एक्स्प्लोर

पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास होतोय तर त्यांनी स्पष्टीकरण का दिलं नाही? : तारिक अन्वर

पवारांच्या वक्तव्यावर नाराज होऊन तारिक अन्वर यांनी पक्ष सदस्यत्व आणि खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पण शरद पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास होतोय, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केलाय.

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल डीलप्रकरणी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास होत असेल, तर त्यांनी याबाबत स्पष्टीकरण का दिलं नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तारिक अन्वर यांनी केला आहे. पवारांच्या वक्तव्यावर नाराज होऊन त्यांनी पक्ष सदस्यत्व आणि खासदारकीचा राजीनामा दिला आहे. पवारांच्या वक्तव्याचा जो निष्कर्श काढला त्यातून दिसून आलं की पंतप्रधानांची बाजू त्यांनी घेतली. त्यांनी पंतप्रधानांना क्लीन चिट दिली. सर्व आरोप पंतप्रधानांवर होतायत आणि पंतप्रधानांवर संशय नाही असं म्हटलं तर या प्रकरणी जो रोष आहे तो निरर्थक असल्याचं वाटतं, असं म्हणत तारिक अन्वर यांनी नाराजी व्यक्त केली. पवार साहेब पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांच्याकडून असं बोललं जात असेल तर पक्षाची भूमिकाही तीच आहे असं वाटतं त्यामुळे राजीनामा दिला, असं तारिक अन्वर म्हणाले. वक्तव्याचा विपर्यास केलाय असं वाटत असतं तर पवारांनी तेव्हाच स्पष्टीकरण द्यायला हवं होतं. या सर्व बातम्या पाहिल्यानंतर 24 तास वाट पाहिली, कारण पवार स्पष्टीकरण देतील, असं वाटलं होतं. पण त्यांचं कोणतंही स्पष्टीकरण आलं नाही. त्यानंतर राजीनाम्याचा निर्णय घ्यावा लागला, असं तारिक अन्वर म्हणाले. सर्व विरोधक राफेलप्रकरणी एकजूट झाले आहेत, सर्वांना वाटतं की या प्रकरणात भ्रष्टाचार झाला आहे. पण पवारांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांच्या आंदोलनाचं नुकसान झाल्याचं मत तारिक अन्वर यांनी व्यक्त केलं. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला दिलेला बिनशर्त पाठिंबा ही एक राजकीय चूक होती, असा आरोपही त्यांनी केला. कोण आहेत तारिक अन्वर? तारिक अन्वर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक सदस्य आहेत. त्यांनी 1999 मध्ये शरद पवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचा राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली होती. दिवंगत पीए संगमा, शरद पवार आणि तारिक अन्वर यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या विदेशी मुळाचा मुद्दा उपस्थित करत काँग्रेसचा राजीनामा दिला होता. शरद पवार राफेलवर काय म्हणाले? “राफेल डीलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उद्देशावर लोकांना संशय आहे, असं मला वाटत नाही. विमानाशी संबंधित तांत्रिक माहिती सार्वजनिक करण्याच्या विरोधकांच्या मागणीत काही अर्थ नाही,” असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलं होतं. मात्र विमानांच्या किंमतीची माहिती जाहीर करण्यात कोणतंही नुकसान नसल्याचंही ते म्हणाले होते. महत्त्वाचं म्हणजे यानंतर भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी ट्वीट करुन शरद पवारांचे आभार मानले होते. पवारांची मोदींना क्लीन चिट नाही : राष्ट्रवादी शरद पवारांनी राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी क्लीन चिट दिलेली नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. केंद्र सरकारने विमानांच्या किंमतीचा खुलासा करावा आणि या प्रकरणाची संयुक्त संसदीय समितीद्वारे (जेपीसी) तपास करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ashok Dhodi Kidnap Case Palghar : मोठी बातमी! अशोक धोडींचा मृतदेह गाडीच्या डिक्कीमध्ये सापडलाMahakumbh:ममता कुलकर्णी आणि लक्ष्मी त्रिपाठीचे महामंडलेश्वर पद काढले, किन्नर आखाड्याकडून मोठी कारवाईRaj Thackeray - Eknath Shinde Pune : एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे  पुण्यात एका कार्यक्रमात एकत्रSanjay Shirsat on Dhananjay Munde : कुणी भगवानगडावर गेलं म्हणून मुंडेंबाबत शिरसाटांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
पुणेकरांनो सावधान! खासगी टँकरमधून घरी येणारं पाणी दूषित; GBS रोगाचा धोका, 15 पाँईटवर कारवाई
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
मृत्युपूर्वी गोपीनाथ मुंडेंनी इशारा दिला होता, सांभाळून राहा, पण ऐकलं नाही; प्रकाश महाजनांनी सांगितला भस्मासूर
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
धक्कादायक! तपोवन एक्सप्रेससमोर ट्रक आडवा; लोको पायलटने शहाणपणा दाखवला, दुर्घटना टळली
Palghar News: मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
मोठी बातमी ! शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींची ब्रीझा कार तलावातून बाहेर; मृतदेह पाहून उडाली खळबळ
Kash Patel : आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
आई वडिलांची ओळख करून दिली, जय श्री कृष्णा म्हणत अमेरिकन सिनेटमध्ये भाषण, लोकांनी जातीयवादी शिव्या दिल्या; एफबीआय संचालक काश पटेल काय काय म्हणाले?
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
... तर दिवसा मुदडे पडतील; नामदेव शास्त्रींच्या वक्तव्यावर धनंजय देशमुख संतापले, म्हणाले, आमची मानसिकता काय असेल
Virat Kohli : 12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
12 वर्षातून एकदा होणारच, म्हणून रणजीच्या नादाला लागला नाही, स्टम्प गेली काश्मीरमधून कन्याकुमारीला ते चिली पनीर; किंग कोहली आऊट होताच मीम्सचा महापूर!
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
मला राज्यपाल करणं म्हणजे माझ्या तोंडाला कुलूप लावणं, मी मोकळा बरा; छगन भुजबळांची नाराजी पुन्हा उघड
Embed widget