एक्स्प्लोर

Sanjay Raut : ठाकरे गट BMC निवडणुकीपूर्वी मविआतून बाहेर पडणार का? संजय राऊतांचं महत्त्वाचं वक्तव्य, म्हणाले...

Sanjay Raut : शिवसेना ठाकरे गट बीएमसी निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीतून बाहेर पडणार, अशा चर्चांना उधाण आले आहे.

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) महायुतीला (Mahayuti) मोठे यश मिळाले तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मोठा फटका बसला. यानंतर शिवसेना ठाकरे गट (Shiv Sena UBT) बीएमसी निवडणुकीपूर्वी (BMC Election) महाविकास आघाडीपासून वेगळा होणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. आता यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलंय.   

संजय राऊत म्हणाले की, अजिबात नाही, आत्ताच निकाल लागलेला आहे. निकालासंदर्भात सगळ्याच पक्षांचे चिंतन, मंथन, अभ्यास सुरू आहे. तिन्ही पक्षांना धक्का बसलेला आहे. याबाबत कारणे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारणांची दिशा पाहिली तर ती ईव्हीएमच्या दिशेने जात आहे. ज्या पद्धतीने पैसे वापरले, त्या पद्धतीने जात आहे. त्यामुळे आम्हाला तिघांना एकत्र बसून त्या संदर्भात चर्चा करावी लागेल. 

राजकारणात इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात

राहुल गांधी यांच्याशी काल आम्ही चर्चा केली. काही कार्यकर्त्यांची भूमिका असते, निवडणुकीत पराभव झाल्यावर त्यांना वाटतं की, आपण स्वतंत्रपणे लढायला हवं होतं. पण, आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. राज्यातल्या 14 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. त्या संदर्भातला एक निर्णय घ्यावा लागतो. राजकारणात इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात. आम्ही लोकसभा निवडणुका एकत्र लढलो, त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला. 

कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात

विधानसभेला दुर्दैवाने आम्हाला यश मिळालं नाही. अपयशाची कारणे आम्ही एकत्र बसून शोधू. ती कारणे आम्हाला माहिती असली तरी आम्हाला एकत्र बसावे लागेल. स्वतंत्रपणे लढण्याच्या भूमिका त्या त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात. अशा प्रकारच्या बातम्या सध्या तरी विश्वास ठेवावा, अशा नाहीत. काहीही झालं तरी 288 मतदार संघामध्ये आम्हाला यापुढे लक्ष घालावे लागणार आहे. जिल्हा परिषद, पंचायती, महानगरपालिका, नगरपालिका या निवडणुका आम्हाला लढायच्याच आहेत. त्यामुळे भविष्यात बघू काय होतं, असे संजय राऊत यांनी म्हटले. 

शिंदेंनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये

मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील, त्यास माझा आणि शिवसेनेचा पाठींबा असेल, अशी भूमिका काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केली. यावरून संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंना टोला लगावलाय. त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार जर दिल्लीतल्या मोदी आणि शाह यांना दिले असतील तर त्यांनी यापुढे त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये.  हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, असे शब्द यापुढे न वापरलेले बरे, असे म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला.  

आणखी वाचा 

Maharashtra CM: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यापूर्वी अमित शाहांनी विनोद तावडेंना का बोलावून घेतलं? वाचा इनसाईड स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Donald Trump : फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 02 February 2025Ramdas Kadam On ShivSena | शिवसेनेचा एकही आमदार भाजपात जाणार नाही, रामदास कदमांना विश्वासABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 02 February 2025Dhananjay Deshmukh Bhagwangad : धनंजय देशमुख-नामदेव शास्त्री यांच्यातील संपूर्ण संभाषण जसंच्या तसं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
ढोलकीचा ताल अन् घुंगरांचा बोल! अकलूजमध्ये पारंपारिक लावणी स्पर्धेला सुरुवात, 31 वर्षांची परंपरा कायम
Donald Trump : फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
फक्त 11 दिवसांत डोनाल्ड ट्रम्प याचा झटका; पहिल्यांदा 18 हजार घुसखोर भारतीयांची यादी तयार केली अन् आता 1700 भारतीयांना बेड्या ठोकल्या!
Latur : लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
लातुरातील शिरूर अनंतपाळ येथे दोन दिवसीय साहित्य संमेलन, साहित्यिक आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद
Narayan Rane : मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
मंत्री संजय शिरसाटांकडून दोन्ही शिवसेनेच्या मिलनाची चर्चा, आता खासदार नारायण राणे म्हणतात, 'माझ्या मते...'
Praful Patel & Nana Patole : कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
कट्टर विरोधक प्रफुल्ल पटेल अन् नाना पटोलेंची गळाभेट; एकाच व्यासपीठावर मनमोकळ्या गप्पा
INDIA Alliance : इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
इंडिया आघाडीची शोकांतिका म्हणून पाहू नका, त्याचा आनंदही साजरा करु नये; ज्येष्ठ नेत्याच्या वक्तव्यानं भूवया उंचावल्या
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
युवा टीम इंडिया वर्ल्ड चॅम्पियन! भारतीय मुलींनी जिंकला ICC अंडर-19 वर्ल्ड कप, दक्षिण आफ्रिकेचा उडवला धुव्वा
Mumbai News : वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून पहिल्या टप्प्यात घरं मार्चमध्ये मिळण्याची शक्यता,556 घरांच्या चाव्या देणार
Embed widget