एक्स्प्लोर

Cotton Price : शेतकऱ्यांची चिंता वाढली, 10 दिवसात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण

Cotton Price News : गेल्या 10 दिवसांमध्ये जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

Cotton Price News : सध्या राज्यातील कापूस उत्पादक शेतकरी (Cotton Farmers) चिंतेत आहेत. कारण सातत्यानं कापसाच्या दरात (Cotton Price) घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचे दर हे नऊ हजार रुपयांवरुन 7 हजार 500 ते 7 हजार 800 रुपयांवर आले आहेत. विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस बाजारात आणलेला नसतानाही गेल्या दहा दिवसात कापसाच्या दरात एवढी घसरण झाली आहे. 

मागील हंगामत विक्रमी 12 हजार रुपयांचा दर मिळाला होता 

मागील वर्षी कापूस हंगाम संपण्याच्या मार्गावर असताना कापसाला कधी नव्हे तर ते 12 हजार रुपये इतका विक्रमी भाव मिळाला होता. त्यामुळं यंदा देखील शेतकऱ्यांना ही वाढ मिळेल अशी अपेक्षा होती. दर वाढेल या आशेनं शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच राखून ठेवणे पसंत केले आहे. मात्र, शेतकऱ्यांचा कापूस बाजारात आलेला नसतानाही सातत्यानं कापसाच्या दरात घसरण होत आहे. दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. त्यामुळं कापसाच्या दरात कधी वाढ होणार याची शेतकरी वाट बघत आहेत. 

जागतिक बाजारपेठेत कापसाच्या दरात घसरण 

दरम्यान, जागतिक पातळीवर कापसाचे दर घसरले आहेत. त्याचा परिणाम म्हणून कापसाच्या दरात घसरण होत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. जळगाव जिल्ह्यात जवळपास वीस लाख गाठी कापसाची निर्यात थांबली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा सातशे कोटी रुपयांचा कापूस हा घरात अडकून पडला असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. जागतिक बाजारपेठेत कापूस दरात झालेली घसरण ही शेतकऱ्यांच्या चिंता वाढवणारी ठरली आहे.

अतिवृष्टीचा मोठा फटका

यावर्षी राज्यात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी झाली होती. याचा मोठा फटका शेती पिकांना बसला होता. शेतकऱ्यांच्या हाती आलेली उभी पीक या अतिवृष्टीनं वाया गेली होती. वाया गेलेल्या पिकांमध्ये कापूस, सोयाबीन, फळबागा, भाजीपाला या पिकांचा समावेश होता. यामध्ये सर्वात मोठा फटका विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला होता. काही ठिकाणी तर पिकांबरोबर जमिनी देखील खरवडून गेल्या होत्या. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. अशा अतिवृष्टीच्या तडाख्यातूनही काही शेतकऱ्यांची पीक वाचली होती. ती पीक आता बाजारात विक्रीसाठी येत आहेत. मात्र, सध्या शेतीमालाला योग्य प्रकारचा दर मिळत नसल्यानं शेतकरी सकटात सापडला आहे. आधीच शेतकऱ्यांवर कर्जाचा बोजा आहे. त्यातच शेतमालाला दर मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. यातूनच शेतकरी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलत असल्याचं चित्र दिसत आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Cotton Procurement : खरेदी सुरु मात्र दराच काय? नंदूरबारमध्ये सीसीआयकडून कापूस खरेदीला सुरुवात 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhananjay Munde Resignation Demand : धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दबाव, अजितदादांकडून बचाव?Ajit Pawar Full PC : बीड प्रकरणातील दोषींना फाशी होणार, कुणाचा संबध नसेल तर...UNCUT PCTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : 28 January 2025 : ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 28 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Zeeshan Siddique : आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
आपल्या जीवाला धोका, जबाबात ज्यांची नावं घेतली त्यांची पोलिस चौकशी करत नाहीत: झिशान सिद्दीकी
Anand Mahindra: नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
नको थार, शितलसाठी लय भारी कार; महिंद्रांकडून शितलला गिफ्ट मिळालं, कुटुंबीयांना 'आनंद'
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
हार्वेस्टर मालकांचे पैसे न दिल्यास वाल्मिकच्या दुसऱ्या बायकोची संपत्ती ताब्यात घेऊ; शेतकरी संघटनेचा इशारा
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
केसरकरांना दे धक्का; पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा शासन निर्णय रद्द; पूर्वीप्रमाणेच पाठ्यपुस्तकांचे वितरण
Solpaur News: सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
सोलापूरात गुलियन बॅरे सिंड्रोमने चिंता वाढवली, जिल्हाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक, नागरिकांना महत्त्वाच्या सूचना
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जानेवारी 2025 | मंगळवार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
सैफ अली खानला 25 लाख कॅशलेस मंजूर, मग सामान्यांना का नाही? मेडिक्लेम संघटनेची IRDA कडे तक्रार
Suresh Dhas व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
व्हायरल ऑडिओ क्लिपबद्दल सुरेश धस बोलले; दोन महिला पोलीस अधिकारी कोण? तपास करा
Embed widget