(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Womens Day 2022 : ITBP च्या महिला जवान सीमा सुरक्षेच्या तैनात, पाहा महिलांच्या शौर्याचा 'हा' खास व्हिडीओ
Womens Day 2022 : आजच्या काळात देश आणि समाजाच्या जडणघडणीत महिलांचा मोठा वाटा आहे. घराच्या जबाबदारीचा प्रश्न असो किंवा देशाच्या सुरक्षेचा, सर्वत्र महिला खंबीरपणे आहेत.
Womens Day 2022 : जगभरात 8 मार्च हा जागतिक महिला दिन (International Womens Day) म्हणून साजरा केला जातो. आजच्या काळात देश आणि समाजाच्या जडणघडणीत महिलांचा मोठा वाटा आहे. याची उदाहरणं प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळतात. घराच्या जबाबदारीचा प्रश्न असो किंवा देशाच्या सुरक्षेच्या सर्वच ठिकाणी महिला अग्रेसर आहेत. महिला सीमेच्या रक्षणासाठीही कर्तव्य बजावत आहेत.
आज महिला दिनानिमित्त सीमेवर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या महिला जवानांचे काही खास फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हा-आम्हा सर्वांनाच या महिलांचा अभिमान वाटेल. अरुणाचल प्रदेशमध्ये इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) च्या महिला सैनिक सीमेचे रक्षण करण्यासाठी सज्ज आहेत.
#WATCH Women troops of Indo-Tibetan Border Police (ITBP) patrolling in Arunachal Pradesh near the border with China#InternationalWomensDay2022 pic.twitter.com/vzeVghWbPW
— ANI (@ANI) March 8, 2022
सीमेवरील दुर्गम भागात गस्त घालत असलेल्या या महिलांचा व्हिडीओ त्यांच्या शौर्याचे दर्शन घडवतो. या व्हिडीओमध्ये महिला सैनिक आधी डोंगराच्या दिशेने गस्त घालताना आणि नंतर नदी ओलांडताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये, महिलांचे हे धाडस पाहून हा व्हिडीओ पाहणाऱ्या प्रत्येकाकडून महिलांचे कौतुक केले जात आहे. इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP) च्या या महिला जवान जम्मू-काश्मीर ते अरुणाचल प्रदेशपर्यंत सीमेच्या सुरक्षेत तैनात आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- Womens Day 2022 : महिला दिनानिमित्त 'ती'ला गिफ्ट द्यायचंय? 'या' सात भेटवस्तू ठरतील उत्तम पर्याय!
- Womens Day Google Doodle : महिलांना समर्पित आजचे खास गुगल डूडल, महिला दिनाच्या दिल्या शुभेच्छा
- Womens Day 2022 : महिला दिन का साजरा केला जातो? यंदाची थीम काय?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha