एक्स्प्लोर
Advertisement
मला जे योग्य वाटलं ते केलं : राजनाथ सिंह
राफेल विमान ताब्यात घेताना केलेल्या पूजनामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. राफेल मिळाल्याने वायुसेनेची क्षमता वाढली आहे.
नवी दिल्ली : दसऱ्याच्यादिवशी पहिलं राफेल लढाऊ विमान फ्रान्सने भारताच्या ताब्यात दिलं. राफेल विमान ताब्यात घेताना केलेल्या पूजनामुळे निर्माण झालेल्या वादावर अखेर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. ' मला जे योग्य वाटते तेच मी करतो. या विश्वात एक महाशक्ती आहे, अशी माझी श्रद्धा आहे. तसेच माझासुद्धा लहानपणापासून या गोष्टींवर विश्वास आहे’ , असे राजनाथ सिंह यांनी भारतात परतल्यावर म्हटले आहे.
फ्रान्स दौरा आणि राफेल विमान उड्डाणाचा अनुभवदेखील त्यांनी या वेळी कथन केला. सिंह म्हणाले, राफेल विमान प्रति तास 1800 किमी वेगाने उड्डाण करु शकते. मी या विमानातून १३०० किमी प्रति तास वेगाने उड्डाण केले. तसेच राफेल विमानाचा करार हा पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे शक्य झाला आहे.
राफेल मिळाल्याने वायुसेनेची क्षमता वाढली आहे. ना घाबरणार, ना घाबरवणार, पण आमची ताकद वाढवत राहणार. राफेल विमान हे कोणाला घाबरवण्यासाठी नाही. तर राफेल विमान फक्त वायुसेनेची ताकद वाढवण्यासाठी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
राफेलची निमिर्ती दसॉल्ट या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. विमान ताब्यात घेताना भारतीय परंपरेनुसार त्यांनी विमानावर ओम चिन्ह रेखाटत नारळ वाहिला होता. तसेच चाकाखाली लिंबू ठेवले होते. राफेलच्या या पूजेवरुन राजनाथसिंह सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल झाले होते. सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी काही मिम्स देखील तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र
Advertisement