एक्स्प्लोर

What is Rx : आता मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी', पण 'Rx' चा अर्थ काय? जाणून घ्या

Medical Prescription : मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी' लिहिण्याची सूचना मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. पण डॉक्टर 'Rx' का लिहितात? वाचा यामागचं कारण

Shri Hari instead of Rx : डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनवर (Medical Prescription) 'Rx' लिहिलेलं तुम्ही पाहिलं असेल. कोणताही डॉक्टर औषध लिहून देताना मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' लिहितात आणि त्या खाली औषध लिहून देतात. त्याशिवाय औषधांच्या पाकिटावरही Rx लिहिलेलं असतं. आता मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर 'Rx' ऐवजी 'श्री हरी' लिहिण्याची सूचना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी शनिवारी डॉक्टरांनी औषधांच्या चिठ्ठीवर Rx ऐवजी 'श्री हरी' लिहिण्याची सूचना केली आहे. याशिवाय औषधाचे नाव सुद्धा हिंदी भाषेत लिहिण्यास सांगितलं आहे. पण मुळात डॉक्टरांनी मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर Rx असं लिहिण्याचं कारण काय हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर येथे जाणून घ्या.

मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर Rx लिहिण्याचं कारण काय? Rx म्हणजे काय?

Rx हा एक लॅटिन भाषेतील चिन्ह आहे. Rx या शब्दाचा इंग्रजी भाषेत अर्थ टेक (Take) म्हणजे घेणे किंवा सेवन करणे असा आहे. मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर Rx लिहिण्याचा अर्थ डॉक्टर तुम्हाला लिहून दिलेली औषध घेण्यासाठी म्हणजे सेवन करण्यासाठी सांगत आहेत.

हा झाला 'Rx' चा सोपा अर्थ. पण 'Rx' शब्दाचा संबंध इजिप्तशी आहे. तो कसा ते वाचा

'Rx' चा इजिप्तशी संबंध

प्राचीन ग्रीस अर्थात सध्याचं इजिप्तने वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हॉरस हा इजिप्तचा एकमेव देव आहे, ज्याचे डोळे Rx सारखे दिसतात. या हॉरस देवाचा हा डोळा उत्तम आरोग्याचे प्रतिक असल्याचं मानलं जायचं आणि त्यामुळे इजिप्तमधील वैद्यांनी औषधांच्या चिठ्ठीवर 'Rx' चिन्ह लिहायला सुरुवात केली. त्यानंतर इतरांनी याचं अनुकलन केलं आणि 'Rx' लिहिण्याची पद्धत सर्वदूर पसरली.

इसवी सन पूर्व 2100 च्या सुमारात मेसोपोटेमियन सभ्यतेचा शोधामध्ये समोर आलं की, त्या काळात फक्त इजिप्तमध्येच उपचारासाठी गोळ्यांचा वापर केला जात होता. बगदादमध्ये आठव्या शतकात पहिला दवाखाना उघडण्यात आला. त्याच वेळी, सतराव्या शतकात अमेरिकेत पहिला दवाखाना उघडला गेला. जगातील पहिलं फार्मसी कॉलेज 1821 साली अमेरिकेमध्ये सुरु झालं.

मेडिकल सायन्समधील इतर कोडचा अर्थ

दरम्यान, डॉक्टरांकडून मेडिकल प्रिस्क्रीप्शनवर इतरही काही कोड किंवा शॉर्टकट लिहिले जातात. हे कोड औषध कधी घ्यावे याबाबत असतात. औषध दिवसातून किती वेळा औषध घ्यावे? जेवणापूर्वी घ्यायचं की जेवणानंतर? याचा अर्थ जाणून घ्या.

  • SOS : आवश्यकतेनुसार किंवा गरज भासल्यास
  • TID : दिवसातून तीनदा 
  • QID : दिवसातून चार वेळा 
  • qH : दर तासाला 
  • qOD : एक दिवसाआड
  • AC : जेवणापूर्वी 
  • PC : जेवणानंतर 
  • OD : दिवसातून एकदा 
  • BT / HS : झोपण्याच्या वेळी 
  • BBF : नाश्ता करण्यापूर्वी 
  • BD : रात्रीच्या जेवणापूर्वी 
  • Tw : आठवड्यातून 2 वेळा 
  • QAM : दररोज सकाळी 
  • QPM : दररोज रात्री 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Embed widget