Pachora Vidhan Sabha Result 2024: पाचोऱ्यात भाऊ-बहिणीच्या लढतीत महायुतीला मिळाला जनतेला कौल! चौरंगी लढत ठरली चुरशीची
Pachora Vidhan Sabha Constituency: पाचोरा विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर, येथे शिवसेनेचे अनेक काळापासून वर्चस्व आहे.

Pachora Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Election 2024) सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक मतदारसंघात कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष होतं. पाचोरा विधानसभा मतदारसंघाची (Pachora Vidhan Sabha Constituency) राज्यात सर्वाधिक चर्चा आहे. या मतदारसंघातून महायुतीचे किशोर पाटील विजयी झाले आहेत, तर वैशाली सूर्यवंशी, दिलीप वाघ, अमोल शिंदे यांना पराभवाचा सामना पाहायला मिळाला, या मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळाली.
चौरंगी लढत ठरणार चुरशीची! जनता कोणाला देणार कौल?
पाचोरा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांच्या विरुद्ध त्यांच्या भगिनी शिवसेना (उबाठा) वैशाली सूर्यवंशी, (Vaishali Suryavanshi) बंडखोर दिलीप वाघ (Dilip Wagh), अमोल शिंदे (Amol shinde) यांच्यात चौरंगी लढत पाहायला मिळाली, पाचोरा विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर, येथे शिवसेनेचे अनेक काळापासून वर्चस्व आहे. 1999 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने ही जागा दोनदा जिंकली, त्यानंतर 2009 मध्ये राष्ट्रवादीचे दिलीप वाघ यांनी ही जागा शिवसेनेकडून हिसकावून घेतली. नंतर, शिवसेनेचे एसएचएसचे किशोर आप्पा पाटील यांनी पुन्हा ही विधानसभा राष्ट्रवादीकडून हिसकावून घेतली आणि सलग दोनदा जिंकली. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष प्रत्येकी दोन पर्यायांसह राजकीय मैदानात उतरले होते. दोघेही राज्यातील ताकदवान पक्ष असून दोघांचीही फाटाफूट झाल्यानं जनता कोणाला कौल देणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
2019 च्या निवडणुकीत तिरंगी लढत, शिवसेना गड राखणार का?
2019 च्या पाचोरा विधानसभा निवडणुकीबाबत बोलायचे झाले तर, किशोर पाटील यांनी आपली जागा वाचवण्यासाठी शिवसेनेच्या तिकिटावर दुसऱ्यांदा निवडणूक लढवली होती. दिलीप वाघ यांनी राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. ही निवडणूकही अपक्ष उमेदवारामुळे तिरंगी झाली. यामध्ये अनमोल पंडितराव शिंदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर शिवसेनेचे किशोर आप्पा पाटील यांना एकूण 75699 मते मिळाली, तर अपक्ष अनमोल शिंदे यांना 73615 मते मिळाली. राष्ट्रवादीचे दिलीप यांच्याबद्दल बोलायचे झाले तर त्यांना अवघ्या 44961 मतांवर समाधान मानावे लागले. अपक्ष उमेदवार अनमोल यांनी शिवसेनेच्या किशोर यांना कडवी झुंज दिली मात्र किशोर पाटील विजयी झाले.
मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?
महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/ या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि निकालाचे अपडेट पाहू शकता.
Amalner Vidhan Sabha Constituency: अमळनेरमध्ये महायुतीचे अनिल पाटील गड राखणार की भाजप ठरणार सरस ? कोण उधळणार विजयाचा गुलाल?




















