(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Zydus Cadila : इंजेक्शनशिवाय दिल्या जाणाऱ्या 'ZyCoV-D' लसीच्या आपत्कालीन वापराला केंद्राची मंजुरी
झायकोव्ह-डी (ZyCov-D) या लसीच्या आपत्कालीन वापराला मंजुरी मिळाली आहे.देशात कोव्हिशिल्ड, को-व्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही सहावी लस आहे.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या विळख्यातून देश हळूहळू बाहेर पडत असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेची टांगती तलवार कायम आहे. आस्वदेशी कंपनी झायडस कॅडिला (Zydus Cadila) कंपनीच्या कोविड -19 वरील लस झायकोव्ह-डी (ZyCov-D)च्या आप्तकालीन वापरासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. देशात कोव्हिशिल्ड, को-व्हॅक्सिन, स्पुटनिक, मॉर्डनानंतर उपलब्ध होणारी ही पाचवी लस आहे. त्यामुळे कोरोनाविरोधातील लढा आणखी मजबूत होणार आहे
झायडस कॅडिलाची लस कोविड -19 विरूद्ध ही एका प्लाज्मिड डीएनए लस आहे, असा असा दावा कंपनीने केला आहे. झायडस कॅडिला लसची चाचणी 28,000 हून अधिक व्हॉलिन्टियर्सवर केली गेली आहे. त्यामुळे या लसीला मंजुरी मिळाल्यामुळे केवळ प्रौढच नव्हे तर 12 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना देखील लाभ होणार आहे.
बंगळुरूस्थित औषधनिर्माण कंपनी झायडस कॅडिलाने दिलेल्या माहितीनुसार, ही लस इंजेक्शनच्या मदतीशिवाय फार्माजेट तंत्रज्ञानाद्वारे दिली जाणार आहे. या तंत्राचा वापर केल्यास लसीनंतर दुष्परिणाम होण्याचा धोका कमी होईल. या लसीला मंजुरी मिळाल्याने कोरोनाला रोखण्यासाठी ही जगातील पहिली डीएनए-आधारित लस असेल आणि देशातील सहावी उपलब्ध लस आहे.
तीन डोसची लस
डीएनए-प्लाज्मिड आधारित 'झायकॉव्ह-डी' लसचे तीन डोस असतील. लस दोन ते चार डिग्री सेल्सिअस तापमानात ठेवता येते आणि कोल्ड चेनची आवश्यकता नसते. याद्वारे त्याची खेप सहजपणे देशाच्या कुठल्याही भागात जाऊ शकते. बायोटेक्नॉलॉजी विभागांतर्गत बायोटेक्नॉलॉजी उद्योग संशोधन सहाय्य परिषदेच्या (बीआयआरएसी) नॅशनल बायोफार्मा मिशन (एनबीएम) यांनी लसीला पाठिंबा दर्शविला आहे. क्लिनिकल ट्रायलमधून दिसून आलं आहे की लस मुलांसाठीही सुरक्षित आहे.
संबंधित बातम्या :
कोरोनाव्हायरसच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हॅरिएंटसाठी इंट्रा-नेझल लस उपयोगी ठरेल