एक्स्प्लोर

Global Energy Crisis : इराण-इस्त्रायल युद्धामध्ये टॉपचे दोन गॅस केंद्र भक्ष्यस्थानी, भारतासह जगावर ऊर्जासंकट

Iran Israel War : आधी इस्त्रायलने इराणच्या गॅस फिल्डवर हल्ला केला, त्याला इराणने प्रत्युत्तर देत कतारच्या सर्वात मोठ्या गॅस केंद्रावर निशाणा साधला. यामुळे जगावर मात्र ऊर्जा संकट ओढावण्याची शक्यता आहे.

Iran Israel Conflict : आखाती देशात पेटलेल्या युद्धामुळे जगावर ऊर्जासंकट ओढावल्याचं चित्र आहे. गेल्या 20 दिवसांपासून सुरु असलेली ही लढाई फक्त क्षेपणास्त्रं आणि ड्रोनपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर ती थेट ऊर्जा स्त्रोतांपर्यंत पोहोचली आहे. पुढील 13 वर्षे संपूर्ण जगाची गरज भागवू शकेल, एवढा गॅस ज्या केंद्रांवर उपलब्ध आहे तेच दोन केंद्रं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

इराणच्या दक्षिण भागात असलेल्या जगातील सर्वात मोठ्या गॅस साठ्यांपैकी एक असलेल्या साऊथ पार्स (South Pars Attack) भागात इस्रायलानं जोरदार हल्ला केला. याला उत्तर म्हणून इराणनं कतारच्या रास लफान भागात प्रतिहल्ले केले. रास लफान भागात यामुळे मोठी आग लागली, मात्र तात्काळ ही आग नियंत्रणात आणण्यात आली. कतारचा हा भाग नॉर्थ डोम म्हणून प्रसिद्ध आहे. गॅस पुरवठ्यासाठी हे दोन्ही प्रदेश अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे एकमेकांच्या ऊर्जा क्षेत्रातील माऱ्यांमुळे युद्ध गंभीर वळणावर येऊन ठेपल्याचं दिसतंय.  

Iran War India Impact : भारताचं टेन्शन वाढलं

भारत तेलाच्या आयातीबाबतीत मोठ्या प्रमाणावर कतारवर अवलंबून आहे. एलएनजीच्या एकूण गरजेपैकी भारत 38 ते 40 टक्के गॅस कतारमधून आयात करतो. कतारच्या रास लफान भागातून प्रामुख्यानं या गॅसचा पुरवठा होतो. त्यामुळे कतारमध्ये झालेल्या हल्ल्यामुळे भारताचंही टेन्शन वाढल्याचं दिसतंय. 

South Pars Attack : रास लफानची वैशिष्ट्ये काय?

  • जगातील सर्वात मोठं एलएनजी हब.
  • जगभरातील देशांना एलएनजी आणि इतर पेट्रोकेमिकल उत्पादनांची इथून निर्यात.
  • कतारच्या अर्थव्यवस्थेचा कणा.
  • रास लफानमध्ये अडथळा आला तर जागतिक गॅस पुरवठ्यावर परिणाम.
  • अनेक देशांच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होण्याचा धोका. 

Energy War Oil Price Surge : तेलाच्या किमती वाढण्याची शक्यता

दरम्यान, या युद्धाच्या झळा आता संपूर्ण जगाला बसण्यास सुरूवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमती 200 डॉलर्स प्रति बॅरलवर जाण्याची शक्यता आहे. बंद झालेली होर्मुझची सामुद्रधुनी आणि आता पार्स क्षेत्रावरील हल्ल्यामुळे तेलाच्या किमती कमालीच्या भडकण्याची भीती आहे. तज्ज्ञांनीही तसा अंदाज व्यक्त केला आहे. युद्ध सुरू होऊन तीन आठवडे झाले आहेत, मात्र हे युद्ध लवकर संपण्याची कोणतीही शक्यता दिसत नाही.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Pakistan Blast: पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
पाकिस्तानात पोलिस स्टेशनमध्ये तरुणानं स्वत:ला उडवलं; भीषण आत्मघाती हल्ल्यात 8 पोलिसांसह 14 जणांच्या चिंधड्या, 22 जखमी, दहशतवादाविरोधात रॅली सुरु असतानाच रक्तपात
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
इंडोनेशियातील मदुरा बेटाजवळ जहाजाला आग, 5 जणांचा मृत्यू, तर 41 जण बेपत्ता, 225 जणांना वाचवण्यात यश
CWG 2026: 'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
'ईशान्य भारत अन् काश्मीर गायब'; ग्लासगोतील रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर भारताचा अपूर्ण नकाशा, स्टार बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि BFI चा तीव्र आक्षेप
Middle East Crisis: 'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?
'मिडल ईस्ट सोडा', अमेरिकेकडून नागरिकांना महत्त्वाचा अलर्ट, इराणसोबतच्या तणावात मोठा भडका उडणार?

व्हिडीओ

Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
'फक्त आमदारकीची नाही, तर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला संदेश देणारी निवडणूक..' थेट भाजप अध्यक्षांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडताच बांकीपूरचे बाॅस प्रशांत किशोर काय काय म्हणाले?
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
मुंबईच्या SRA कार्यालयातील भेटीनंतर रोहित पवार ब्रीच कँडी रुग्णालयात; त्रास जाणवू लागल्याने उपचारासाठी दाखल
Bankipur byelection Result : भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
भाजपच्या प्रतिष्ठेला 'दे धक्का'; बिहार पोटनिवडणुकीत प्रशांत किशोरांचा मोठा विजय, 30 वर्षांपासूनच्या बालेकिल्ल्याला सुरुंग
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल होणार नाही, 2700 गुन्हेगारांविरुद्धचा एफआयआर कायम राहील; केंद्र सरकारची भूमिका, कठोर कारवाई करणाऱ्या जवानांना संरक्षण देऊ नका, सर्वोच्च न्यायालयानं सुनावलं
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंविरुद्ध लढलेल्या ठाकरेंच्या वैशाली दरेकरांनी पद सोडलं, राजीनामा पत्रात म्हणाल्या...
Bankipur By-election Prashant Kishor: 'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
'बांकीपूरमध्ये आम्ही कुत्र्या मांजराला उभं केलं तरी निवडून येईल..' भाजपला ते वाक्य महागात पडलं, प्रशांत किशोर भक्कम विजयाच्या दिशेनं
EPFO Big Update : 25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
25000 रुपये मूळ वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळणार, केंद्र सरकार EPFO चा 10 वर्षांपूर्वीचा नियम बदलणार
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
देव तारी त्याला कोण मारी... मिसिंग लिंकजवळ खोल दरीत कोसळली कार; झाडाला अडकल्याने बचावला ड्रायव्हर
Embed widget