(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आम्ही एका बापाची औलाद, भाजपा काम करो अथवा ना करो, आम्ही इमानदारीने लोकसभेचे काम करणार : गुलाबराव पाटील
Gulabrao Patil : आम्ही एका बापाची औलाद आहोत. हे भाजपा काम करो अथवा ना करो, आम्ही इमानदारीने लोकसभेचे काम करणार आहोत, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
Gulabrao Patil : जळगाव लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Lok Sabha Constituency) भारतीय जनता पक्षाकडून (BJP) स्मिता वाघ (Smita Wagh) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून करण पवार (Karan Pawar) निवडणुकीच्या रिंगणात आहे. स्मिता वाघ यांच्या प्रचारार्थ जळगावमध्ये (Jalgaon News) महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी तुफान फटकेबाजी केली आहे.
भाजपला शिवसेना शिंदे गट लोकसभेसाठी मदत करेल. मात्र विधानसभेत भाजप शिवसेना शिंदे गटाला मदत करेल का? अशी शंका काही कार्यकर्त्यांच्या मनात असल्याची चर्चा जळगावात रंगली होती. या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील यांनी भाजपबाबत कार्यकर्त्यांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.
आम्ही इमानदारीने लोकसभेचे काम करणार
गुलाबराव पाटील म्हणाले की, शिंदेंच्या सेनेचे आमदार सांगतात की, लोकसभेत भाजपचे काम केले तरी ते विधानसभेत मदत करतील का? मात्र आम्ही एका बापाची औलाद आहोत. हे भाजपा काम करो अथवा ना करो, आम्ही इमानदारीने लोकसभेचे काम करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.
आमचं काम हे आग विझविणाऱ्या चिमणीसारखे
ते पुढे म्हणाले की, आगे जो होगा वो हमारा नसीब, आमचं काम हे आग विझविणाऱ्या चिमणीसारखे आहे. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा लहरायचा आहे. आम्ही गद्दारी हा विषय आयुष्यात करू शकत नाही. जे करायचे होते ते शिंदे साहेबांच्या सोबत जाऊन आम्ही उद्धव साहेबांना करून दाखवले आहे. त्यामुळे मी आपल्याला खात्री देत आहे की, इथे जितके शिवसैनिक आणि भाजपचे कार्यकर्ते बसले आहेत त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नका. आपण हे साप बनवले आहेत, ते एक दिवस तुम्हाला चावल्याशिवाय राहणार नाहीत.
बेईमानो के लिये जहर है मोदी
केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो. मोदीजींनी काही कारवाया केल्या तर विरोधक सांगतात की हे ईडीचे सरकार आहे. इमानदारो के लिये लहर है मोदी, बेईमानो के लिये जहर है मोदी, देश के गद्दारो के लिये जहर है मोदी, अशी शेरो शायरी करत गुलाबराव पाटलांनी विरोधकांना डिवचले आहे. आपल्या देशाच्या इतिहासात पहिल्यांदा अशी वेळ आली आहे की, पाकिस्तानला सुद्धा साधा फटका फुटला की सांगावे लागते की यात आमचा हात नाहीये. मोदीजी एकमेव नेते आहेत की ज्यांना पाकिस्तान घाबरला आहे, अशी तुफान फटकेबाजी त्यांनी केली आहे.
आणखी वाचा