्हा दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी मोठा गौप्यस्फोट केला की, राष्ट्रवादी काँग्रेसने विदर्भाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले नाही ही शोकांतिका आहे. अनेक वर्ष एका जागेवर समाधान, चांगल्या लोकांना संधी मिळाली नाही, असा टोला प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार  (Sharad Pawar) यांना लगावला. यावर रोहित पवार यांनी उत्तर दिले आहे.

रोहित पवार म्हणाले की, शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर विश्वास टाकूनच मोठी चूक केली. जेव्हा आपली सत्ता आली होती, तेव्हा केंद्रात प्रफुल्ल पटेल यांनाच मंत्रिपद दिलं होतं. मुख्यमंत्रीपद मिळालं नसलं तरी अनेक मंत्रीपद आपल्याला मिळाली होती. त्यामुळे प्रत्यक्षपणे आपण कसे चुकलो आहोत, हेच प्रफुल्ल पटेल सांगत आहोत. प्रफुल पटेल भविष्याचे पुस्तक लिहिणार आहेत, त्या पुस्तकात त्यांनी शरद पवार यांनी विश्वास टाकल्यामुळे पार्टीचा फायदा किती झाला आणि नुकसान किती झालं, हे त्यांनी त्या पुस्तकात लिहावं, असा सल्लाही रोहित पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना दिला. 

आमदार रोहित पवार यांनी भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी शरद पवार यांच्यावर मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या आरोपावर उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, आता या विषयावर राजकारण न करता हा प्रश्न कसा सोडवता येईल, यासाठी एकत्रित प्रयत्न केला पाहिजे. शैक्षणिक तसेच ज्या ठिकाणी संधी देता येईल, त्या ठिकाणी शरद पवार यांनी सर्वांना संधी दिली. 2014 मध्ये शरद पवार यांनी कुणबी समाजासाठी घेतलेला निर्णय हा सुद्धा महत्वपूर्ण ठरला. आरक्षणाचा विषय हा संसदेच्या माध्यमातून मार्गी लावता येईल, भाजपने गायकवाड आयोग नेमला, मात्र अधिवेशनात चर्चा कुठलीही केली नाही, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. राजकीय दृष्टिकोनातून बावनकुळे जर आज काहीही बोलले तर त्यांना उत्तर हे आपले शरद पवारच देतील, असेही आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

इंडिया आघाडीला भाजप घाबरले!

आमदार रोहित पवार यांनी इंडिया आघाडीबाबत बोलताना म्हटले की, नरेंद्र मोदी यांना मदत करण्यासाठी मग इतर पक्ष का लागत आहे. लोकांनाच भाजप नकोसे झाले आहे, आणि लोकांना ही नकोसे झाल्यामुळे हे भाजपला समजल्यामुळे भाजप घाबरले आहे. इंडिया आघाडी मजबूत होत आहे. सततच्या बैठकांमुळे भाजप दहशतीत आहे. तत्पूर्वी निवडणुका घेण्याची तयारी सुरू आहे. मुंबईतील बैठक चांगली झाली. पाच समित्याही स्थापन करण्यात आल्या आहेत. या बैठकीत एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. त्याचा परिणाम म्हणजे भाजप घाबरला आहे. त्यामुळे केंद्र सरकार विधानसभा-लोकसभा निवडणुका एकत्र घेण्याबाबत बोलत असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाची बातमी : 

Jalgaon News : पोलीस कुणाशी तरी फोनवर बोलले अन् त्यानंतर आंदोलकांना घेवून जायला सुरवात केली, रोहित पवार काय म्हणाले? 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Bhusawal:भुसावळ-नगरपरिषदेचा महासंग्राम, नराध्यक्षांकडून नागरिकांना अपेक्षा
Mahapalikecha Mahasangram Alibag : निवडणुकीबाबत काय वाटतं अलिबागकरांना? शेकाप पुन्हा सत्ता राखणार?
Mahapalikecha Mahasangram Dharashiv : धाराशीव शहरातील रिक्षा चालकांना निवडणुकीबाबत काय वाटतं?
Anjali Damania PC : 24 तासांत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही तर...
Ekanth Shinde Nagpur : लाडकी बहीण कधी बंद होणार नाही, एकनाथ शिंदे यांचा पुन्हा एकदा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2025 | बुधवार
Imran Khan : इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवा! भेटीवर बंदी अन् बहिणींवर पोलिसांचा लाठीचार्ज, पाकिस्तानात खळबळ
इम्रान खान कुठे आहेत? तुरुंगातच मृत्यू झाल्याच्या अफवा, पाकिस्तानमध्ये खळबळ, कुटुंबीयांना भेट घेण्यापासून अडवलं
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
मोठी बातमी! न्यायालयाने उज्ज्वला थिटेंचा अपील अर्ज फेटाळला; अनगर नगराध्यक्षपदाची निवड बिनविरोधच
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
अनेकजण आमच्या संपर्कात, गेलेले लोक परत येतील, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्याचं मोठं वक्तव्य 
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
मुंबईतील इमारतीत आग, घर जळून खाक; अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी
Meerut Crime News: मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
मेरठमधील सौरभ हत्याकांडातील आरोपी पत्नी मुस्कान झाली आई, मुलीला दिला जन्म, सासरच्यांनी केली डीएनए चाचणीची मागणी
IIT Mumbai : आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
अजित पवारांसाठी आधी लगीन नगरपालिकेचं; बारामतीत युगेंद्र अन् जय पवारांच्या लग्नाची घाई; कुठं अन् कधी?
Embed widget