एक्स्प्लोर
प्रसुती रजा 26 आठवडे करण्याचा प्रस्ताव, विधेयक आज संसदेत
नवी दिल्ली : संसदेत आज नवं मॅटरनिटी लिव्ह म्हणजेच प्रसुती रजा वाढीचं विधेयक सादर होणार आहे. सरकारी आणि खासगी क्षेत्रातील नोकरदार महिलांना मिळणारी 12 आठवड्यांची प्रसुती रजा आता 26 आठवड्यांची करण्यात येणार आहे.
प्रसुती रजा वाढवण्यास कामगार मंत्रालयाची सहमती
प्रसुती आणि त्यानंतरच्या काळात अपत्याच्या दैनंदिन पालनपोषणासाठी मातेला दिल्या जाणाऱ्या रजेत वाढ करून, ती साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे लेखी पत्र कामगार मंत्रालयाला पाठवण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयानेही सहमती दर्शविली आहे.
रजा 12 आठवड्यांवरुन 26 आठवड्यांची करण्याचा प्रस्ताव
कामगार कायद्यानुसार प्रसुती काळात महिला नोकरदारांना सध्या 12 आठवड्यांची भरपगारी रजा मिळते. त्यात वाढ करून साडेसहा महिन्यांची करण्यास कामगार मंत्रालयाने तयारी दर्शविली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement