एक्स्प्लोर

Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसे भाजपमध्ये जाणार? दिल्लीवारीत भाजपच्या कोणत्या नेत्यांशी चर्चा? स्वत: सविस्तर सांगितलं!

काही कामांसाठी मी दिल्लीला गेलो होतो, माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे खडसे म्हणाले. असा काही निर्णय व्हायचा असेल, तर तो विचार करून घ्यायचा असतो, असे त्यांनी सांगितले.

Eknath Khadse on BJP : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परत असल्याच्या चर्चांनी चांगलाच वेग घेतला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता एकनाथ खडसे यांनीच भाजपमधील प्रवेशातील चर्चांना पूर्णविराम देताना या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे म्हटले आहे. एकनाथ खडसे यांनी दिल्लीमध्ये वैयक्तिक कामासाठी गेलो असल्याचे सांगितलं. यावेळी बोलताना खडसे म्हणाले की आपण भाजपमध्ये जात असल्याच्या चर्चेमध्ये काहीही तथ्य नाही. 

माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही

काही कामांसाठी मी दिल्लीला गेलो होतो, माध्यमांमध्ये येणाऱ्या बातम्यांमध्ये काही तथ्य नसल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले की असा काही निर्णय व्हायचा असेल, तर तो विचार करून घ्यायचा असतो. कार्यकर्त्यांशी, पक्षाशी, नेत्यांशी बोलून घ्यायचा असतो. कारण अतिशय महत्त्वाचा निर्णय राहणार आहे. ज्यावेळी असा निर्णय घ्यायचा त्यावेळी आपण स्वतःहून माध्यमांना माहिती देईन असेही त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, अशा कोणत्याही हालचाली नसल्याचे खडसे यांनी स्पष्ट केले. 

तर मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही 

त्यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये गेल्यानंतर अनेक नेत्यांशी भेटीगाठी होत असतात. मात्र, काल अशा काही भेटीगाठी झाल्या नाहीत. भाजपमध्ये येण्यासाठी खडसे प्रयत्नशील असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आता खडसे यांनी त्याला उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की मला, भाजपमध्ये येण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. भाजपमध्ये यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर नरेंद्र मोदी अमित शहा यांच्यासोबत माझे संबंध उत्तम राहिले असून आताही चांगले संबंध राहिले आहेत. त्यामुळे मला भाजपमध्ये यायचं असेल तर मला इतरांना विचारण्याची आवश्यकता नाही. 

खडसे यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केल्यास ते बूथप्रमुखाला ज्युनियर असणार असल्याचं मंगेश चव्हाण यांनी यांनी काल म्हटलं होते. त्यावर खडसे यांनी उत्तर दिलं आहे. प्रत्येकाला उत्तर देण्याची आवश्यकता मला वाटतं नसल्याचे ते म्हणाले. 

महाविकास आघाडीचा रावेर मतदारसंघाचा उमेदवार उद्यापर्यंत जाहीर होईल, असेही खडसे म्हणाले. खा. उन्मेष पाटील यांना तिकीट मिळाले नसल्याने ते नाराज असल्याचं सांगितले जात आहे आणि त्यातूनच ते शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं सागितले जात आहेत. मात्र, त्यांनी कोणत्या पक्षात जावं हा त्यांचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. त्यांनी खासदार म्हणून चांगल काम केलं असताना तिकीट कापले गेल्याने त्यांची नाराजी असल्याचे ते म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Cabinate | मंत्रिमंडळ विस्तार पण खातेवाटप का रखडलं? Special ReportZero Hour Guest Center :गुन्हेगारी घटनांचं राजकारण कोण करतंय?Anjali Damania झीरो अवरमध्येZero Hour : मुंबई, परिसरात मराठी माणूस सुरक्षित नाही? कल्याणमधील घटनेचे हिवाळी अधिवेशनात पडसादSanjay Raut Home Reki | संजय राऊतांच्या घराबाहेर रेकी, कारण काय? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tamhini Ghat Bus Accident : ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
ताम्हिणी घाटातील खासगी बसच्या अपघातातील मृतांना 5 लाखांची मदत मिळणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
काँग्रेस माफी मांगो, अशोक चव्हाणांचा फोटो शेअर करत आमदार जितेंद्र आव्हाडांकडून टोला
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार, पालघरमधील धक्कादायक प्रकार
बसची वाट पाहात असलेल्या मुलीला घरी सोडण्याचे अमिष दाखवत नराधमाकडून लैंगिक अत्याचार
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
अंबादास दानवे म्हणाले, वाल्मिक कराड नागपुरात मी पत्ता देतो; मंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
नाथाभाऊ अन् मंत्री गिरीश महाजनांमध्ये जुंपली; पीआयच्या मृत्यू प्रकरणावरुन विधानपरिषदेतच नेत्यांची खडाजंगी
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
जंगलात कार, कारमध्ये मोठं घबाड; 52 किलो सोनं अन् 10 कोटींची रोकड जप्त, अधिकाऱ्यांच्या भुवया उंचावल्या
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन आमदार रोहित पाटील मुख्यमंत्र्यांना भेटले; आर.आर. आबांच्या आठवणींने कंठ दाटले
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
राष्ट्रवादी पुन्हा... शरद पवार अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत वाढली जवळीक; आमदारांच्या गाठीभेटी चर्चेत
Embed widget