Coronavirus | पुण्यातील कोरोनाग्रस्तांसह प्रवास करणाऱ्या बीडमधील सहप्रवाशांवर आरोग्य विभागाची करडी नजर
पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बीड : दुबईहून आलेल्या पुण्यातील पती-पत्नीला कोरोना व्हायरसची लागल झाल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांचाही शोध घेणे सुरू केलं आहे. या दाम्पत्याची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे प्रवास केला, तो टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे तिघेही कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. अशातच पुण्यातील कोरोनाच्या रूग्णांसोबत प्रवास करणाऱ्या बीडच्या तिघांवरही आरोग्य विभागाची करडी नजर आहे. तिनही प्रवाशांची तब्येत ठणठणीत आहे. तरिही खबरदारीचा उपाय म्हणून पुढील 28 दिवस आरोग्य विभागाकडून या दोघांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. गेल्या 10 दिवसापासून त्यांच्यावर आरोग्य विभाग बीडमधील तीन जणांवर लक्ष ठेऊन आहे. कोरोनाचं कोणतंही लक्षण दिसताच त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी सांगितले आहे.
दुबईमध्ये फिरण्यासाठी 40 जणांचा ग्रुप गेला होता. दुबईहूनन परतणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोघांसोबत तर 40 प्रवासी दुबईहून विमानात आले होते त्यांच्यावर आता आरोग्य विभागाने करडी नजर ठेवली आहे. कोरोनाची लागण झालेल्यां प्रवाशांसोबतच बीडचे हे तीन प्रवासी दुबईहून एकाच विमानामध्ये आले होते. त्यामुळे त्यांचीही आरोग्य विभागाने तपासणी केली आहे. मात्र त्यांची तब्येत ठणठणीत असून आरोग्य विभागाकडून दररोज त्यांची तपासणी केली जात आहे. कोरोनाचं कोणतंही लक्षण दिसून आल्यास त्यांना लगेच उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. परंतु, सध्या घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
Corona | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पाचवर; कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याची शक्यता
दरम्यान, पुणे शहरामध्ये दुबई येथे जाऊन आलेले कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर खबरदारी म्हणून या रुग्णाची मुलगी आणि त्यांना घेऊन येणारा वाहनचालक या दोघांची तपासणी करण्यात आली असून त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 4 रुग्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. तसेच कोरोनाग्रस्तांसोबत विमानात असणाऱ्या सहप्रवाशालाही कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
पाहा व्हिडीओ : CoronaVirus Update | कोरोना संक्रमित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी होणार : राजेश टोपे
10 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपर्यंत 1101 विमानांमधील 1,29,448 प्रवासी तपासण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या नवीन सूचनेनुसार परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी राज्यातील या तीन विमानतळांवर करण्यात येत आहे. यासाठी सार्वजनिक आरोग्य विभाग आणि महानगरपालिकांकडून आवश्यक मनुष्यबळ विमानतळावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या शिवाय बाधित भागातून आलेल्या प्रवाशांचा शोध क्षेत्रीय सर्वेक्षणातूनही घेण्यात येत आहे. ब्युरो ऑफ इमिग्रेशनद्वारे इराण, इटली आणि दक्षिण कोरियामधून आलेल्या प्रवाशांची माहिती राज्याला देण्यात येत आहे. या तीन देशात सध्या कोरोनाचा संसंर्ग मोठ्या प्रमाणावर सुरु असल्याने 21 फेब्रुवारी नंतर या देशातून आलेल्या सर्व प्रवाशांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. आजपर्यंत राज्यात बाधित भागातून एकुण 591 प्रवासी आले आहेत.
पाहा व्हिडीओ : Coronavirus Outbreak | गो कोरोना गो! रामदास आठवले यांची कोरोना विरोधात घोषणाबाजी
राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 खाटांची व्यवस्था
18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 304 जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 289 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर पाच जण पॉझिटिव्ह आले आहेत. आजवर भरती झालेल्या 304 प्रवाशांपैकी 289 जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या 12 जण पुणे येथे तर तीन जण मुंबईत भरती आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले असून राज्यात विविध विलगीकरण कक्षांमध्ये 502 खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या :
Coronavirus | इराणच्या जेलमधून 70 कैद्यांना सोडले, तर भारतात कोरोना बाधितांची संख्या 55
Coronavirus | राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पुण्यात
Coronavirus |देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ, संख्या 43 वर
माझा विशेष | कोरोनाची भीती...कोंबडी उद्योगाची माती...