एक्स्प्लोर
Advertisement
उत्तराखंडमध्ये विरारच्या 28 वर्षीय गिर्यारोहकाचा मृत्यू
उत्तर काशीतील हिमवादळानंतर थंडीत गोठून सुमित कवळीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
मुंबई : उत्तर काशीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या विरारच्या ट्रेकरचा मृतदेह शुक्रवारी त्याच्या निवासस्थानी आणला जाणार आहे. हिमवादळात अडकल्यामुळे विरारच्या आगाशी भागात राहणाऱ्या 28 वर्षीय सुमित कवळीचा मंगळवारी मृत्यू झाला होता.
ट्रेक सुरु असताना सुमित 40 जणांच्या ग्रुपपासून दुरावला. गिर्यारोहकांना बुधवारी त्याचा मृतदेह आढळला. थंडीत गोठून सुमितचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
सुमित उत्तराखंडातील चैनशील बगयाल मेडोजमध्ये 8 एप्रिलला ट्रेकसाठी गेला होता. मुंबईतील यूथ हॉस्टेल्स असोसिएशन ऑफ इंडिया (वायएचएआय)ने हा ट्रेक आयोजित केला होता. ऑनलाईन अॅप्लिकेशन करुन चार महिन्यांपूर्वीच सुमितने एक्स्पिडीशन टूर बूक केली होती.
समुद्रसपाटीपासून 10 हजार 400 फूट उंचावर असलेल्या सुनवटी टचमध्ये त्यांचा पहिला कॅम्प होता. समता टच हे शिखर पार केल्यानंतर ग्रुप बेस कॅम्पला परत येणार होता. देहराडूनपासून 215 किमी अंतरावर बलावतमध्ये हा बेस कॅम्प होता. मात्र समता टच ट्रेक सुरु असताना वातावरण बिघडलं आणि ग्रुप विखुरला.
सोसाट्याचा वारा, वातावरणात झालेला बदल यामुळे सुमितला श्वास घेणंही कठीण झालं. शरीराचं तापमान कमी होऊन मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे त्याची शुद्ध हरपली आणि त्याचे प्राण गेल्याची माहिती आहे.
सुमित पुण्यातील एका फर्ममध्ये नोकरी करत होता. निसर्गाची आणि ट्रेकिंगची आवड असल्यामुळे तो सतत ट्रेकला जात असे. सुमित मिरा रोडमध्ये राहायचा, तर त्याचे आई-वडील आणि धाकटा भाऊ विरारमध्ये राहत होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement