एक्स्प्लोर

ओबीसी आयोगाला दिलेला घटनात्मक दर्जा काय सांगतो?

नवी दिल्ली : भाजपच्या सर्व ओबीसी खासदारांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. ओबीसी आयोगाची स्थापना करुन त्याला घटनात्मक दर्जा देण्यासंदर्भातलं विधेयक लोकसभेत नुकतंच मंजूर झालं. हे पाऊल ऐतिहासिक असल्याचं सांगत त्यांनी पंतप्रधानांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्रात मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या ओबीसी आयोगाची निर्मिती नेमकी कशी महत्वाची आहे, त्याचे राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात, यासंदर्भातला विशेष रिपोर्ट.. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग रद्द करुन त्याऐवजी ओबीसींसाठी नव्या आयोगाची निर्मिती मोदी सरकार करत आहे. त्यासाठी 123 व्या घटनादुरुस्तीला नुकतीच लोकसभेने मंजुरी दिली. जुन्या आयोगाला नसलेला घटनात्मक दर्जा या नव्या आयोगाला असेल, शिवाय एससी, एसटी आयोगाप्रमाणे काही प्रकरणांमध्ये सुनावणी करण्याचा अधिकारही मिळणार आहे. ओबीसी वर्गासाठी हे पाऊल ऐतिहासिक असल्याचं सांगत आज जवळपास 80 ओबीसी खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. लोकसभेत हे विधेयक मंजूर झालेलं असलं तरी राज्यसभेत मात्र ते विरोधकांनी रोखून धरलं. त्यामुळे आता ते सिलेक्ट कमिटीकडे पाठवण्यात आलंय. शिवाय घटनात्मक दर्जा असलेल्या आयोगामुळे ओबीसींबद्दलचे काही अधिकार हे राज्याकडून हिरावून घेतले जात असल्याची भीती विरोधकांना वाटत आहे. या आयोगाच्या निर्मितीमुळे नव्या जाती ओबीसी लिस्टमध्ये समावेश करणं काहीसं अवघड होणार आहे. कारण कुठलीही नवी जात समाविष्ट करायची असेल तर त्यासाठी थेट संसदेची मंजुरी लागेल. आयोगाच्या पाच सदस्यीय समितीने शिफारस केल्यानंतर ती प्रक्रिया सुरु होईल. अर्थात घटनात्मक दुरुस्तीच्या प्रक्रियेनंतरच तो बदल पूर्ण होईल. सध्या असलेल्या मागासवर्गीय आयोगाकडे 189 जातींची यादी कित्येक वर्षापासून प्रलंबित आहे. नव्या आयोगामुळे ही प्रतिक्षा वाढणार की वेगाने पूर्ण होणार याचीही उत्सुकता आहे. जाट, मराठा, पटेल आरक्षणाची मागणी होत असतानाच अशा पद्धतीने ओबीसींच्या आयोगाला घटनात्मक दर्जा देऊन मोदी सरकारने एक नवी चाल खेळली आहे. शिवाय यात सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासांसाठी आयोग असा उल्लेख आहे. आर्थिकदृष्ट्या हा शब्द नाही. त्यामुळे राज्यसभेत जेव्हा हे विधेयक येईल तेव्हा ते कुठल्या बदलांसहित येतं, याचीही उत्सुकता सगळ्यांना लागली असेल. तूर्तास तरी या आयोगाच्या निर्मितीमुळे आपले हक्क सुरक्षित झालेत, अशी भावना ओबीसी खासदारांच्या मनात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Laxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडेDhule Suicide Case : धुळ्यात एका कुटुंबातील चौघांची आत्महत्या, कारण स्पष्ट नाहीNagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget