Russia Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेले 250 विद्यार्थी दिल्ली विमानतळावर पोहोचले, एअर इंडियाचं दुसरं विमान भारतात दाखल
भारतील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. दरम्यान, आनंदाची बातमी म्हणजे आज सकाळी 250 विद्यार्थी रोमानियाहून सुखरुप भारतात परतले. दिल्ली विमानतळावर सकाळी त्यांचे स्वागत करण्यात आले.
Russia Ukraine War : गेल्या चार दिवसापासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. यामुळे तिथे भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. अशातच भारतील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. दरम्यान, आनंदाची बातमी म्हणजे आज सकाळी 250 विद्यार्थी रोमानियाहून सुखरुप भारतात परतले. दिल्ली विमानतळावर सकाळी त्यांचे स्वागत करण्यात आले. एअर इंडियाच्या दुसऱ्या विमानाने हे 250 विद्यार्थी भारतात आणले आहेत.
'ऑपरेशन गंगा' अंतर्गत युक्रेनध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या अंतर्गतच काल युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 विद्यार्थ्यांना सुखरुप भारतात आणण्यात आले होते. त्यानंतर आज 250 विद्यार्थी भारतात परतले आहेत. गेल्या चार दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. रशियाकडून सतत होणाऱ्या हल्यामुळे युक्रेमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, युक्रेनवर झालेल्या हल्ल्यांमुळे अनेक विद्यार्थी बंकरमध्ये राहत आहेत. तेथील परिस्थिती कठीण आहे. सरकारने आम्हाला वेळेवर बाहेर काढल्याबद्दल धन्यवाद, अशा प्रतिक्रिया युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांनी दिल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. त्यामुळे युक्रेनमधील भारतीय नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. रशियाकडून सतत होणाऱ्या हल्यामुळे युक्रेमधील परिस्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय नागरिकांना मायदेशी परत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. युक्रेनमध्ये अडकलेल्या 219 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे पहिले विमान काल भारतात दाखल झाले होते. रोमानियाहून एअर इंडियाचं पहिलं विमान या विद्यार्थ्यांना घेऊन काल रात्री साडेआठ वाजता मुंबई विमानतळावर दाखल झालं होतं. हे विमान मुंबई विमानतळावर दाखल झाल्यानंतर केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांच्याकडून विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं. यावेळी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरही उपस्थित होत्या.
युक्रेनध्ये अजूनही भारतीय विद्यार्थी अडकले आहेत. केंद्र सरकारसह राज्य सरकारही युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. युक्रेनमधील भारतीय दूतावासाकडून अडकलेल्या भारतीयांसाठी सूचना जारी करण्यात आली आहे. भारत सरकारच्या अधिकाऱ्यांशी पूर्व समन्वय साधल्याशिवाय कोणत्याही सीमेवर जाऊ नये, असे सांगण्यात आले आहे.