भारत यात्रेत सहभागी झालेली देविका कोण आहे? 26/11 च्या दहशतवादी हल्ल्यात कसाबनं जिच्या पायावर झाडली होती गोळी
Devika Rotawan : मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात देविका रोटवन हिच्या पायाला गोळी लागली होती.
Devika Rotawan : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेत देशातील अनेक दिग्गज लोक सहभागी झाले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वेळोवेळी ट्विटर त्यांचे फोटो देखील शेअर केले आहेत. नुकताच राहुल गांधी यांनी असाच एक फोटो शेअर केला आहे. देविका रोटवान नावाची मुलगी राहुल गांधींसोबत 'भारत जोडो यात्रे'मध्ये सहभागी झाली होती. राहुल गांधी देविकासोबत बोलताना दिसत आहे. राहुल गांधी यांनी फोटो शेअर केलेल्या देविका रोटवनबाबत जाणून घेण्यासाठी अनेकांनी रीट्विट करत तीच्याब्दल विचारले आहे.
देविकासोबतचा एक फोटो ट्विट करत राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, "वयाच्या 9 व्या वर्षी 26/11 च्या मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेली देविका रोटवान आता देशाला न्याय मिळवून देण्यासाठी साक्षीदार बनली आहे. देविकाच्या देशभक्तीचा सन्मान करताना राजस्थान सरकार तिचे स्वतःचे घराचे स्वप्न पूर्ण करत आहे. देविका तुझा अभिमान आहे.
9 साल की उम्र में, देविका रोटावन 26/11 के आतंकी हमले में घायल हुईं, फिर देश को न्याय दिलवाने के लिए गवाह बनीं।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 21, 2023
हाल ही में, वो #BharatJodoYatra में भी शामिल हुईं।
राजस्थान की सरकार उनकी देशभक्ति को सम्मानित करते हुए उनके अपने घर के सपने को पूरा कर रही है। आप पर गर्व है, देविका! pic.twitter.com/2hRsNWBeUW
मुंबईत 26 नोव्हेंबर 2008 रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात देविका रोटवन देखील सापडली होती. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांनी 26 नोव्हेंबर रोजी मुंबईत दहशत निर्माण केली होती. देविका रोटावन (तेव्हा 9 वर्षे 11 महिन्यांची) या हल्ल्याची सर्वात तरुण साक्षीदार ठरली. जिच्या साक्षीवर कसाबला फाशी देण्यात आली. परंतु, या घटनेनंतर देविकाला खूप वाईट अनुभव आले. देविकाने स्वत: त्याबाबत सांगितले आहे.
"26 नोव्हेंबर 2008 रोजीच्या हल्ल्यात कसाबने तिच्या पायावर गोळी झाडली. या घटनेच्या अनेक वर्षांनंतर देविकाने एका मुलाखतीत सांगितले की, “त्या हल्ल्यानंतर जणू आमचे आयुष्यच ठप्प झाले होते. दहशतवाद्यांच्या भीतीने शेजारी आणि नातेवाईकांनीही आमच्यापासून दूर राहणे पसंत केले. आम्हाला राहायला घर देखील मिळत नव्हते. पप्पा छोटी नोकरी करायचे. भावालाही काम मिळत नव्हते."
आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न
देविकाचे वडील नटवरलाल म्हणाले की, मुंबई हल्ल्यानंतर तिच्या शाळेत शिकणाऱ्या मुलेही माझ्या मुलीपासून दुरावले होते. लोक आमच्यासोबत बोलत देखील नव्हते. अशा दु:खद आठवणी आल्या की आजही माणूस हादरतो. देविकाचे आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न आहे."