(Source: ECI/ABP News/ABP Majha)
West Bengal Election : मुस्लिम बहुल जागांवरील त्रिकोणी लढतीचा फायदा ममतांना की मोदींना?
भाजप, ममता आणि डावे , काँग्रेस आणि फुरफुरा शरीफचे पीरजादाचे अब्बास सिद्दीकी यांची आघाडी पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यातच एमआयएमच्या एन्ट्रीने पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुस्लिम मतांचा विभाजनाचे चर्चा सुरू झाली आहे.
पश्चिम बंगाल/आसाम : पश्चिम बंगाल निवडणूक हिंदू विरुद्ध मुस्लीम व्हावी अशी काही पक्षाची अपेक्षा आहे.तसे या निवडणुकीत हिंदू-मुस्लिम मतांचे ध्रुवीकरण करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. 294 जागांपैकी 70 ते 100 जागांवर मुस्लिम समाजाची एकतर्फी मत विजय आणि पराभवाचे कारण ठरू शकतात. मुस्लिम बहुल जागांवरील त्रिकोणी लढतीचा फायदा ममतांना की मोदींना होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक आतापर्यंतचे चित्र पाहता त्रिकोणी होताना पहायला मिळते आहे. भाजप, ममता आणि डावे , काँग्रेस आणि फुरफुरा शरीफचे पीरजादाचे अब्बास सिद्दीकी यांची आघाडी पश्चिम बंगाल काबीज करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यातच एमआयएम च्या एन्ट्रीने नाव पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या निवडणुकीत मुस्लिम मतांचा विभाजनाचे चर्चा सुरू झाली आहे.
बंगालमध्ये भाजपाला मुस्लिम मतदारांचे महत्त्वही समजले आहे आणि म्हणूनच स्थानिक तज्ञांचे मत आहे की ओवेसी त्यांच्या निवडणूक रणनीतीचा एक भाग आहेत. एमआयएम यांचा भाजपचा 'बी टीम' असल्याचा आरोपही टीएमसीने केला आहे. मात्र ओवेसी काही जागांवर ममतांची मते कमी करू शकतील बंगाल निवडणुकीत ओवैसी यांना चिराग पासवान बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.चिरागने बिहार निवडणुकीत जागा जिंकल्या नसत्या पण नितीशकुमार यांच्या पक्षाच्या जागा निश्चितच कमी झाल्या. त्याचप्रमाणे या वेळी ओवैसी बंगाल निवडणुकीत विजय नोंदवू शकणार नाहीत. पण टीएमसीचा खेळ निश्चित खराब होऊ शकतो.
पश्चिम बंगाल राज्यातील एकूण लोकसंख्येपैकी 30 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. 294 जागांपैकी 70ते 100 जागांवर मुस्लिम समाजाची एकतर्फी मत विजय आणि पराभवाचे कारण ठरू शकतात. कॉंग्रेस आणि डाव्यांनी यापूर्वी युती केली होती, पण त्यांच्यासोबत फुरफुरा शरीफचे पीरजादा अब्बास सिद्दीकी देखील आहेत. बंगालमधील अल्पसंख्याक प्रामुख्याने दोन धार्मिक संस्था पाळतात. यापैकी देवबंदी आदर्श आणि फुरफुरा शरीफ यांचे अनुकरण करणारे जमीयत उलेमा-ए-हिंद आहेत. त्यामुळे ममतांची मुस्लिम मते आपल्याकडे खेचण्यासाठी डावे पक्ष आणि काँग्रेसने फुरफुरा शरीफचे अब्बास सिद्दीकी यांच्याशी युती केली.
पश्चिम बंगालचे मुस्लिम ममता सोडून ओवैसीमध्ये सोबत जातील का? ओवेसी आणि सिद्दीकी पूर्णपणे वेगळ्या घेतलेल्या भूमिका मतांचं ध्रुवीकरण करतील का? यामुळे टीएमसीचे नुकसान होईल का ? हे प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झालेत . एमआयएमचे सर्वेसर्वा असोदिन ओवेसी पश्चिम बंगालची निवडणूक लढवावी की न लढवावी या द्विधा मनस्थितीत होते त्यामुळे त्यांनी इथं आपलं ग्राउंड केले नाही त्यामुळे की बंगाली मुस्लिम त्यांना मतदान का करतील प्रश्नआहे
फुरफुरा शरीहफचे पीरजादा अब्बास सिद्दीकी यांचं मुस्लिम समाजातील महत्त्व विसरून चालणार नाही कारण ते बंगाली मुस्लिम आहे. बंगाल मधील काही जिल्ह्यात त्यांचे निश्चितच वर्चस्व आहे.बांगलादेशच्या सीमेवर असलेल्या जिल्ह्यातील जिल्ह्यांमध्ये मुस्लिमांची संख्या मोठी आहे. मुर्शिदाबाद, मालदा आणि उत्तर दिनाजपूरमध्ये त्यांची लोकसंख्या 40 टक्क्यांहून अधिक आहे. या व्यतिरिक्त दक्षिण आणि उत्तर 24-परगणा जिल्ह्यातही त्यांचा मतांचा महत्त्वपूर्ण परिणाम होतो.
विधानसभेच्या 294 जागांपैकी 70 ते 100 जागांवर मुस्लिमांची मते निर्णायक आहेत. 2006 पर्यंत राज्यातील मुस्लिम वोट बँकेत डाव्या आघाडीचे नियंत्रण होते. पण त्यानंतर, या विभागातील मतदारांनी हळूहळू ममतांच्या तृणमूल कॉंग्रेसकडे आकर्षित केले आणि 2011 आणि 2016 मध्ये या व्होट बँकेमुळे ममता सत्तेत राहिली. त्यामुळे ममता मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण होऊ नये यासाठी 2011 मध्ये हे राज्य सत्तेवर आल्यानंतर एका वर्षानंतर ममतांनी इमामांना अडीच हजार रुपये मासिक भत्ता जाहीर केला.
या पूर्वीही बिहार निवडणूकीत मुस्लिम महिला भाजपच्या सोबत राहिल्याचे बोलले जाते .त्या प्रमाणे या ही वेळी मुस्लिम महिलांचे मत आम्हला मिळतील असा भाजपचा दावा आहे . पण दोन राज्यातील राजकीय स्थिती पूर्णपणे वेगळी आहे. पश्चिम बंगाल निवडणुकिमध्ये मुस्लिम बहुल जागांवरील त्रिकोणी लढतीचा फायदा ममतांना की मोदींना होणार हे पाहणं महत्वाचे असेल.
संबंधित बातम्या :
भाजप उमेदवार विधान पाडवी यांच्या गाडीवर हल्ला; फलता मतदारसंघातील मतदान केंद्रावरील घटना
बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पद्दुचेरीत आज मतदान; राज्यांत कडेकोट बंदोबस्त