एक्स्प्लोर
गर्लफ्रेण्डसोबत व्हिडिओ चॅट करताना तरुणाची आत्महत्या
तुला शेवटचं पाहण्याची इच्छा आहे' अशी विनवणी करत आकाशने गर्लफ्रेण्डला व्हिडिओ कॉलवर भेटण्यास सांगितलं आणि हे टोकाचं पाऊल उचललं.
पाटणा : गर्लफ्रेण्डसोबत व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ चॅटिंग करताना तरुणाने डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बिहारमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय आकाश कुमारने लाईव्ह चॅटमध्येच बंदुकीतून गोळी झाडून आयुष्य संपवलं.
सोमवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास आकाश गर्लफ्रेण्डसोबत व्हिडिओ चॅटिंग करत होता. त्यावेळी तो घरी एकटाच होता.
आकाश गेल्या वर्षी परीक्षेत नापास झाला होता. तो पाटण्यातील बाईक गँगचा सदस्य असल्याचीही माहिती आहे.
पोलिसांनी घटनास्थळावरुन पिस्तुल, गोळी, आकाशचा मोबाईल ताब्यात घेतला आहे.
आकाशची गर्लफ्रेण्ड नवव्या इयत्तेत शिकत असून महावीर कॉलनी परिसरात राहते. 'चॅट करताना आकाशने बंदूक डोक्यावर रोखली. मी त्याला पिस्तुल हटवायला सांगितलं' असं अल्पवयीन तरुणीने सांगितलं.
आकाशच्या गर्लफ्रेण्डच्या वडिलांना गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यामुळे आकाशच्या पालकांचा या नात्याला विरोध होता. त्यातच गर्लफ्रेण्डचे वडील आकाशला ओरडल्यामुळे तो दुखावल्याचंही सांगितलं जातं.
आकाशने चॅटवर घडलेला प्रकार गर्लफ्रेण्डला सांगितला. 'तुला शेवटचं पाहण्याची इच्छा आहे' अशी विनवणी करत त्याने तिला व्हिडिओ कॉलवर भेटण्यास सांगितलं आणि हे टोकाचं पाऊल उचललं.
आकाशने व्हिडिओ कॉलवर प्रतिसाद देणं बंद केल्यावर तरुणीने त्याच्या भावाशी संपर्क साधला. मात्र त्याने आकाशच्या खोलीत प्रवेश करेपर्यंत पहाटेचे पाच वाजले होते. तोपर्यंत आकाशचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आलं.
आकाशच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्यामुळे त्याच्या वडिलांनी ही हत्या असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement