एक्स्प्लोर

Zero FIR : झीरो एफआयआर म्हणजे काय? तो कसा नोंदवायचा? प्रत्येक महिला-मुलीला माहिती असाव्यात या गोष्टी... 

Manipur Violence Zero FIR News: गुन्हा जर बलात्कारासारखा गंभीर असेल तर त्यामध्ये झीरो एफआयआर अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पीडितेला जलदगतीने न्याय मिळण्यासाठी याचा उपयोग होतो. 

Zero FIR : मणिपूर हिंसाचारानंतर आता जेवढे काही गुन्हे नोंद करण्यात आलेले आहेत त्यामध्ये झीरो एफआयआरची संख्या मोठी असल्याचं समोर येत आहे. त्यामुळे झीरो एफआयआर ही संकल्पना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. झिरो एफआयआर म्हणजे काय, त्याचा उद्देश काय, तो कसा नोंदवायचा आणि गंभीर प्रकरणात त्याचे महत्त्व काय हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात.

What Is Zero FIR : झिरो एफआयआर म्हणजे काय?

कोणतीही घटना, अपघात किंवा गुन्हेगारी घटनेच्या प्राथमिक माहितीला एफआयआर (First Information Report - FIRs) म्हणतात. त्या अंतर्गत गंभीर गुन्ह्याच्या संबंधात, पोलीस CrPC च्या कलम-154 नुसार गुन्हा नोंदवतात, गंभीर नसलेल्या गुन्ह्याबद्दल  पोलीस CrPC च्या कलम-482 नुसार गुन्हा नोंदवतात.

घटनेचा तपशील पोलिस ठाण्यात लेखी नोंदवला जातो, त्याची एक प्रत तक्रारदाराला दिली जाते. एफआयआरची ही प्रत अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज आहे.

एखाद्या गुन्ह्याची आपण तक्रार करायला पोलिस स्टेशनमध्ये गेल्यानंतर पोलिस आपल्याला पहिला प्रश्न विचारतात... गुन्हा कुठे घडला? तो गुन्हा जर त्यांच्या हद्दीत घडला तर त्याची नोंद घेतली जाते, अन्यथा दुसऱ्या स्टेशनमध्ये जावून तक्रार नोंद करण्याचा सल्ला दिला जातो. हा सीन अनेक हिंदी चित्रपटातूनही आपल्याला दिसतो. 

पण गुन्हा कोणत्याही ठिकाणी घडो, त्यांची नोंद आपल्या जवळच्या किंवा सोयीस्कर ठाण्यात करता येते. याचाच झीरो एफआयआर म्हटलं जातं. दुसऱ्या ठाण्यात नोंद करण्यात आलेल्या या तक्रारीला कोणताही विशेष नंबर दिला जात नाही, त्यामुळे त्याची नोंद ही झीरो एफआयआर अशी केली जाते. 

नंतर पुढील तपासासाठी संबंधित पोलिस ठाण्याला तो गुन्हा हस्तांतरित केला जातो. झिरो एफआयआर मिळाल्यानंतर, संबंधित पोलीस स्टेशन नवीन एफआयआर नोंदवते आणि तपास सुरू करते.

झिरो एफआयआरची तरतूद केव्हा करण्यात आली?

दिल्लीमध्ये 2012 साली निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण घडलं आणि त्यानंतर महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. या घटनेनंतर न्यायमूर्ती वर्मा समितीने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही शिफारशी केला. त्यामध्ये या झीरो एफआयआरची शिफारस करण्यात आली होती. 

महिलांवरील लैंगिक अत्याचाराचा आरोप असलेल्या गुन्हेगारांवर जलदगतीने खटला चालावा, त्यासंबंधी गुन्हा नोंदवताना उशीर होऊ नये यासाठी झीरो एफआयआरची गरज असल्याचं या समितीने सांगितलं. 

पीडित व्यक्तीचे राहण्याचे ठिकाण किंवा गुन्हा घडवण्याचे ठिकाण कोणतंही असो, कोणत्याही पोलिस ठाण्यात त्याला झीरो एफआयआर दाखल करता येऊ शकतं. 

Objective of a Zero FIR :  झीरो एफआयआरचा उद्देश काय?

एखाद्या पीडितेला पोलिस तक्रार करण्यासाठी दारोदारी भटकावे लागू नये, तिला तात्काळ न्याय मिळण्यासाठी पावले उचलण्यात यावीत हा यामागचा उद्देश आहे. ही तरतूद पीडितेच्या तक्रारीचे जलद निवारण करण्यासाठी आहे जेणेकरून एफआयआर नोंदवल्यानंतर वेळेवर कारवाई करता येईल.

Supreme Court On Zero FIR : झीरो एफआयआरवर सर्वोच्च न्यायालयाचे मत काय? 

सन 2008 साली उत्तर प्रदेशमध्ये एक घटना घडली होती. एक लहान मुलगी बेपत्ता झाल्यानंतर पोलिसांनी एका महिन्यानंतर त्याची तक्रार दाखल करुन घेतली होती. गुन्हा ज्या भागात घडला आहे त्या भागात तक्रार दाखल करावी असं सांगत पोलिसांनी तो गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केला होता. त्यावर तत्कालीन न्यायमूर्ती आर.एस. सोधी यांनी म्हटलं होतं की, गुन्हा ज्या भागात झाला आहे त्या क्षेत्राकडे दुर्लक्ष करून, पोलिस अधिकारक्षेत्राच्या आधारावर एफआयआर नोंदवण्यास नकार देऊ शकत नाहीत. गुन्हा कोणत्याही पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला तरीही पोलिसांना प्रत्येक परिस्थितीत पीडितेची एफआयआर नोंदवावी लागेल. 

How To Register Zero FIR : झिरो एफआयआर कसा नोंदवायचा? 

झिरो एफआयआर नोंदवण्यासाठी तक्रारदाराने स्वतः पोलिस ठाण्यात जाण्याची गरज नाही.

तक्रारदाराचा कोणताही नातेवाईक, मित्र पोलीस ठाण्यात जाऊन गुन्ह्याबाबत तक्रार नोंदवू शकतो.

कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत, पीडित व्यक्ती फोन कॉल किंवा ई-मेलद्वारे त्याच्या गुन्ह्याची एफआयआर नोंदवू शकते.

एफआयआरच्या वैधतेसाठी संबंधित पोलिस स्टेशनचा शिक्का आणि पोलिस अधिकाऱ्याची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

Why Zero FIR Is Important : झिरो एफआयआर नोंदवणे का आवश्यक आहे?

दखलपात्र गुन्ह्याच्या श्रेण्या असलेल्या सर्व गुन्हेगारी प्रकरणांमध्ये, पोलिसांना ताबडतोब झीरो एफआयआर नोंदवावा लागतो. याशिवाय केस हस्तांतरित करण्यापूर्वीच या प्रकरणाचा तपास सुरू करावा लागतो, जेणेकरून सुरुवातीचे पुरावे नष्ट होऊ नयेत आणि त्या पुराव्यांशी कोणी छेडछाड करू नये.

ज्या पोलीस ठाण्यात या प्रकाराची तक्रार नोंदवली जाते, ते त्याच्या प्राथमिक तपास अहवालासह नंतर घटनास्थळाशी संबंधित पोलीस ठाण्यात प्रकरण वर्ग करतात. या संपूर्ण प्रक्रियेला झिरो एफआयआर म्हणतात.

Zero FIR In Rape Case : बलात्काराच्या प्रकरणात शून्य एफआयआर नोंद करणे कितपत उपयुक्त ठरते?

बलात्कार पीडित महिला एफआयआर नोंदवण्यासाठी संबंधित पोलिस ठाण्यात गेल्यावर तिला अपमानित करून तेथून हाकलून दिल्याचे अनेकदा दिसून येते. काही प्रकरणांमध्ये असे देखील घडते की, बलात्कार एका ठिकाणी केला जातो आणि त्या पीडितेला गुन्हेगार दुसऱ्या ठिकाणी फेकून देतात. अशा परिस्थितीत झिरो एफआयआर हा एकमेव पर्याय आहे ज्याद्वारे पीडिता पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवू शकते. अशा गुन्ह्यांतील पीडितांच्या तक्रारी नोंदविण्यास पोलीस नकार देऊ शकत नाहीत.

ही बातमी वाचा :

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 headlines | शंभर हेडलाईन्स बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर वेगवान ABP Majha : 28 March 2025Kunal Kamra Update : येत्या ३१ मार्च रोजी कुणाल कामरा मुंबई पोलिसांसमोर हजर राहणारABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 28 March 2025Disha Salian Case News : दिशा सालियन प्रकरणावरुन राजकीय घमासान, सत्ताधारी आणि विरोधक काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 मार्च 2025 | शुक्रवार
DA Hike : महागाई भत्ता 2 टक्के वाढला, 50000 मूळ वेतन असलेल्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रानं महागाई भत्ता 2 टक्के वाढवला,50000 मूळ वेतन असलेल्यांचा पगार कितीनं वाढणार?
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
बंगळुरू ते सातारा... औषध पिऊन रोडवर बसला, मदतीसाठी एकाने रुग्णालयात नेला अन् राकेश पोलिसांना सापडला
Namo Shetkari : मोठी बातमी :  शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
Namo Shetkari : मोठी बातमी : शेतकऱ्यांचा गुढीपाडवा जोरात, उद्यापासून नमो शेतकरी योजनेचे 2 हजार रुपये खात्यात येणार!
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
बाॅयफ्रेंडशी का बोलू देत नाहीस? नवऱ्याने रात्री कामावरून घरी येताच काॅफी मागितली अन् संतापलेल्या बायकोनं सासूला ओपन चॅलेंज देत..
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
मूळचा धनंजय मुंडेंचा माणूस, वाल्मिकशी काय नातं; मारहाणीवेळी संतोष देशमुखांनी नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?
Kumbh Mela 2027 : मोठी बातमी : त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
त्र्यंबकमध्ये गोदावरी मोकळा श्वास घेणार, कुशावर्तासारखे पवित्र कुंड तयार करणार; कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांची घोषणा
DA Hike News : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, 7 वर्षातील सर्वात कमी वाढ, पगार किती रुपयांनी वाढणार?
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी, महागाई भत्ता 2 टक्क्यांनी वाढला, पगार किती रुपयांनी वाढला?
Embed widget