देशात लॉकडाऊन नसते, तर आठ लाख लोक कोरोनाबाधित असते : आरोग्य मंत्रालय
देशात वेळीच लॉकडाऊन घेतले नसते तर आतापर्यंत आठ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती, अशी भीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने व्यक्त केली. आरोग्य मंत्रालयाचे सचिव प्रेम अग्रवाल यांनी आज ही माहिती दिली.
नवी दिल्ली : देशात लॉकडाऊन घेतला नसता तर आतापर्यंत आठ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली असती अशी भीती आरोग्य मंत्रलयाने व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सचिव प्रेम आग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. आपल्या देशातील कोरोनाबाधितांचा ग्रोथ रेट हा 41 टक्के होता. त्यानुसार आतापर्यंत 8.2 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असता अशी माहिती प्रेम अग्रवाल यांनी दिली. मात्र, वेळीच देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतल्याने हा धोका टळल्याचं त्यांनी सांगितले.
आताच्या घडीला देशात सात हजार 529 लोक कोरोना पॉझिटिव्ह असून आतापर्यंत 242 लोकांची कोरोनामुळे बळी गेला आहे. मागील 24 तासांत देशात 40 मृत्यूची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक महाराष्ट्रात पंशराशेच्यावर कोरोना रुग्णचे रुग्ण आहेत. देशात जर वेळीच लॉकडाऊन घेतले नसते तर ही परिस्थिती आणखी भयानक झाली असती अशी भीती आज आरोग्य मंत्रालयाने व्यक्ती केली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव प्रेम अग्रवाल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन देशातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. देशात लॉकडाऊन जाहीर केलं नसतं तर आता आठ लाखांच्यावर कोरोना रुग्ण असते, अशी माहिती त्यांनी मांडली. 22 मार्चला देशात एकदिववसाचा जनता कर्फ्यू घेण्यात आला. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी 25 मार्चाला देशात 21 दिवसांचं लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं.
महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय
देशात लॉकडाऊन वाढणार देशातील लॉकडाऊनची मर्यादा येत्या 14 एप्रिलला संपणार आहे. या पार्श्वभूमीवर काही राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक पार पडली. यात कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा पंतप्रधानांनी घेतला. यावेळी कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. येत्या 14 एप्रिला या लॉकडाऊनची मर्यादा संपणार आहे. मात्र, देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे देशातील लॉकडाऊन वाढवणे अपरिहार्यता असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले, अशी माहिती दिल्लीची मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी दिली.
Lockdown extend in Maharashtra | महाराष्ट्रात किमान 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे