एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
तुम्ही आवडीनं खात असलेल्या आईस्क्रीमचं व्हायरल सत्य
मुंबई : आपण सारेच जण आईस्क्रीम मोठ्या आवडीनं खातो. मात्र आईस्क्रीम समजून आपण डालडा तर खात नाही ना?. असा सवालही आता उपस्थित होतोय. या आईस्क्रीम मागचं व्हायरल सत्य नेमकं सत्य काय आहे, जे जाणून घेणं गरजेचं आहे.
अमूलनं आईस्क्रीमची नवी जाहिरात सुरु केली आहे. अमूलची ही जाहिरात टीव्हीवर झळकली आणि प्रश्नांची मालिकाच सुरु झाली. आईस्क्रीमच्या नावाखाली तुम्ही डालडा खाताय? आईस्क्रीमच्या नावाखाली विकलं जाणारं फ्रोजन डेझर्ट काय आहे? याच प्रश्नांचा शोध घेताना मुंबई उच्च न्यायालयात याचा पुरावा मिळाला आहे.
क्वालिटी वॉल्स या आईस्क्रीम बनवणाऱ्या कंपनीनं तसंच हिंदुस्तान युनिलिव्हरनं अमूलच्या या जाहिरातीविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यांच्या मते ही जाहिरात दिशाभूल करणारी आहे. याचा निवाडा कोर्टात होईलच. पण तोपर्यंत या व्हायरल व्हिडिओचं सत्य एबीपी माझानं शोधलं आहे.
त्यातच अमूलच्या विरोधात दाखल झालेला दावा अमूलने जिंकल्याचा दावा करणारी एक फेसबुक पोस्टही व्हायरल झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता आणखीनच वाढली आहे. खरं खोटं जाणून घेण्याआधी दुधापासून बनवलेले आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्ट यात नक्की काय फरक आहे, हे जाणून घेणं आवश्यक आहे.
आईस्क्रीम दोन प्रकारची असतात. एकामध्ये दुध आणि क्रीमचा वापर केलेला असतो. तर दुसऱ्या प्रकारच्या आईस्क्रीममध्ये वनस्पती तेल अर्थातच डालडा असतं. ज्याला फ्रोझन डेझर्ट म्हणतात. ज्यात तेलाचं फॅट वापरलं जातं. अशी माहिती हॅवमोअर आईस्क्रीम कंपनीच्या एमडी अंकित चौना यांनी दिली.
दुसरीकडे अशी जाहिरात करण्यामागचा उद्देशही एबीपी माझानं अमूलकडून जाणून घेतला आहे. यात "ग्राहक काय खात आहेत याची त्यांना माहिती असली पाहिजे. ग्राहकांना जागरुक करण्यासाठी आम्ही ही जाहिरात बनवली आहे," अशी माहिती आर. एस. सोढ़ी, एमडी, गुजरात को ऑपरेटिव मिल्क मार्केटिंग फेडरेशन यांनी दिली.
अमूलची ही जाहिरात डालड्याच्या वापराचा दावा करुन ग्राहकांची दिशाभूल करत आहे. क्वालिटी वॉल्सच्या फ्रोजन डेझर्टमध्ये डालडा अजिबात नसतो. आम्ही आमच्या फ्रोजन डेझर्टमध्ये दूधच वापरतो. फरक इतकाच आहे, की दुधाच्या फॅटऐवजी आम्ही वनस्पती फॅटचा वापर करतो. जे जास्त आरोग्यदायी आहे, अशी माहिती दावा दाखल करणाऱ्या हिंदुस्तान लीवरनं दिली आहे.
दरम्यान या दोन्ही कंपन्यांमधल्या न्यायालयीन लढ्याचा निकाल 5 एप्रिल रोजी येणार असल्यानं ती फेसबुक पोस्ट खोटी असल्याचं एबीपी माझाच्या तपासात निष्पन्न झालं आहे
एकीकडे दोन्ही कंपन्यांचा दावा पाहिला, आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्ट हे दोन्ही खाण्यासाठी योग्य आहेत. दोन्हीमध्ये दुधाचा वापर केला जातो. फक्त दोन्ही कंपन्यांच्या आईस्क्रीम तयार करताना वापरलं जाणारे घटक वेगळे आहेत. त्यामुळे हेच आहे या जाहिरातीमागचं व्हायरल सत्य. पण कोर्टातून बाहेर येणारं सत्य काय असेल, यासाठी थोडी वाट पाहावी लागणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
क्रीडा
निवडणूक
Advertisement