एक्स्प्लोर

Erandol Vidhan Sabha Result 2024: एरंडोलमध्ये महायुतीच्या 'पाटलांची' जादू कायम! मविआच्या पदरी निराशा, चुरशीची लढत,

Erandol Vidhan Sabha Constituency: एरंडोल जागेवर प्रदीर्घ काळापासून 'पाटील' आडनावाचेच वर्चस्व आहे. कोणत्या पाटलांनी उधळला विजयाचा गुलाल? जाणून घ्या..

Erandol Vidhan Sabha Constituency : ज्या निवडणुकीची सर्वात जास्त चर्चा सुरूय. ती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 निकालाची (Maharashtra Assembly Election 2024)  हवा सध्या पाहायला मिळत आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात निवडणुकीचे वारे वाहताना दिसले. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल विधानसभा मतदारसंघाची (Erandol Vidhan Sabha Constituency) राज्यात सर्वाधिक चर्चा आहे.  महाराष्ट्रातील एरंडोल विधानसभा मतदारसंघ हा राज्यातील 288 विधानसभा जागांपैकी 16 व्या क्रमांकावर आहे. या मतदारसंघातून महायुतीचे अमोल पाटील विजयी ठरले असून, त्यांच्या विरुद्ध मविआचे डॉ सतीश पाटील, हर्षल माने, डॉ. संभाजी पाटील, एटी नाना पाटील, अमित पाटील यांच्यात बहुरंगी लढत पाहायला मिळाली. यंदाची निवडणूक अत्यंत रंजक ठरली.

एरंडोल विधानसभा मतदारसंघात पुन्हा पाटलांचीच जादू चालणार का?

एरंडोल विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडून अमोल चिमणराव पाटील (Amol Patil) यांच्याविरुद्ध महाविकास आघाडी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (शरदचंद्र पवार) डॉ सतीश पाटील (Satish Patil) रिंगणात होते. तर या निवडणुकीत शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख हर्षल माने (Harshal Mane), राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ. संभाजी पाटील (Sambhaji Patil), भाजपाचे माजी खासदार ए टी पाटील (A T Patil) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अमित पाटील (Amit Patil) हे अपक्ष म्हणून लढले. एरंडोल जागेवर प्रदीर्घ काळापासून पाटील आडनावाचेच वर्चस्व आहे. यापूर्वी ही जागा राष्ट्रवादीचे अण्णासाहेब डॉ. सतीश भास्करराव पाटील यांच्याकडे होती. त्यांच्या आधीही ही जागा शिवसेनेच्या गुलाब रघुनाथ पाटील यांच्याकडे होती. गुलाब रघुनाथ पाटील यांनी 1999 आणि 2004 मध्ये ही जागा जिंकली होती.

2019 च्या निवडणुकीत काय झाले?

2019 च्या विधानसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर, निवडणुकीत शिवसेनेचे चिमणराव पाटील यांनी एरंडोल मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यांच्यासमोर राष्ट्रवादीचे अण्णासाहेब डॉ.सतीश भास्करराव पाटील हे रिंगणात होते. या निवडणुकीत चिमणरावांना एकूण 82650 मते मिळाली तर त्यांचे निकटवर्तीय डॉ.सतीश यांना 64648 मते मिळाली होती. याशिवाय अपक्ष उमेदवार शिरोळे गोविंद एकनाथ तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांना या निवडणुकीत 24587 मते मिळाली. शिवसेनेचे चिमणराव पाटील यांनी राष्ट्रवादीचे डॉ. सतीश यांचा 18002 मतांनी पराभव केला होता.

मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?

महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections  वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/  या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.

हेही वाचा>

Pachora Vidhan Sabha Constituency: पाचोऱ्यात भाऊ-बहिणीपैंकी जनतेला कौल कोणाला मिळणार? चौरंगी लढत ठरणार चुरशीची! कोण उधळणार विजयाचा गुलाल?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार

व्हिडीओ

Eknath Shinde Brother : साताऱ्यातील सावरी गावात शिंदेंच्या भावाच्या रिसॉर्टजवळ ड्रग्स सापडलं- अंधारे
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, आमदारकी जाणार? वकील काय म्हणाले?
Sana Malik On Ajit Pawar : आम्ही अजितदादाना अहवाल सादर करणार, वरिष्ठांचा आदेश आल्यावर पुढे जाऊ - सना मलिक
Sanjay Raut PC : शिंदेंची शिवसेना ही अमित शाहांची टेस्ट ट्यूब बेबी, संजय राऊत यांचा घणाघात
Shivsena And BJP Seat Sharing : युतीचा बोलबाला, कधी ठरणार फॉर्म्युला? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Crime News: आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
आई होण्यासाठी मला मदत करा अन् 25 लाख मिळवा; सायबर चोरट्यांकडून प्रेग्नन्सी मेसेजचा फ्रॉड, तुम्हीही सावधान !
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
अजित पवारांचा आणखी एक आमदार अडचणीत, पोलिसांनी शिवीगाळ भोवली; कारेमोरेंना कोर्टाकडून 2 वर्षांची तंबी
Share Market Update : शेअर बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 1.6 लाख कोटी स्वाहा
सेन्सेक्स- निफ्टीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण, भारतीय गुंतवणूकदारांचे 1.6 लाख कोटी बुडाले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 डिसेंबर 2025 | बुधवार
IPL Auction 2026: आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
आयपीएल लिलावात या 6 ऑस्ट्रेलियन खेळाडूंवर 45.70 कोटी अन् 5 अनकॅप्ड भारतीय खेळाडूंवर 45 कोटींची उधळण!
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
मोठी बातमी! झेडपी, पंचायत समितीच्या निवडणुकांबाबत महत्वाचं, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 2 निर्णय
Bajrang Sonawane : दोन गोष्टी पक्क्या, वाल्मिक कराडला जामीन अन् धनंजय मुंडे यांना मंत्रिपद मिळणार नाही, बजरंग सोनवणेंचा टोला
धनंजय मुंडे महाराष्ट्राच्या, दिल्लीच्या मंत्रिमंडळात दिसणार नाहीत, त्यांनी मंत्रिपदासाठी अमेरिकेला जावं : बजरंग सोनवणे
Ajit Pawar: अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
अजितदादांनी भाजप शिवसेनेच्या विरोधाला दाखवला कात्रजचा घाट! मुंबई मनपा निवडणुकीची कमान नवाब मलिकांच्याच खांद्यावर
Embed widget