एक्स्प्लोर

Gulabrao Patil : बेटा फिर से अॅक्सिडेंट हो जाएगा, निवडणुकीत पडल्यावर मी सुधारलो : गुलाबराव पाटील 

निवडणुकीत पडल्यावर लक्षात आलं की हायवेला स्पीडब्रेकर का असतात. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडी बरोबर चालवतो, अशा कोट्याही गुलाबरावांनी केल्या. निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव आहे, असं गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) म्हणाले. 

जळगाव : "बेटा ठीक से चल नही तो फिर से एक्सीडेंट हो जाएगा" असं म्हणत निवडणुकीत पडल्यावर मी पण सुधारलो अशी कबुली राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी दिली. ते जळगावात (Jalgaon) बोलत होते. निवडणुकीत पडल्यावर लक्षात आलं की हायवेला स्पीडब्रेकर का असतात. ब्रेकर आल्यानंतर माणूस गाडी बरोबर चालवतो, अशा कोट्याही गुलाबरावांनी केल्या. निवडणुकीत जिंकून येण्याचाच अनुभव नाही तर पडण्याचाही अनुभव आहे, असं गुलाबराव पाटील म्हणाले. 

तो आयुष्यातील दु:खाचा दिवस

सेनेत मंत्री असताना दुर्गम भागात पाण्याच्या योजना आम्ही सुरू केल्या. लोकांना पाणी मिळू लागले आणि त्यांचा आम्हाला मिळू लागलेला प्रतिसाद हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा क्षण राहिला आहे. दुसरीकडे शिवसेनेत ज्यावेळी हा प्रकार घडला आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) साहेबांनी आम्ही सांगितलेले ऐकले नाही, त्यामुळे पक्ष वाचविण्यासाठी आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. हा आपल्या आयुष्यातील दुःखाचा दिवस असल्याची प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. 

आता भाऊ नाही, पाणीवाला बाबा व्हायचंय

मला आता भाऊ राहायचं नाही तर पाणीवाला बाबा व्हायचं आहे. सरकारने  जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणी पुरवठा करण्याचे  जे उद्दिष्ट ठेवले आहे,  ते पूर्ण करण्याचा आणि बाळासाहेबांची शिवसेना गावा-गावापर्यंत पोहोचवून भगवामय जिल्हा करण्याचा माझा नवीन वर्षाचा संकल्प आहे, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हणाले. 

संभाजीराजे धर्मवीर आहेत, धर्मवीर राहतील

संभाजीराजे हे आमच्यासाठी धर्मवीर आहेत आणि धर्मवीर राहणार आहे. त्यांना कमी लेखणे चुकीचे आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी त्यांच्याबाबत असं बोलणं उचित नाही. संभाजीराजे यांनी धर्मासाठी काय नाही केले? त्यांचे डोळे काढले गेले, त्यांचा किती छळ करण्यात आला,तरी त्यांनी आपला धर्म सोडला नाही,ते धर्मवीर आहेत आणि धर्मवीरच राहणार असल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. 

एकनाथ खडसेंना टोला

अधिवेशनात केवळ आरोप प्रत्यारोप झाले, प्रश्न सुटले नाहीत असा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. त्याला गुलाबरावांनी उत्तर दिलं. खडसे यांचा बोदवडचा प्रश्न सुटला आहे, त्यांच्याकडे आता प्रश्नच राहिले नाहीत, ते तर काम करण्याचे महामेरू आहेत असा खोचक टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.  

देशमुख-संजय राऊतांच्या जामीनावर भाष्य

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कारवाई म्हणजे सत्तेचा दुरुपयोग असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावर गुलाबराव पाटील म्हणाले, कोणत्याही प्रकारची कारवाई ही लोकप्रतिनिधी करीत नसतात, तर त्यासाठी यंत्रणा काम करत असते. जामीनही कोर्ट देत असते त्यामुळे शरद पवार यांचे म्हणणे उचित नाही. त्यामुळे यामध्ये विनाकारण राजकरण करू नये अशी आपली नम्र विनंती आहे, असं गुलाबरावांनी सांगितलं.  

Video :  गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया 

संबंधित बातमी

Gulabrao Patil : आपलं बाळू आणि दुसऱ्याच काळू असं कसं चालेल? Eknath Khadse यांना टोला

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

RBI repo rate October 2025: आरबीआयकडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात बदल नाहीच; कर्जे महागणार नाहीत, EMI ही वाढणार नाही
आरबीआयकडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात बदल नाहीच; कर्जे महागणार नाहीत, EMI ही वाढणार नाही
Uttarakhand landslide risk 2025: उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Udaypur Leopard : घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेनं चक्क दोरीने बांधले
Nashikkar Help Nanded | नांदेड पूरग्रस्तांसाठी नाशिककर मदतीला धावले, 900 किटची मदत
Anil Deshmukh Fake Attack | पोलिसांच्या तपासात 'हल्ला' खोटा, B Final Report कोर्टात सादर
Dr. Hedgewar Bharatratn | डॉ. हेडगेवार यांना 'भारतरत्न' देण्याची राष्ट्रपतींकडे मागणी
Navratri Rain Impact | भाविकांची संख्या घटली, तुळजापुरात व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI repo rate October 2025: आरबीआयकडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात बदल नाहीच; कर्जे महागणार नाहीत, EMI ही वाढणार नाही
आरबीआयकडून सलग दुसऱ्यांदा रेपो दरात बदल नाहीच; कर्जे महागणार नाहीत, EMI ही वाढणार नाही
Uttarakhand landslide risk 2025: उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
उत्तराखंडच्या पर्वतरांगा धोक्याच्या खाईत! संपूर्ण राज्य भूस्खलनाच्या धोक्यात, केदारनाथचा प्रवास देखील अत्यंत धोकादायक, तब्बल 51 डेंजर झोन
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
आजपासून रेल्वे तिकिटापासून ऑनलाइन पेमेन्टपर्यंत होणार 'हे' मोठे बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर होणार परिणाम
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल
पूरग्रस्त शेतकऱ्यांचा भार ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर! FRP चे तुकडे, एकरी 10 ते 12 टन उत्पादन घटलं असतानाच 15 रुपयांची कपात; असली 'दलाली' बंद करा, राजू शेट्टींचा हल्लाबोल
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळवण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम, पती आणि वडिलांचे ई-केवायसी बंधनकारक
Crime News: मिरारोडमध्ये गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर अंडं फेकलं, पोलिसांच्यादेखत जोरदार राडा, नागरिक संतप्त
मिरारोडमध्ये गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर अंडं फेकलं, पोलिसांच्यादेखत जोरदार राडा, नागरिक संतप्त
Philippines Earthquake: फिलीपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा; मृतांची संख्या 26 वर, 147हून अधिक नागरिक जखमी, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
फिलीपाईन्समध्ये 6.9 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपाचा हादरा; 26 नागरिकांचा मृत्यू, तर 147हून अधिक जखमी, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
Mhada Lottery homes: मोठी बातमी: म्हाडा लॉटरीतील घर पाच वर्ष न विकण्याची अट काढून टाकली जाणार, फ्लॅट लगेच विकता येणार?
म्हाडाच्या घरांबाबत मोठ्या निर्णयाची शक्यता, फ्लॅट पाच वर्ष न विकण्याची अट काढून टाकली जाणार?
Embed widget