(Source: ECI/ABP News/ABP Majha)
INDIA MP Manipur Visit : राजकारण करायला नव्हे पिडितांचे अश्रू पुसायला आलोय, मणिपूर भेटीनंतर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया
Manipur Violence: शनिवार 29 जुलै रोजी विरोधी पक्षातील नेत्यांनी (इंडिया) मणिपूरला भेट दिली. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली.
Manipur Violence: दोन आदिवासी गटातील वाशिंक टोळी युद्धातील पडितांना भेटण्यासाठी आम्ही मणिपूरमध्ये आलो आहोत. आम्हाला यात राजकारण करायचे नाही, अशी प्रतिक्रिाय काँग्रेस खासदार अधीररंजन चौधरी (adhir ranjan chowdhury) यांनी दिली आहे. शनिवार 29 जुलै रोजी विरोधी पक्षातील नेत्यांनी (इंडिया) मणिपूरला भेट दिली. त्यानंतर अधीर रंजन चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. मणिपूरमधील जातीय संघर्षामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन होत आहे, हे संपण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न केले पाहिजे. शांततापूर्ण समाधन शोधण्याची गरज आहे, असे अधीर रंजन चौधरी म्हणाले.
'इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इनक्लुसिव्ह अलायन्स' (इंडिया) विरोधी पक्षाच्या आघाडीच्या 21 खासदारांचे शिष्टमंडळ शनिवारी हिंसाचारग्रस्त मणिपूरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेलेय. येथील ग्राउंड वास्तवाचे मूल्यांकन करण्यासाठी या 21 खासदारांनी मणिपूरला आलेत. तीन मे पासून ईशान्येकडील राज्यात उसळलेल्या वाशिंक हिंसाचारातील पीडितांना भेटण्यासाठी विरोधी पक्षांच्या खासदारांचे पथक आलेय. हे पथक अनेक मदत शिबिरांना भेट देणार आहे. 'हा हिंसाचार लवकरात लवकर संपावा आणि शांतता प्रस्थापित व्हावी अशी आमची इच्छा आहे. मणिपूरमध्ये काय चालले आहे याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. मणिपूर हिंसाचारामुळे जगभरात भारताची प्रतिमा मलिन होत आहे, त्यामुळे यावर सर्वांनी एकत्र येऊन उपाय शोधला पाहिजे, अधीर रंजन चौधरी यांनी सांगितले. '
21 खासदारांचे शिष्टमंडळ आज विमानाने मणिपूर येथे पोहचले. त्यानंतर चुरचंदपूर येथील मदत शिबिरांमध्ये राहणाऱ्या कुकी समाजातील पीडितांची भेट घेतली. जेथे नुकतीच हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. खासदारांच्या भेटीसंदर्भात सुरक्षा अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, “सुरक्षेच्या कारणास्तव ते इम्फाळहून हेलिकॉप्टरने चुरचंदपूरला गेले. सध्या एकच हेलिकॉप्टर उपलब्ध आहे, त्यामुळे शिष्टमंडळातील सदस्यांची दोन टीममध्ये विभागणी करण्यात आली आहे. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हेलिकॉप्टर दोन फेऱ्या करणार आहे.
शिष्टमंडळात कोण कोण ?
अधीर रंजन चौधरी आणि गोगोई यांच्याशिवाय शिष्टमंडळात तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) सुष्मिता देव, झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम), द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके)च्या कनिमोझी, राष्ट्रीय लोक दल (आरएलडी), राष्ट्रीय जनता दल (आरएलडी)चे जयंत चौधरी यांचा समावेश होता. आरजेडीचे मनोज कुमार झा, रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टीचे एनके प्रेमचंद्रन, जनता दलचे (युनायटेड) राजीव रंजन सिंग उर्फ लालन सिंग आणि अनिल प्रसाद हेगडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) संतोष कुमार आणि ए. रहीम यांचाही समावेश आहे.
भाजपचं काय म्हणणं ?
विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाच्या भेटीवर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रत्युत्तर दिलेय. विरोधी पक्षाच्या सदस्यांचा हा फक्त दिखावा आहे. भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने शनिवारी कोलकाता येथे पोहोचल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांच्या भेटीवर आरोप केला. ते म्हणाले की, जेव्हा मणिपूर पूर्वीच्या सरकारांच्या काळात "जळत" होते, तेव्हा त्यांनी संसदेत एक शब्दही उच्चारला नाही. जेव्हा मणिपूर महिना महिना बंद असायचे त्यावेळी एकही शब्द उच्चारला जायचा नाही. हे शिष्टमंडळ जेव्हा मणिपूरमधून परत येईल, तेव्हा संसदेचं कामकाज होऊ द्यायचं नाही.
नेमकं झालेय का ?
Meitei समुदायाच्या अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याच्या मागणीला विरोध करण्यासाठी 3 मे रोजी 'आदिवासी एकता मार्च' आयोजित करण्यात आला होता. तेव्हापासून मणिपूरमध्ये उसळलेल्या वांशिक हिंसाचारात 160 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरच्या लोकसंख्येच्या सुमारे 53 टक्के Meitei आहेत. ते प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतात. दुसरीकडे, नागा आणि कुकी सारख्या आदिवासी लोकसंख्येच्या 40 टक्के आहेत. ते बहुतेक डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.