एक्स्प्लोर
Triple Lockdown | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केरळमध्ये ट्रिपल लॉकडाऊन!
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी केरळ मधील तिरुवनंतपुरममध्ये ट्रिपल लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. हा लॉकडाऊन प्रभावी ठरत असल्याचे बोलले जात आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
तिरुवनंतपुरम : देशात सर्वात आधी कोरोना संक्रमित रुग्ण केरळमध्ये आढळला होता. मात्र, केरळने चांगल्या प्रकारे कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात यळ मिळवले आहे. महाराष्ट्राने देखील कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी केरळ प्रशासनाचं मार्गदर्शन घेतलं आहे. आता केरळच्या तिरुवनंतपुरम ट्रिपल लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. काय असतो हा ट्रिपल लॉकडाऊन? जाणून घेऊया. तिरुवनंतपुरममध्ये रविवारी नवीन 27 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे या ठिकाणी कोरोनाचा संसर्गा रोखण्यासाठी तिरुवनंतपुरम प्रशासनाने ट्रिपल लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहे ट्रिपल लॉकडाऊन?
- ट्रिपल लॉकडाऊन ही कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठीची योजना आहे.
- ट्रिपल लॉकडाऊनमध्ये तीन टप्पे असतात.
- या लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात नियोजित क्षेत्रात लॉकडाऊन करणे, सध्या तिरुअनंतपुरम महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन करण्यात आलय. या क्षेत्रात कोणालाही येण्या-जाण्यासाठी बंदी असते.
- दुसऱ्या टप्प्यात क्लस्टर ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत, ते लॉक केलं जातात. जेथून कोरोना संसर्ग पसरण्याचा जास्त धोका असतो.
- तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तीचं घर लॉक केलं जातं. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती किंवा त्यांच्या संपर्कात आलेले सर्वजण घरातचं राहतील याची काळजी या लॉकडाऊनमध्ये घेतली जाते. जेणेकरुन संसर्ग पसरणाऱ्याला आळा बसेल.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
मुंबई
बातम्या
क्राईम





















