एक्स्प्लोर

Wayanad Landslide: वायनाडमध्ये निसर्गाचा प्रकोप; आतापर्यंत 145 हून अधिक जणांनी गमावले जीव, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू

Wayanad Landslide: वायनाडमध्ये अद्याप हवामान फारसं सुधारलेलं नाही. मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट आहे. त्यामुळे बचाव पथकाला मोठी अडचण येत आहे. या दुर्घटनेनंतर केरळ सरकारनं दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

Wayanad Landslide: नवी दिल्ली : केरळमधील (Kerala) वायनाड (Wayanad News) जिल्ह्यात जणू निसर्गाचा हाहा:कार झालाय. मुसळधार पावसानंतर वायनाडमध्ये भूस्खलन झालं. भूस्खलनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 145 च्या पुढे पोहोचली आहे. तर अद्याप 90 हून अधिक लोक बेपत्ता असल्याचं सांगितलं जात आहे. एनडीआरएफ, नौदल आणि वायूदलाच्या वतीनं बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पावसामुळे मातीचा चिखल झाला आहे, त्यामुळे बचावकार्यात अडथळे येत आहेत. आतापर्यंत 128 जण जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. वायनाडमध्ये अद्याप हवामान फारसं सुधारलेलं नाही. मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट आहे. त्यामुळे बचाव पथकाला मोठी अडचण येत आहे. या दुर्घटनेनंतर केरळ सरकारनं दोन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

घटनास्थळी मृतांच्या नातेवाईकांना गर्दी केली आहे. नातेवाईक आपल्या जीवलगांचा शोध घेत आहेत. घटनास्थळी प्रियजनांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. ड्रोन आणि श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. अजूनही बरेच लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळत आहे. येथे मोठी जीवितहानी झाली आहे. 

वायनाडमध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलनामुळे निसर्गाचा इतका विध्वंस कदाचितच कोणी पाहिला नसेल. ड्रोननं टिपलेल्या फोटोंनी विध्वंसांची दृश्य दिसत आहे. पुराचं अतिक्रमण सर्वत्र दिसून येत आहे. भूस्खलनात मृतांची संख्या सातत्यानं वाढत आहे. बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. लष्कर, हवाई दल आणि नौदल तिन्ही दलांकडून युद्ध पातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. परिस्थिती इतकी बिकट आहे की, बचाव पथकाला लोकांचे मृतदेह बाहेर काढण्यातही मोठ्या अडचणी येत आहेत.

200 हून अधिक लष्कराचे जवानही बचावकार्यात सहभागी 

वायनाडमध्ये निसर्गाचा विध्वंस मन हेलावून टाकणारा आहे. मलप्पुरमच्या पोथुकल्लू परिसरातून 10 मृतदेह सापडले आहेत. जिथे भूस्खलन झालं, तिथून चालियार नदीत वाहून गेले होते. बचाव पथकानं दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली अजूनही आणखी लोक अडकल्याची शक्यता आहे.

नागरी संरक्षण, पोलीस, अग्निशमन विभाग, एसडीआरएफ, एनडीआरएफचे सुमारे 250 कर्मचारी मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. त्याचवेळी लष्कराच्या 122 इन्फंट्रीचे सुमारे 225 जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. भारतीय हवाई दलाने कोईम्बतूरमधील सुलूर एअरबेसवरून 2 हेलिकॉप्टर पाठवले आहेत. 

राहुल गांधी, प्रियांका गांधी आज वायनाडला जाण्याची शक्यता 

काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वायनाडला जाण्याची शक्यता आहे. वायनाडमधील भूस्खलनानंतर तब्बल 45 मदत शिबिरं सुरू करण्यात आली. या शिबिरांमध्ये तब्बल तीन हजारांहून अधिक लोकांना स्थलांतरीत करण्यात आलं आहे. वायनाडमध्ये सर्वात आधी मध्यरात्री 2 वाजता भूस्खलन झालं. त्यानंतर पुन्हा पहाटे 4 च्या सुमारास भूस्खलन झालं. लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि वायनाडचे माजी खासदार राहुल गांधी यांनीही वायनाडमधील भूस्खलनाच्या घटनांमध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याचा उल्लेख संसदेत बोलताना केला. 

भूस्खलनानंतरचं दृश्य थरकाप उडवणारं 

भूस्खलनानंतर वायनाडमध्ये आपल्या निकटवर्तींयासाठी नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. घटनास्थळी जमलेले नातेवाई मदतीसाठी विवंचना करत आहेत. तसेच, ढिगाऱ्याखालून लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. वायनाडमध्ये मुसळधार पावसानं हाहाकार उडवला आहे. अजूनही अनेकजण घरांमध्ये अडकले आहेत. कारण रस्ते वाढून गेले आहेत. पूल वाहून गेले आहेत. दरम्यान, भूस्खलनात जखमी झालेल्या अनेकांना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bacchu Kadu and Raju Shetti : तिसऱ्या आघाडीत एमआयएमला नो एन्ट्री : बच्चू कडूPrakash Shendage On ST Reservation : एसटी आरक्षणात अ आणि ब वर्ग करा : शेंडगेLaxman Hake On Manoj Jarange : मनोज जरांगेंचं आंदोलन बारामतीच्या इशाऱ्यावर, लक्ष्मण हाकेंचा आरोपBabanrao Taywade OBC : आश्वासनाला तडा गेल्यास ओबीसी समाजही रस्त्यावर : बबनराव तायवाडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
'जरांगेंना बिग बॉसमध्ये घ्या' ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंचा जरांगेंना टोला, म्हणाले, 'या माणसाच्या सांगण्यावरून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री..'
Lebanon Pager Serial Blasts : 'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
'मोसाद'च्या 3 ग्रॅम स्फोटकात 5 हजार जीव होरपळले; निष्पाप माणसं मारत सुटलेल्या इस्त्रायलला युद्धाचा नियम लागू होत नाही का?
Shivdeep Lande: बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
बिहारचा सिंघम IPS शिवदीप लांडेंचा पोलीस सेवेतून राजीनामा, कारण गुलदस्त्यात, पुढे काय करणार?
Sarkari Yojana : काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
काय आहे PM आशा योजना? सरकारनं केली 35000 कोटींची तरतूद, शेतकऱ्यांना होणार फायदा
Ashwini Jagtap: अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
अश्विनी जगताप शरद पवार गटात जाण्याची चर्चा, अखेर स्पष्टच बोलल्या, ' दीराला उमेदवारी मिळाली तर मग मी..'
Rakhi Sawant : घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
घर विकलं अन् म्युझिक अल्बम बनवला, किंग खाननेही केलं होतं राखीचं कौतुक...
Success Story: लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
लाखोंच्या कमाईला कोथिंबिरीचा सुवास! केवळ 50 गुंठ्यातून शिरुरच्या या शेतकऱ्यानं महिन्याभरात कमवले...
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Embed widget