झायडस कॅडिलाची ZyCoV-D लस लवकरच देशभरातील बालकांना देण्यात येणार: केंद्रीय आरोग्यमंत्री
देशातील 12 ते 18 वयोगटातील मुलांना Zydus Cadila ची ZyCoV-D आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस देण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे.
नवी दिल्ली : देशातील लसीकरणाने 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. आता लहान मुलांना लस कधी देण्यात येणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. येत्या काही दिवसात देशातील 12 ते 18 वयोगटातील मुलांना Zydus Cadila ची ZyCoV-D आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन ही लस देण्यात येणार असल्याची महत्वपूर्ण माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी दिली आहे. Zydus Cadila ची ZyCoV-D ही लस जगातील पहिलीच डीएनए आधारित लस आहे. जेनेटिक कोडमुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
झायडस कॅडिलाच्या लसीच्या आपत्कालीन वापराला डीजीसीआयने मंजुरी दिली आहे तर 2 ते 18 वयोगटातील मुलांसाठी असणाऱ्या भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लस डीसीजीआयच्या मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविय यांनी सांगितलं की, झायडस कॅडिला ही लस लवकरच बालकांना देण्यात येणार आहे.
झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने या आधीच मंजुरी दिली आहे. झायडस कॅडिलाची लस कोविड -19 विरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा असा दावा कंपनीने केला आहे. त्यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होणार आहे.
बंगळुरू स्थित औषधनिर्माण कंपनी झायडस कॅडिलाने दिलेल्या माहितीनुसार, ही लस इंजेक्शनच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञानाद्वारे दिली जाणार आहे. या तंत्राचा वापर केल्यास लसीनंतर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होईल. या लसीला मंजुरी मिळाल्याने कोरोनाला रोखण्यासाठी ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असेल आणि देशातील सहावी उपलब्ध लस आहे. डीएनए-प्लाज्मिड आधारित 'झायकॉव्ह-डी' लसचे तीन डोस असतील. लस दोन ते चार डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवता येते आणि कोल्ड चेनची आवश्यकता नसते
भारतातील अग्रगण्य औषध कंपनी असलेल्या Zydus Cadila कंपनीकडून त्याच्या ZyCoV-D या लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी मिळावी अशी विनंती केली होती
ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) तशा प्रकारची विनंती करण्यात आली असून या लसीला मान्यता मिळाल्यास ती जगातील पहिली DNA आधारित लस असणार आहे. Zydus Cadila ची ZyCoV-D ही लस डीएनए आधारित असल्याने त्यामध्ये एक जेनेटिक कोड आहे. त्या जेनेटिक कोडमुळे शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :