India Pakistan War: मॉकड्रील दाखवायला पण भारताचा वेगळाच डाव? फक्त युद्धाचा सराव केल्यानेच पाकिस्तान भिकेला लागणार
India Pakistan War: भारत आणि पाकिस्तान यांच्यात कोणत्याही क्षणी युद्धाला तोंड फुटण्याची शक्यता. पाकिस्तानला भारताशी लगेच युद्ध करायचे आहे. यामागील महत्त्वाचे कारण समोर

Mock Drill in India: भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यामुळे गृहमंत्रालयाने देशभरात युद्धसराव (India Pak War) अर्थात मॉकड्रील (Mock Drill) करण्याचे आदेश दिले आहे. मात्र, या मॉक ड्रिलमुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये आणि त्यासोबतच दिलेल्या सगळ्या सूचना पाळाव्यात, असे आवाहन ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी केले आहे.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती जरी असली तरीही पाकिस्तानसाठी हे युद्ध कठीण आहे. मात्र पाकिस्तान सोबत चीन (China) असल्यामुळे पाकिस्तान हे युद्ध करू शकतं अशी शक्यता ही व्यक्त केली. पाकिस्तान जर युद्धाचा सराव करत असेल तर हे भारतासाठी चांगले आहे. त्यामुळे पाकिस्तानचा खर्च देखील होतोय आणि त्यांना खर्चात पाडणं, सरावासाठी वापरण्यात येणाऱ्या विमानांच्या खर्चामुळे त्यांचे नुकसान होऊ शकतं आणि त्यांचं नुकसान हे भारतासाठी चांगलं आहे, असे ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी म्हटले.
विमानाचा, क्षेपणास्त्र किंवा ड्रोनचा हल्ला (Air strike) होण्याची शक्यता असलेल्या परिसरात ब्लॅकआऊट केले जाते. नागरी भागात एअर डिफेन्स नसतो. त्यामुळे हल्ला झाल्यास नागरिकांना स्वत:च संरक्षण करावे लागते. हवाई हल्ल्याचा सायरन वाजल्यानंतर नागरिकांनी सर्वप्रथम घरातील सर्व लाईट बंद केले पाहिजेत. कारण लाईट सुरु राहिले तर शत्रूच्या विमानांना त्यांचे लक्ष्य सहजपणे नजरेस पडेल. घरातील लाईट बंद केल्यानंतर नागरिकांनी इमारतीमधून खाली यावे आणि पार्किंग एरियात जमावे. जेणेकरुन आजुबाजूला हवाई हल्ला झाल्यास नागरिकांना कोणतीही दुखापत होणार नाही. याशिवाय, नागरिकांनी सायरन वाजल्यानंतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस तातडीने बंद करावीत, असे ब्रिगेडिअर हेमंत महाजन यांनी सांगितले.
देशभरात मॉकड्रीलच्या तयारीला वेग
दिल्लीतील केंद्रीय गृह सचिवांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना ब्रिफिंग होणार. मॉकड्रील संदर्भात केंद्रीय गृहविभागाच्यासोबतच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांना माहिती दिली जाणार आहे. मुख्य सचिवांकडून हे ब्रिफिंग होणार असल्याची माहिती. केंद्रीय गृह सचिवांच्या बैठकीत राज्यांचे मुख्य सचिव आणि नागरी संरक्षण प्रमुख व्हीसीद्वारे उपस्थित असतील. त्या अनुषंगाने देशातील 244 जिल्ह्यांमध्ये नागरी संरक्षणाच्या तयारीसंदर्भात बैठका होतील.
राज्यातील 16 ठिकाणी उद्या होणार युद्धाची मॉकड्रील
१. मुंबई
२. उरण-जेएनपीटी
३. तारापूर
४. पुणे
५. ठाणे
६. नाशिक
७. थळ-वायशेत
८. रोहा-धाटाव-नागोठाणे
९. मनमाड
१०. सिन्नर
११. पिंपरी-चिंचवड
१२. संभाजीनगर
१३. भुसावळ
१४. रायगड
१५. रत्नागिरी
१६. सिंधुदुर्ग
आणखी वाचा
























