Mithun Chakraborty joining BJP : मिथुनदाची सक्रिय राजकारणात एन्ट्री, आज भाजपमध्ये प्रवेश करणार
Mithun Chakraborty joining BJP : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकातामधील ऐतिहासिक ब्रिगेड ग्राऊंडमध्ये मोठी रॅली करणार आहेत. या सभेत अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा बीजेपी प्रवेश होणार आहे.
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये या महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकातामधील ऐतिहासिक ब्रिगेड ग्राऊंडमध्ये मोठी रॅली करणार आहेत. या सभेत अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा बीजेपी प्रवेश होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रॅलीत सहभागी होण्यासाठी मिथुन चक्रवर्ती कोलकातामध्ये दाखल झाले आहेत. रात्री उशीरा त्यांनी भाजपचे बंगाल प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांची भेट घेतली. मिथुन चक्रवर्ती आज दुपारी ब्रिगेड मैदानामध्ये भाजपमध्ये प्रवेश करतील. दिलीप घोष, कैलाश विजयवर्गीय त्यांना झेंडा देऊन भाजपची सदस्यता देणार आहेत, अशी माहिती आहे.
16 फेब्रुवारी रोजी मिथुन चक्रवर्ती यांनी आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांचीही भेट घेतली होती. तेव्हापासूनच मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.दरम्यान, मिथुन चक्रवर्ती राज्यसभेचे सदस्य होते. त्यांनी ममता बॅनर्जींचा पक्ष टीएमसीने मिथुन यांना राज्यसभेत खासदारकी दिली होती. ते 2014 पासून डिसेंबर 2016 पर्यंत टीएमसीकडून राज्यसभेत खासदार होते.
सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम या रॅलीत सौरव गांगुली सामील होणार नाही हे आतापर्यंत जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे तो भाजपात प्रवेश करणार अशी गेली काही दिवस चर्चा सुरू होती, ती शक्यता आता संपुष्टात आली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी दोन वाजता कोलकात्यातील ब्रिगेड मैदानावर पोहोचणार आहेत. त्यानंतर जवळपास एक तास ते नागरिकांना संबोधित करणार आहेत. ही रॅली आतापर्यंतची सर्वात मोठी रॅली असल्याचं सांगण्यात येतंय. पंतप्रधानांच्या आजच्या रॅलीमध्ये अभिनेता मिथुन चक्रवर्ती सामील होणार आहे. त्याने या आधी बंगालचे भाजप प्रभारी कैलास विजयवर्गीय यांची भेट घेतली आहे. गेली अनेक दिवस अशी चर्चा होती की भारतीय क्रिकेटचा माजी कर्णधार सौरव गांगुली भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. सौरव गांगुलीने त्या दरम्यान अनेक भाजप नेत्यांची भेट घेतली होती.
West Bengal | सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम, पंतप्रधानांच्या रॅलीतही नसणार |
2 वाजता परेड ग्राऊंडमध्ये पोहोचणार पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकातामधील ऐतिहासिक परेड ग्राउंडमध्ये मोठी रॅली करणार आहेत. पंतप्रधान मोदींसह यावेळी दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. या रॅलीत अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे. मिथुन यांच्यासोबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, अभिनेता प्रोसेनजीतसह आणखी काही बंगालमधील प्रमुख व्यक्ती भाजप प्रवेश करतील अशी शक्यता आहे.
West Bengal | सौरव गांगुलीच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम, पंतप्रधानांच्या रॅलीतही नसणार
महागाईविरोधात मुख्यमंत्री ममता बनर्जींची पदयात्रा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी महागाईविरोधात केंद्र सरकारविरुद्ध उत्तर बंगालमध्ये पदयात्रा काढणार आहेत. गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा मुद्दा बनवत ममता बनर्जी आज सिलीगुडीमध्ये चार किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत. ममता यांचा रोड शो आणि कोलकातामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली एकाच वेळी असणार आहे.