एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जागतिक ग्राहक हक्क दिन : ग्राहक म्हणून तुमचे अधिकार कोणते?
तुमची फसवणूक होत असेल तर त्याची तक्रार कुठे करावी, याची माहिती तुम्हाला जाहिरातीमधून मिळते. कुणाकडून तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही संबंधित विक्रेत्याला धडा शिकवू शकता आणि तुमची नुकसान भरपाईही मिळवू शकता.
नवी दिल्ली : ग्राहक या नात्याने तुम्हाला अनेक अधिकार दिलेले आहेत आणि या अधिकारांची माहिती घेऊन तुम्ही जागरुक ग्राहक बनू शकता. शिवाय या अधिकारांची माहिती असल्यामुळे तुम्ही फसवणुकीपासून वाचू शकता.
सरकारकडूनही ग्राहकांच्या जनजागृतीसाठी वेळोवेळी जाहिराती जारी केल्या जातात. तुमची फसवणूक होत असेल तर त्याची तक्रार कुठे करावी, याची माहिती तुम्हाला जाहिरातीमधून मिळते. कुणाकडून तुमची फसवणूक झाली असेल तर तुम्ही संबंधित विक्रेत्याला धडा शिकवू शकता आणि तुमची नुकसान भरपाईही मिळवू शकता.
आज (15 मार्च) जागतिक ग्राहक हक्क दिन आहे. यानिमित्ताने ग्राहक संरक्षण मंत्रालयाने jagograhakjago.gov.in ही खास नवी वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाईटवर ग्राहकांशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल. ग्राहकांचे अधिकार, तक्रार आणि इतर सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळेल.
या वेबसाईटवर कोणत्याही कंपनीची तक्रार करणं सोपं होणार आहे. तरी टोल फ्री क्रमांक, मेसेज किंवा ऑनलाईन तक्रारही करता येऊ शकते. आपल्या तक्रारीची स्थितीही ग्राहक वेबसाईटद्वारे ट्रॅक करु शकतात. लवकरच प्रादेशिक भाषांमध्ये हेल्पलाईन सुरु केली जाणार असल्याचीही माहिती आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
सोलापूर
निवडणूक
Advertisement