एक्स्प्लोर

LPG Cylinder Booking Rule : गॅस सिलेंडर बुकिंगचा नियम बदलला, ग्रामीण भागात 25 नव्हे तर 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग, कालावधी दुप्पट

LPG Cylinder Booking Rule : एलपीजी सिलेंडरच्या साठेबाजी आणि काळाबाजाराची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने ग्रामीण भागातील गॅस बुकिंगचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

LPG Cylinder Booking Rule : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा फटका आता भारतीय स्वयंपाक घराला बसत असल्याचं दिसतंय. याच पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या वातावरणात केंद्र सरकारने सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे. नव्या नियमानुसार, ग्रामीण भागात आता 45 दिवसांनंतरच एलपीजी सिलेंडर बुक करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचे अंतर ठेवून बुकिंग करता येईल. केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत ही माहिती दिली. 

यापूर्वी देशभरात सिलेंडर बुकिंगसाठी 21 दिवसांचा कालावधी निश्चित होता, जो अलीकडे 25 दिवसांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता ग्रामीण आणि शहरी, या दोन्ही भागांसाठी वेगवेगळी कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. 

LPG Booking Interval : ग्रामीण व शहरी भागासाठी वेगळे नियम

नवीन व्यवस्थेनुसार ग्रामीण भागातील ग्राहकांना 45 दिवसांनंतर दुसऱ्या सिलेंडरची बुकिंग करता येणार आहे, तर शहरी भागात 25 दिवसांचा कालावधी ठेवण्यात आला आहे. सरकारच्या मते, या निर्णयामुळे गॅस पुरवठ्यावर अचानक पडणारा दबाव कमी होण्यास मदत होईल.

Gas Shortage Rumours : अफवांमुळे वाढली होती घाईघाईची बुकिंग

गॅस टंचाईच्या अफवांमुळे अनेक ग्राहक गरजेपेक्षा आधीच सिलेंडर बुक करू लागले होते. जे ग्राहक आधी सुमारे 55 दिवसांनी सिलेंडर बुक करत होते, ते आता फक्त 15 दिवसांच्या अंतराने बुकिंग करू लागले होते. यामुळे साठेबाजी आणि काळाबाजाराची शक्यता वाढली होती. याच पार्श्वभूमीवर बुकिंगमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. 

Parliament Statement On Gas Shortage : संसदेत हरदीप पुरी यांची माहिती

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी संसदेत सांगितले की, देशात पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीचा कोणताही तुटवडा नाही. ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी सरकारने काही महत्त्वाचे उपाय केले आहेत.

Crude Oil Supply : भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती सुरक्षित

लोकसभेत बोलताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, जगात सध्या ऊर्जा क्षेत्रात मोठा तणाव निर्माण झाला असला तरी भारताची कच्च्या तेलाची पुरवठा स्थिती सुरक्षित आहे. भारत अनेक देशांकडून कच्चे तेल खरेदी करत आहे, त्यामुळे देशातील ऊर्जा पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश आले आहे असं ते म्हणाले. 

LPG Supply Update : देशात एलपीजीची कमतरता नाही

एलपीजी संकटाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना हरदीप पुरी यांनी सांगितलं की, गेल्या पाच दिवसांत एलपीजी उत्पादनात 28 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 33 कोटी भारतीय कुटुंबांच्या स्वयंपाकघरात गॅसची कमतरता भासू नये ही सरकारची प्राथमिकता असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

Opposition Reaction On LPG Shortage : राहुल गांधी यांच्याकडून मुद्दा उपस्थित

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एलपीजीबाबत चिंता व्यक्त करत रेस्टॉरंट बंद होत असल्याचं आणि लहान व्यापाऱ्यांवर परिणाम होत असल्याचं सांगितलं. यावर उत्तर देताना हरदीप सिंह पुरी म्हणाले की, हा अफवा पसरवण्याचा किंवा चुकीची माहिती देण्याचा काळ नाही, आणि देशात गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

ही बातमी वाचा:

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Maharashtra Live News Updates: 'सुनेत्रा पवार सगळ्यांना पुरून उरतील'; अभिनेते सयाजी शिंदे यांचे मोठे वक्तव्य 
Census 2027: जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली?; जनगणनेवेळी तुम्हाला विचारले जाणारे 40 प्रश्न; पाहा संपूर्ण यादी!
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार

व्हिडीओ

Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
श्रीलंका म्हणू शकतो का, भारत माझा देश आहे? त्यामुळे शिवसेना उद्धव ठाकरेंचीच, राष्ट्रवादी फक्त शरद पवारांची, अदृश्य शक्तीने दोन संविधानिक पक्ष फोडण्याचे पाप केले; सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय आर्थिक परिस्थिती झालीय सांगतो; रोहित पवारांचे उद्योग मंत्री उदय सामतांना ओपन चॅलेंज
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही, श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज; सोनम वांगचूक काय काय म्हणाले?
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
चीन-पाकिस्तानची दोस्ती हिमालयापेक्षाही बुलंद, असीम मुनीरांच्या नेतृत्वात दुश्मनला हरवलं, ट्रम्पमुळेच युद्ध थांबलं, काश्मीरवर भूमिका बदलणार नाही; पाकिस्तानी पंतप्रधानांची भारताला धमकी
CJI Suryakant: हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
हा माझ्या आणि विद्यार्थ्यांमधील प्रश्न, बार कौन्सिलला यात हस्तक्षेप करण्याचा काय अधिकार? विरोध करत आहेत, तर करू द्या, सरन्यायाधीशांकडून 'सर्वोच्च' फटकार
Gold Silver Price Today: सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
सोने खरेदी करण्याची हीच योग्य वेळ? एकाच दिवसात तब्बल 2,800 रुपयांची घसरण; पाहा सोने-चांदीचे ताजे दर
Aus vs Ban 1st Test Day 2 : Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Tanzid Hasanने इतिहास-भूगोल बदलला! ऑस्ट्रेलियाच्या तगड्या गोलंदाजीसमोर झुंजार शतक; बांगलादेशने कांगारूंच्या खेळाडूंना आणलं रडकुंडीला
Swapnil Lande Bhondubaba Pune Marathi News: मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो आणि म्हणतो...; पुण्यातील भोंदूबाबा स्वप्नील लांडेंवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप, नेमकं प्रकरण काय?
Embed widget