एक्स्प्लोर

Jalgaon Bus Accident : वळणावर चालकाचा ताबा सुटला, बस रस्त्याच्या कडेला उलटली, दोन प्रवाशांचा मृत्यू; अन्य प्रवाशी किरकोळ जखमी 

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील एरंडोल (Erandol) तालुक्यात खासगी बस दुभाजकाला धडकून बस (Bus accident) उलटली आहे.

जळगाव : जळगावमधून (Jalgaon) अपघातासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील एरंडोल (Erandol) तालुक्यात खासगी बसला भीषण अपघात झाला असून दुभाजकाला धडकून बस (Bus accident) उलटली आहे. यात दोन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून अनेक प्रवाशी जखमी झाल्याचे समजते आहे. तर जखमींवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहेत. 

नाशिक जिल्ह्यासह (Nashik) विभागात सातत्याने अपघाताच्या घटना समोर येत असून विभागासाठी चिंताजनक बाब असल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वीच मागील काही महिन्यातील आकडेवारी बघता रोज होणाऱ्या अपघातांमध्ये नाशिक (Nashik accident) जिल्हा आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर विभागाच्या इतरही जिल्ह्यात वारंवार अपघात होत आहेत. अशातच जळगाव जिल्ह्यात एरंडोल तालुक्यात पिंपळ कोठा गावाजवळ मुंबई-नागपूर (Mumbai Nagpur Highway) महामार्गावर तासाभरापूर्वी एक खासगी बस दुभाजकावर आदळून उलटल्याची घटना घडली आहे. या घटनेत चार प्रवासी गंभीर जखमी झाले होते, यातील दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एरंडोल ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दरम्यान जळगाव (Jalgaon Rain) जिल्ह्यात सध्या पावसाची संततधार सुरूच असून यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत, त्यामुळे वारंवार अपघाताच्या घटना समोर येत आहेत. यात दुचाकी अपघात अधिक होत आहेत. दरम्यान आज सकाळी नऊ वाजेच्या दरम्यान एरंडोल तालुक्यातील पिंपळकोठा गावाजवळ बसला अपघात झाला. हा मुंबई नागपूर मार्ग असून नेहमीच वाहनांची वर्दळ असते. आज सकाळी या मार्गावरून बस जात असताना चालकाला वळण रस्त्याचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला असल्याचं सांगितल जात आहे. यावेळी बस दुभाजकावर आदळून थेट पुलावरून खाली कोसळली. यात चार प्रवाशी गंभीर जखमी झाल्याने त्यांना पोलिस आणि स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रुग्णालयात दखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु असताना दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर अन्य काही प्रवाशी किरकोळ जखमी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांकडून या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. 

काही दिवसांपूर्वी बसला अपघात 

दरम्यान जळगाव जिल्ह्यातील जळगाव-धरणगाव महामार्गावर बस अपघाताची घटना घडली होती. यात रात्रीच्या सुमारास एका हॉटेलजवळ बस उलटून 24 जण जखमी झाले होते. अकोला येथून खासगी बस अहमदाबादकडे जात होती. रात्रीच्या सुमारास प्रवास सुरु असताना बस पाळधी गावाजवळ आली असता बस अचानक रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातात 24 जण जखमी झाले होते. दरम्यान जळगाव जिल्ह्यातही अपघाताचे प्रमाण अधिक असून यात अतिवेग वाहनधारकांची जीवावर बेतत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Jalgaon Bus Accident : जळगावात बस दुभाजकावर आदळून पलटली, चार प्रवासी गंभीर जखमी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Deshmukh On Walmik Karad : गरज भासल्यास वाल्मीक कराडांची आम्ही प्रत्यक्षात भेट घेऊ- देशमुखNagpur Crime News : चिंताजनक! मानसोपचार तज्ज्ञाकडून शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषणWalmik Karad Flat In Pimpari : पिंपरी-चिंचवडमध्ये वाल्मिक कराडचा उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅटSuresh Dhas PC : कराडांसोबत पोलिसांच्या गाडीत बसलेला रोहित कोण? धसांनी सर्व सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik News: नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
नाशिकमध्ये काँग्रेसला मोठा झटका! महापालिका निवडणुकीपूर्वी बडा मोहरा साथ सोडणार, पोस्ट शेअर करत भावना केल्या व्यक्त
अमित शाहांना अरुण जेटलींच्या कार्यालयाबाहेर बसलेलं पाहिलंय, संजय राऊत म्हणाले...काही गोष्टी सांगायच्या नसतात...
अमित शाह त्यावेळी गुजरातचे बरखास्त गृहराज्यमंत्री होते, खटला दाखल होता तेव्हा अनेकांचे दरवाजे... संजय राऊत
Beed News: परळीनंतर केजमध्ये वातावरण तापलं, वकील पोलिसांवर संतापले, म्हणाले, 'वातावरण वेगळं होईल'
वाल्मिक कराडला मकोका, बीड जिल्ह्यात अशांततेचा वणवा पसरला, केज कोर्टात पोलीस-वकिलांमध्ये बाचाबाची
Buldhana : खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
खळबळजनक! समर्थांनी स्थापन केलेल्या वारी हनुमान मंदिरात धाडसी दरोडा; पुजाऱ्याला बांधून मूर्तीवरील आभूषणे लुटली
Arvind Kejriwal : दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
दिल्लीच्या भर निवडणुकीत माजी सीएम अरविंद केजरीवालांवर खटला भरण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाची ईडीला परवानगी
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
चिंताजनक! वर्ध्यात जलस्रोतांमध्ये घातक नायट्रेट रसायन, गर्भवतींसह लहान मुलांना धोका, 7 गावं डेंजर झोनमध्ये
New Congress Headquarter : तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
तब्बल 46 वर्षांनी पत्ता बदलत असलेल्या चाचपडणाऱ्या काँग्रेसला 'इंदिरा' प्रेरणा देणार? 252 कोटींचा खर्च, भाजप मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर, काँग्रेसचं मुख्यालय आहे तरी कसं?
Stock Market : जिओ फायनान्शिअल अन् झोमॅटोबाबत मोठी बातमी, निफ्टी 50 मध्ये एंट्री होणार, शेअर बाजारात काय स्थिती?
झोमॅटो अन् जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची निफ्टी 50 एंट्री होणार, कोणते दोन शेअर बाहेर जाणार?
Embed widget