एक्स्प्लोर
वास्कोतील तरुण कोरोना संशयित म्हणून गोमेकॉत दाखल
गोव्यातील तरुण कोरोना संशयित म्हणून गोमेकॉत दाखल झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना रुग्णांसाठी गोमेकॉत 113 वॉर्डमध्ये विशेष कक्ष सुरू करण्यात आला आहे.

पणजी : विदेशातील अनेक देशात फैलावलेल्या कोरोना व्हायरसने आता देशात देखील हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. गोव्यापासून जवळ असलेल्या महाराष्ट्रातील पुण्यात कोरोनाचे पाच रुग्ण सापडल्याची घटना गोव्याची चिंता वाढवणारी असतानाच क्रुझवर काम करत असताना इटलीमध्ये जाऊन आलेल्या वास्को येथील तरुणाला गेल्या दोन दिवसांपासून खोकला आणि ताप येत असल्याने त्याला बुधवारी (11 मार्च) सकाळी गोमेकॉमध्ये दाखल करण्यात आले आहे. गोवा मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्को येथील एका 27 वर्षीय तरुणाला गेल्या दोन दिवसांपासून खोकला आणि ताप येत असल्याने कोरोना रुग्णांसाठी गोमेकॉत 113 वॉर्डमध्ये सुरु करण्यात आलेल्या विशेष कक्षात त्याला दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती आता स्थिर आहे. हा तरुण क्रुझवर काम करत होता. जून 2019 रोजी क्रुझवर कामावर जाण्यासाठी गोवा सोडला होता. ही क्रुझ बोट फेब्रूवारी मध्ये यूरोप मधील फिनलँड आणि इटलीत जाऊन आली होती. फेब्रुवारीच्या मध्यास तो तरुण क्रुझवरील एका कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आला होता. नुकताच तो कतार एअरलाइन्सच्या विमानाने गोव्यात परतला होता. गेले दोन दिवस त्याला खोकला आणि ताप येत असल्याने आज सकाळी त्याला गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. Coronavirus Outbreak | पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला कोरोनाची लागण गोव्यातील तरुण कोरोना संशयित म्हणून गोमेकॉत दाखल झाल्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल राज्यात धूलिवंदन साजरे करण्यात आले. त्यावेळीही कोरोनाच्या सावटाचे चित्र पहायला मिळाले होते. कोरोनाची लक्षणे कोणती आहेत ? कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात. कोरोनाबाबत काय काळजी घ्याल? तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्या. संबंधित बातम्या : #Coronavirus : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावर कोरोनाचं सावट? Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्तांसह प्रवास करणाऱ्या बीडमधील सहप्रवाशांवर आरोग्य विभागाची करडी नजर
आणखी वाचा























