Haryana Violence : पाकिस्तानातून हरियाणामध्ये हिंसाचार भडकावणारा झीशान मुश्ताक कोण आहे? वाचा सविस्तर
Haryana Violence Pakistan Connection : हरियाणात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या ब्रज मंडल यात्रेवर झालेल्या दगडफेकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे.
Haryana Violence Pakistan Connection : हरियाणात (Haryana Violence) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या ब्रज मंडल यात्रेवर झालेल्या दगडफेकीनंतर उसळलेल्या हिंसाचारात पाकिस्तानी कनेक्शन समोर आले आहे. पोलिस तपासात एका पाकिस्तानी यूट्यूबरचे नाव समोर आले, ज्याने व्हिडीओ पोस्टद्वारे लोकांना भडकवण्याचा प्रयत्न केला होता. झीशान मुश्ताक असे आरोपीचे नाव आहे. अहसान मेवाती पाकिस्तानी या नावाने त्यांनी सोशल मीडिया अकाउंट सुरू केले होते. त्याने आपले ठिकाण राजस्थानमधील अलवर असल्याचे सांगितले. मात्र, तपासातून सत्य समोर आले. त्यानुसार, झीशान पाकिस्तानातील इस्लामाबाद आणि लाहोरमधून व्हिडीओ पोस्ट करत होता. हरियाणा पोलिस लवकरच त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहेत.
मोनू मानेसरला मारण्यासाठी प्रवृत्त केले
खरंतर, हरियाणा पोलिसांची सोशल मीडिया टीम नुकत्याच सक्रिय झालेल्या आणि सतत प्रक्षोभक पोस्ट अपलोड केलेल्या सर्व मीडिया प्रोफाईलची तपासणी करत आहे. यात त्यांना अहसान मेवातीची प्रोफाईल सापडली. हिंसाचार झाला तेव्हा तो जाळपोळ आणि तोडफोडीचे व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध करत होता, असा आरोप आहे. पोलीस आता तपास करत आहेत की झीशानचे नुहमध्ये काही नेटवर्क कार्यरत आहे का? कारण तो बजरंग दलाचा नेता आणि गोरक्षक मोनू मानेसर यांना मारण्यासाठी लोकांना भडकवत होता आणि नूहमध्ये हिंसाचार भडकावत होता.
YouTube ने लाहोरमधून पोस्ट केलेले चॅनल काढून टाकले
यूट्यूबने झीशान मुश्ताकचे अहसान मेवाती पाकिस्तानी चॅनल काढून टाकले आहे. भारतीय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्याच्या चॅनलवर 273 व्हिडीओ आणि 80 हजार फॉलोअर्स होते. त्याने आपला पत्ता इस्लामाबाद दाखवल्याचे तपासात समोर आले आहे. तसेच त्याचा आयपी अॅड्रेस पाकिस्तानी नेटवर्क PERN मध्ये होता. ज्याचे पूर्ण नाव पाकिस्तान एज्युकेशन अँड रिसर्च नेटवर्क आहे, जे पाकिस्तान सरकारच्या IT कृती योजना 2002 चा भाग आहे. PERN पाकिस्तानमधील शैक्षणिक संस्थांना इंटरनेट नेटवर्क पुरवते.
27 जुलै रोजी, अहसान पंजाब प्रांतातील सरगोधाजवळील कोट मुमिन येथे 37.111.151.79 आयपी पत्त्यासह टेलिनॉर ब्रॉडबँड नेटवर्क वापरून त्याचा एक आग लावणारा व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी गेला.
1 ऑगस्ट रोजी तो लाहोरला गेला, जिथे त्याने व्हिडीओ अपलोड करण्यासाठी 223.123.16.231 IP पत्ता वापरून Zong ब्रॉडबँड नेटवर्कवर स्विच केले. पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बिस्मिल्ला माँटेसरी शाळेच्या क्रिकेट मैदानाजवळ त्याचा पहिला व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या :