एक्स्प्लोर
Advertisement
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाच्या वडिलांचं देशवासियांना भावूक पत्र
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी सकाळी (27 फेब्रुवारी) हवाई हद्दीचं उल्लंघन करत भारतात प्रवेश केला होता. जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली.
मुंबई : भारताच्या हवाई हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या विमानांना भारतीय वायुदलाने पळवून लावलं. यादरम्यान, भारताच्या वायूदलातील वैमानिक पाकिस्तानच्या हाती लागले. या घटनेच्या दुसऱ्या दिवशी या विंग कमांडरच्या वडिलांनी देशवासियांना उद्देशून भावूक पत्र लिहिलं आहे. वैमानिकाबद्दल दाखवलेल्या काळजीसाठी, केलेल्या प्रार्थनांसाठी देशवासियांचे आभार मानले आहेत.
पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या विंग कमांडरचे वडील हे भारतीय वायूदलातील निवृत्त एअर मार्शल आहेत. पत्रात ते लिहितात की, "माझ्या मित्रांनो, तुमच्या काळजी आणि प्रार्थनांसाठी आभार. मी देवाचे आभार मानतो की, माझा मुलगा जिवंत आहे, जखमी नाही, मानसिकदृष्ट्या ठीक आहे. तो ज्या साहसाने बोलत आहे ते पाहा....एक खरा जवान.... आम्हाला त्याचा अतिशय अभिमान आहे."
"तुमच्या आशीर्वादाचे हात त्याच्या डोक्यावर आहेत, त्याच्या सुखरुप सुटकेसाठीच्या प्रार्थना त्याच्यासोबत आहेत, याची मला खात्री आहे. त्याचा छळ होऊ नये तसंच शरीर आणि मनाने सुखरुप मायदेशी परतेल यासाठी मी प्रार्थना करतो."
"अशा नाजूक क्षणी तुम्ही आमच्यासोबत आहात, यासाठी मी आभारी आहे. तुमच्या पाठिंब्यामुळे आणि ऊर्जेमुळे आम्हाला बळ मिळालं आहे."
पाकिस्तानची भारतीय हवाई हद्दीत घुसखोरी
पाकिस्तानच्या लढाऊ विमानांनी बुधवारी सकाळी (27 फेब्रुवारी) हवाई हद्दीचं उल्लंघन करत भारतात प्रवेश केला होता. जम्मू काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली.
जिनिव्हा करार : पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय वैमानिकाला परत आणण्याचा मार्ग
भारतीय वायुसेनेने चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर पाकिस्तानच्या विमानांनी पळ काढला. मात्र या कारवाईर भारताचं एक मिग 21 विमान दुर्घटनाग्रस्त झालं. या कारवाईत वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. हा वैमानिक पाकिस्तानच्या ताब्यात आहे.
पाकिस्तानच्या ताब्यात फक्त एकच पायलट असून विंग कमांडरला लष्कराच्या नियमानुसार वागवलं जात असल्याचा दावा पाकिस्तानी सैन्याचे प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी केला आहे.
संबंधित बातम्या
पाकिस्तानच्या ताब्यातील भारतीय वायूसेनेच्या वैमानिकाचे फोटो, व्हिडिओ शेअर करु नकापाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचं भारतासमोर लोटांगण, चर्चेच्या माध्यमातून तोडग्याची विनंती
भारतीय वायुसेनेचा एक वैमानिक बेपत्ता असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
पाकिस्तान पुन्हा तोंडावर आपटला, बडगाममधील चॉपर पाडलं नसल्याची कुबली
पाकिस्तानी मीडियात खोट्या बातम्यांचा पाऊस, भारतीय विमानांना धक्काही नाही
डरपोक पाकड्यांचा डाव उधळला, जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्तानचं एफ-16 विमान पाडलं
...म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला, सुषमा स्वराज यांनी सांगितली कारणं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement