एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Weather : उत्तर भारतात थंडीचा जोर; तर जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा अंदाज, महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला

शुक्रवारी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा थंडी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला आहे.

Weather Update : उत्तर भारतात पुन्हा थंडीचा कडाका वाढला आहे. तापमानात वाढ झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळाला होता. मात्र, शुक्रवारी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा थंडी सुरु झाली आहे. दिल्लीत काल सकाळपर्यंत 10.1 मिमी पावसाची नोंद झाली होती. दरम्यान, पुढच्या 24 तासात हवामान निरभ्र राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. सूर्यप्रकाश देखील पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, या महिनाअखेरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत वातावरणात थोडीशी थंडी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. शनिवारी दिल्लीत पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती, मात्र दिवसभर पाऊस पडला नाही. मात्र, सायंकाळी अनेक भागात ढग दाटून आले होते.

महाराष्ट्राचा विचार केला तर राज्यात तापमानात चढ उतार सुरूच आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, हळूहळू तपमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, दुसरीकडे, पावसामुळे शनिवारी दिल्ली-एनसीआरमधील हवेची गुणवत्ताही सुधारली आहे. दिल्लीचा AQI 102, फरिदाबादचा 97, गाझियाबादचा 101, ग्रेटर नोएडाचा 88, गुरुग्रामचा 128 आणि नोएडाचा 70 AQI आहे.
वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय झाल्यामुळे, दिल्लीत शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला होता. आजपासून उत्तर प्रदेशातील हवामान पूर्णपणे कोरडे आणि स्वच्छ असेल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, आज दिवसभर कडक सूर्यप्रकाश राहील आणि तापमानातही वाढ नोंदवली जाऊ शकते. कमाल तापमान पुन्हा एकदा 25 अंश सेल्सिअसच्या पुढे जाऊ शकते. त्याचबरोबर पावसामुळे राज्यातील हवेची गुणवत्ता निश्चितच सुधारली आहे.

राजस्थान

राजस्थानमध्ये थंडीने निरोप घेतला असून, उष्णतेने जोर दाखवायला सुरुवात केली आहे. येथे गेल्या 24 तासांत कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवले गेले. जयपूरच्या हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात सीमावर्ती शहर बाडमेर येथे सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे.

जम्मू आणि काश्मीर

जम्मू आणि काश्मीरमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण असून, मधूनमधून पावसासह बर्फवृष्टी सुरू आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज येथे पाऊस आणि हिमवृष्टीची शक्यता आहे. राज्यात 3 मार्चपर्यंत असेच वातावरण राहण्याचा अंदाज आहे. तथापी, हवामान वेळोवेळी स्वच्छ होत राहील, ज्यामुळे थोडासा दिलासा मिळेल. दरम्यान, श्रीनगर विमानतळावरून उड्डाणे सुरू झाली आहेत. तेथे वैष्णोदेवीची यात्राही सुरू आहे. तर आजपासून रेल्वे सेवाही पूर्ववत होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Eknath Shinde Meeting Ajit Pawar : देवेंद्र फडणीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार, अमित शाहांच्या बैठकीत काय ठरलं?Zero Hour : राज्यावर 7.11 लाख कोटींचं कर्ज, सरकार आव्हानं कसं पेलणार?Zero Hour : आई राज्यसभेत, भाऊ-बहीण लोकसभेत, संपूर्ण गांधी कुटुंब संसदेतZero Hour : आरक्षण, बेरोजगारी,कर्ज, नव्या सरकारसमोर आव्हानांचा डोंगर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SA vs SL : दक्षिण आफ्रिकेच्या Marco Jansen ने श्रीलंकेचा बॅंड वाजवला, संपूर्ण टीमचा 42 धावांमध्ये करेक्ट कार्यक्रम
Marco Jansen च्या गोलंदाजीपुढं श्रीलंकेच्या फलंदाजांची शरणागती, 7 विकेट घेतला लावला सुरुंग
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
माहीम मतदारसंघातील जायंट किलर महेश सावंत लिलावती रुग्णालयात; डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
भाजपचं फुल्ल लॉबिंग, गृह अन् महत्त्वाचं खातं स्वत:कडे; एकनाथ शिंदे अन् अजित पवारांना कोणतं मंत्रिपद?
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
दिवंगत नितीन देसाईंचा एन.डी.स्टुडीओ शासनाच्या ताब्यात, आता गोरेगाव फिल्मसीटीकडून होणार परिचालन
Nayanthara Controversy : नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
नयनतारा लग्नानंतर 4 महिन्यातच आई झाली, रामाचा अपमान अन् धर्मही बदलला! आता कोर्टात तारीख पे तारीख
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
वंचितचे पदाधिकारी ZP अध्यक्षांच्या घरात घुसले, तिथं फक्त 99 मतंच कशी? शाब्दीक वाद उफाळला
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
धक्कादायक! शिक्षकानं पत्नी आणि मुलीसह संपवलं जीवन, परभणी जिल्ह्यात खळबळ
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
लिव्ह इनमधील प्रेमप्रकरणाचा द एन्ड, प्रेयसीला संपवलं, मुलाला आळंदीत सोडलं; अखेर तपासात बिंग फुटलं
Embed widget