(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gondia Crime: धक्कादायक! भावाच्या हत्येचा बदला, मैत्रिणीचा वापर करत तरुणाला बोलवले, कुऱ्हाडीनं घाव घालून केली हत्या
या हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेने महाराष्ट्र हादरला आहे.
Gondia Crime: भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मैत्रिणीचा वापर करत कुऱ्हाडीचा घाव घालून तरुणाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील भिवापूरमध्ये घडलेल्या या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. भिवापूरमध्ये 24 नोव्हेंबरला सकाळी रक्ताच्या थारोळ्यात सुनील तुमडे (३२) याचा मृतदेह आढळला होता. या हत्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.वैष्णवी सुरणकर (१९) व मंगेश रहांगडाले (२४) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
नक्की झाले काय?
भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मंगेशने त्याची मैत्रिण वैष्णवीचा वापर केला. वैष्णवीला इन्स्टाग्रामवरून सुनीलसोबत मैत्री कर आणि त्याला भेटायला बोलाव. भेटायला आल्यावर आपण त्याचा काटा काढू असे ठरले. त्यानुसार वैष्णवीने सुनील सोबत मैत्री करून त्याला रात्रीच्या वेळी भिवापूर येथे भेटायला बोलावले. सुनील तिला भेटायला भिवापूर येथे गेल्यावर सुनीलच्या डोक्यावर कुहाडीने घाव घालून त्याचा खून केला. व आरोपी मंगेश हा मुंबईला फरार झाला. हत्येचा उलगडा करण्यासाठी तिरोडा पोलिसांनी वेगवेगळे पथक नेमले होते दरम्यान मंगेशला मुंबईतून तर तिची मैत्रीण वैष्णवीला तीरोडा येथुन अटक केली आहे.
सोशल मीडियावर तरुणाशी मैत्री करण्यास सांगितले
गोंदियात २४ नोव्हेंबर रोजी घडलेल्या घटनेचा तिरोडा पोलिसांनी उलगडा केल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी या तरुणानं मैत्रिणीचा वापर करत तिला इन्स्टाग्रामवरून तरुणाशी मैत्री करण्यास सांगितले. तरुणाशी मैत्री करत त्याला भेटायला बोलवले. नंतर कुऱ्हाडीने घाव घालत तरुणाची निघृण हत्या केली. या घटनेनंतर आरोपी मंगेश मुंबईला फरार झाला होता. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून घटनेचे दोन्ही आरोपींना तीरोडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.वैष्णवी सुरणकर (१९) व मंगेश रहांगडाले (२४) या दोघांनाही तीरोडा पोलिसांनी मुंबईतून अटक केल्याचे सांगण्यात आले आहे.