एक्स्प्लोर

Nashik Car Accident : गुजरातचं मित्रमंडळ इगतपुरीला फिरायला आलं, मात्र परतताना ओव्हरटेक करणं नडलं, भीषण अपघातात चौघांचा मृत्यू 

Nashik News : इगतपुरीला फिरून झाल्यानंतर घरी परतत असताना पेठ तालुक्यातील करंजाळी गावाजवळ कारला भीषण अपघात झाला.

नाशिक : नाशिकसह जिल्ह्यात अपघातांची (Accident) मालिका सुरूच असून ग्रामीण भागात अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. तसेच नाशिक पेठ मार्गावर देखील वाढती वाहतूक अपघातांना निमंत्रण देत असते. त्यामुळे सातत्याने या मार्गावर अपघात होत आहे. या महामार्गावर शुक्रवारी करंजाळीजवळ बस आणि कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जणांना नाशिक (Nashik) जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचार सुरु असताना मृत्यू झाला आहे. 

गेल्या काही दिवसांतील अपघाताच्या घटना बघता नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाहनांचा वेग सुसाट असल्याचे दिसते. तसेच नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. या महामार्गावर शुक्रवारी करंजाळीजवळ (Karanjali) बस आणि कारच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले होते, त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. हे चौघेही गुजरातहून नाशिकच्या इगतपुरी (Igatpuri) परिसरात फिरण्यासाठी आले होते. घरी परतत असताना पेठ जवळील करंजाळी गावाजवळ एसटीची समोरासमोर धडक झाली. यात चौघांचाही मृत्यू झाला. 

पेठ-धरमपूर (Peth Dharampur Highway) राष्ट्रीय महामार्ग क्र. 848 वर करंजाळी जवळील वळणावर हा अपघात (Accident) झाला. एसटी महामंडळाची ही बस पेठ आगाराची आहे. ही बस पेठ येथून पुण्याला जात होती. तर सनी कार ही नाशिकहून गुजरातकडे जात होती. करंजाळी गावाजवळ आले असता एका वळणावर ओव्हरटेक करण्याच्या नादात डिव्हायडर ओलांडून कार दुसऱ्या लेनमधील एसटी बसला (ST Bus And car accident) धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात कारचे मोठे नुकसान झाले आहे. यात पाठीमागील बाजूस असलेल्या दोन जणांचा जागेवरच मृत्यू झाला. तर अन्य दोन जण गंभीर झाले होते, त्यांना तातडीने अॅम्ब्युलन्सद्वारे नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  किसन छगनभाई वाघासिया, रवीभाई प्रवीणभाई दोबारिया, जयदीप लभभाई गोयानी, जयनीश मुकेशभाई सुतारिया अशी मयत झालेल्या नावे आहेत. 

नेमका अपघात कसा झाला? 

गुजरात राज्यातील बलसाड येथील चौघे मित्र हे कारने नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीला फिरायला गेले होते. त्यानंतर ते पुन्हा बलसाडकडे पेठ धर्मपुरी मार्गाने निघाले होते. मात्र वाटेत करंजाळी गावाजवळ एका वळणावर ओव्हरटेक करत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कार थेट दुसऱ्या लेनमधून जात असलेल्या एसटी बसला धडकली. समोरासमोर धडक बसल्याने भीषण अपघात झाला. यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने नाशिक सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या अपघातात बसमधील काही प्रवाशीही किरकोळ जखमी झाले. 

इतर महत्वाची बातमी : 

Nashik News : रात्रीची वेळ, ओव्हर स्पिडिंग जीवावर बेतणारं! नाशिक जिल्ह्यात सात महिन्यात 914 अपघात, 578 जणांचा मृत्यू 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Job Majha : नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, अटी काय?Maratha Samaj on Walmik Karad | वाल्मीक कराडची नार्को टेस्ट करा, नांदेड मधील मराठा समाजाची मागणीSantosh Deshmukh Muder Case | संतोष देशमुखांची हत्या नेमकी कशी केली? आरोपींनी सांगितली माहितीManoj Jarange Speech Dharashiv| धनंजय मुंडे टोळी थांबेव, माझ्या नादी लागू नको, जरांगेंचा कडक इशारा

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
दोन वर्षांत 60 जणांचा लैंगिक अत्याचार, कोच, क्लासमेट अन् शेजारी सुद्धा कृत्यात सहभागी; अल्पवयीन तरुण दलित खेळाडूच्या दाव्याने थरकाप
Suresh Dhas : अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
अजितदादा, सुनेत्राताईंच्या गावातून बोलतोय, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा; सुरेश धसांनी नव्या मंत्र्यांचं नावंही सुचवलं!
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
10 लाख डालो 5 कोट मिळवो! बीड महोत्सवात सरकारच्या तिजोरीवर डल्ला, सुरेश धसांचा वाल्मिक कराडवर प्रहार 
Embed widget