ट्रम्प यांचं 'एअर फोर्स वन' आणि मोदींचं 'एअर इंडिया वन'मध्ये फरक काय?
भारतीय पंतप्रधानांचं विशेष विमान एअर इंडिया वन या नावाने ओळखलं जातं. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं विशेष विमान एअर फोर्स वन हे आहे. जाणून घेऊया मोदींच्या एअर इंडिया वन आणि ट्रम्प यांच्या एअर फोर्स वनची वैशिष्ट्ये..
मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यासोबतच त्यांचं विशेष विमान एअर फोर्स वन पुन्हा एकदा चर्चेत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती जेव्हा परदेश दौऱ्यावर जाते तेव्हा उड्डाणादरम्यान अवकाशातही त्यांच्या सुरक्षेचा कडेकोट बंदोबस्त असतो. कोणताही हल्ला रोखू शकतो अशी अत्याधुनिक यंत्रणा एअर फोर्स वनमध्ये आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या एअर फोर्स वनबद्दल बोलत असताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष विमान एअर इंडिया वनबाबत जाणून घेण्याचीही उत्सुकता असेलच. तर जाणून घेऊया मोदींच्या एअर इंडिया वन आणि ट्रम्प यांच्या एअर फोर्स वनची वैशिष्ट्ये..
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विशेष विमान एअर इंडिया वन या नावाने ओळखलं जातं. हे बोईंग 747-400 विमान आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या हवाई प्रवासासाठी या विमानाचा वापर केला जातो. तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं विशेष विमान एअर फोर्स वन हे खास पद्धतीची निर्मिती असलेल्या बोईंग 747-200B सीरिजच्या विमानांपैकी एक आहे.
उडणारा किल्ला एअर इंडिया वन हे विमान एकाप्रकारे 'उडणारा किल्ला' आहे, ज्यात अत्याधुनिक उपकरणं आहेत. एअर इंडिया वनचं डिप्लॉयमेंट नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावरील द एअर हेडक्वॉर्टर्स कम्युनिकेशन स्क्वॉड्रनकडे आहे. उडणारं व्हाईट हाऊस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वनचं डिप्लॉयमेंट अमेरिकेच्या वायुसेनेकडे असतं. ट्रम्प यांचं विमानही 'उडणारं व्हाईट हाऊस' समजलं जातं. विमानात असूनही अमेरिकेचे अध्यक्ष संपर्कात राहू शकतात. तसंच अमेरिकेवर हल्ला होण्याच्या परिस्थितीत मोबाईल कमांड सेंटरप्रमाणे या विमानाचा वापर करता येऊ शकतो. अडवान्स्ड सिस्टम पंतप्रधानांच्या प्रवासाच्या वेळी एअर इंडिया वनचं रुपांतर मिनी पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) होतं. यात अत्याधुनिक संचार माध्यम आहेत. तर एअरफोर्स वनमध्येही अतिशय आधुनिक आणि सुरक्षित कम्युनिकेशन सिस्टम आहे. केवळ राष्ट्राध्यक्षांसाठी एअर फोर्स वन समर्पित ज्यावेळी व्हीव्हीआयपींसाठी एअर इंडिया वन विमानाचा वापर होत नसेल तेव्हा ते सामान्य प्रवाशांच्या सेवेत दिलं जातं. पण ही व्यवस्था आता संपुष्टात येणार आहे. आता पंतप्रधानांसाठीचं नवं विशेष विमान सामान्य प्रवाशांच्या सेवेत कधीही दिलं जाणार नाही. दुसरीकडे, एअर फोर्स वन अमेरिकी राष्ट्राध्यक्षांसाठीच समर्पित आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं विशेष विमान एअर फोर्स वनच्या ताफ्यात दोन विमानं आहेत. जेव्हा एक विमान उड्डाण करतं, त्यावेळी दुसरं विमान स्टॅण्ड बाय मोडमध्ये असतं. अलर्ट मिळाल्याच्या काही मिनिटांतच उड्डाण करण्यासाठी हे विमान कायम सज्ज असतं. बोईंग 700-300erअमेरिकन विमान कंपनी बोईंग आपल्या डलासमधील प्लांटमध्ये भारतीय पंतप्रधानांचं बोईंग 700-300ER (एक्सटेंड रेंज) विमान बनवत आहे. यामध्ये जगातील सर्वात अत्याधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान आहे. विमानात मिसाईल सिस्टम आणि काऊंटर-मेजर डिस्पेंसिंग सिस्टम्स (CMDS) असेल. यामध्ये लार्ज एअरक्राफ्ट इन्फ्रारेड काऊंटर मेजर्स (LAIRCM) सेल्फ प्रोटेक्शन सूट्स (SPS) ही असतील.
दुसरीकडे काही कार्गो विमान कायम एअर फोर्स वनच्या पुढे असतात, ज्याद्वारे रिमोट लोकेशनमध्येही ट्रम्प यांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू नये. तसं पाहिलं तर हे कार्गो विमान अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या एअर फोर्स वनला सुरक्षा देण्याचंही काम करतं. एअर फोर्स वनला टक्कर देणार नवं B777-300ER भारताच्या पंतप्रधानांसाठी नव्याने मिळणाऱ्या विशेष विमानाची सुरक्षा निश्चित करण्यासाठी त्यात अॅडवान्स्ड इंटिग्रेटेड डिफेंसिव्ह इलेक्ट्रॉनिक वायरफेअर सूट आणि मिसाईल वॉर्निंग सेंसर्सही असतील. दुसरीकडे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या विमानात जी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणं असतील, त्यावर ईएमपी म्हणजेच इलेक्ट्रो मॅग्नेटिक पल्सचाही परिणाम होत नाही. ईएमपी अशी पॉवर आहे, ज्याचा वापर केल्यास जवळपासच्या सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणं काम करणं बंद करतात. 26 वर्षांनी भारताच्या पंतप्रधानांची विशेष विमान बदलणार 26 वर्षांपासून पंतप्रधानांसाठी विशेष विमान म्हणून सेवेत असलेल्या एअर इंडिया वनची जागा घेणारं बोईंग 700 -300ER यावर्षी जुलै महिन्यात भारतात येणार आहे. बोईंगने दोन 777-300 ER विमानांची मागील वर्षी जानेवारी महिन्यात डिलिव्हरी केली होती. दोन्ही विमानांना अत्याधुनिक सुरक्षा कवच देण्यासाठी अमेरिकेला परत पाठवली होती. आता अमेरिकेच्या डलास प्रांतात असलेल्या फोर्ट वर्थमध्ये या दोन्ही विमानांमध्ये अॅडवान्स्ड सिक्युरिटी फीचर्स जोडले जात आहेत.