पॉलिटिकल सुपर संडे: कोलकात्यात पंतप्रधान मोदींची सभा, सिलिगुडीत ममतांची पदयात्रा, अमित शाहांचा दोन राज्यांचा दौरा
पश्चिम बंगालमध्ये या महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. आज बंगालसह देशभरात मोठ्या नेत्यांच्या रॅली, पदयात्रा, सभा होत असल्याने पॉलिटिकल सुपरसंडे अनुभवायला मिळणार आहे.
कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये या महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बड्या नेत्यांचे दौरे सुरु आहेत. आज बंगालसह देशभरात मोठ्या नेत्यांच्या रॅली, पदयात्रा, सभा होत असल्याने पॉलिटिकल सुपरसंडे अनुभवायला मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकातामधील ऐतिहासिक परेड ग्राऊंडमध्ये मोठी रॅली करणार आहेत. या सभेत अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांचा बीजेपी प्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिथुन यांच्यासोबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीच्या देखील भाजप प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहेत. तर दुसरीकडे आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी महागाईविरोधात केंद्र सरकारविरुद्ध उत्तर बंगालमध्ये पदयात्रा काढणार आहेत.
2 वाजता परेड ग्राऊंडमध्ये पोहोचणार पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कोलकातामधील ऐतिहासिक परेड ग्राउंडमध्ये मोठी रॅली करणार आहेत. पंतप्रधान मोदींसह यावेळी दिग्गज नेतेमंडळी उपस्थित राहणार आहे. या रॅलीत अभिनेते मिथुन चक्रवर्ती भाजपमध्ये प्रवेश करतील असं बोललं जात आहे. मिथुन यांच्यासोबत बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली, अभिनेता प्रोसेनजीतसह आणखी काही बंगालमधील प्रमुख व्यक्ती भाजप प्रवेश करतील अशी शक्यता आहे.
महागाईविरोधात मुख्यमंत्री ममता बनर्जींची पदयात्रा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी महागाईविरोधात केंद्र सरकारविरुद्ध उत्तर बंगालमध्ये पदयात्रा काढणार आहेत. गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा मुद्दा बनवत ममता बनर्जी आज सिलीगुडीमध्ये चार किलोमीटर लांब रोड शो करणार आहेत. ममता यांचा रोड शो आणि कोलकातामधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रॅली एकाच वेळी असणार आहे.
अमित शाहांचा दोन राज्यांचा दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज तामिळनाडू आणि केरळच्या एकदिवसीय दौऱ्यावर आहेत. आज ते भाजपच्या डोअर टू डोअर मोहिमेची सुरुवात करणार आहेत. अमित शाह तिरुवनंतपुरममध्ये भाजपच्या केरल विजय यात्रेच्या समारोप कार्यक्रमात संबोधित करणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता ते त्रिवेंद्रपुरम मधील श्री रामकृष्ण मठात जातील. केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये 6 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील विधानसभा निवडणूक पार पडणार आहे.
महापंचायतमध्ये सहभागी होणार प्रियांका गांधी
काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी आज मेरठमध्ये कृषी कायद्याविरोधाती महापंचायतमध्ये सहभागी होतील. त्या मेरठमधील कैली गावात होणाऱ्या जय जवान-जय किसान "किसान महापंचायत" मध्ये संबोधित करणार आहेत.