आता विवाहित मुलगीही अनुकंपा नोकरीसाठी लाभार्थी; 'या' राज्याने घेतला महत्वपूर्ण निर्णय
जर एखाद्या कर्मचाऱ्याचा त्याच्या सर्व्हिसच्या दरम्यान मृत्यू झाला असेल तर त्याची विवाहित मुलगीही अनुकंपा नोकरीसाठी पात्र असणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे.
लखनौ : एखाद्या सरकारी नोकराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या मुलाला किंवा अविवाहित मुलीला अनुकंपा धरतीवर नोकरी देण्यात येते. यावेळी त्या व्यक्तीच्या विवाहित मुलीला हा हक्क अनेकदा नाकारला जातो. पण उत्तर प्रदेश सरकारने या संदर्भात एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वडिलांचा मृत्यू झाल्यावर त्या नोकरीवर अनुकंपा धरतीवर मुलीलाही हक्क मिळणार असल्याची घोषण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.
उत्तर प्रदेशमधील एखाद्या सरकारी नोकराचा कामावर असताना मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या विवाहित मुलीला लाभार्थी मानलं जाणार आहे. यासंबंधी सरकारी अनुकंपा नोकरी नियमावली 12 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या आधी मृत व्यक्तीच्या पश्चात त्याची पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलीला लाभ मिळायचा. आता उत्तर प्रदेश सरकारच्या नव्या नियमामुळे विवाहित मुलीलाही त्याचा लाभ मिळणार आहे.
या संबंधी अलाहाबाद उच्च न्यायालयात एक अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने सरकारला तशा सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सरकारने यामध्ये सुधारणा केल्या आणि कॅबिनेटने त्याला मंजुरी दिली.
सेवा नियमावलीनुसार, एखाद्या सरकारी नोकराचा नोकरीवर असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना अनुकंपा धरतीवर नोकरी मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये त्या व्यक्तीची पत्नी, मुलगा आणि अविवाहित मुलगी यांचा समावेश असतो. आता उत्तर प्रदेशमध्ये हे चित्र बदलले असून त्या व्यक्तीच्या अविवाहित मुलीलाही लाभार्थी समजण्यात येणार आहे.
पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला उत्तर प्रदेश विधानसभेसाठी निवडणुका होणार आहे. त्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांनी त्याची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी वेगवेगळी आश्वासनंही देण्यात येत आहेत. योगी आदित्यनाथांचा हा निर्णयही निवडणुकीच्या धरतीवर घेण्यात आल्याची चर्चा आहे.
संबंधित बातम्या :
- हिंदुत्वाची तुलना आयसीस आणि बोको हराम दहशतवादी संघटनांशी; सलमान खुर्शीद यांच्या नव्या पुस्तकावरुन वाद
- UP Population Control Bill : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून 2021-30 लोकसंख्या धोरण जाहीर; ठळक मुद्दे वाचा
- UP Population Control Draft: यूपीमध्ये दोनपेक्षा जास्त मुले असल्यास सरकारी नोकरी नाही, लोकसंख्या नियंत्रण विधेयकाचा ड्राफ्ट तयार