Wrestlers Press Conference: ब्रिजभूषण यांच्याविरोधात कुस्तीपटू आक्रमक; विनेश फोगाट, बजरंग पुनिया अन् साक्षी मलिक यांची आज पत्रकार परिषद
Wrestlers PC: कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी ट्वीट करून घोषणा केली की, तिन्ही कुस्तीपटू गुरुवारी दिल्लीतील राजघाटावर पत्रकार परिषद घेणार आहेत.
Vinesh Phogat-Bajrang Punia PC: कुस्तीपटू विनेश फोगट (Vinesh Phogat), बजरंग पुनिया (Bajrang Punia) आणि साक्षी मलिक (Sakshee Malik) गुरुवारी (10 ऑगस्ट) पत्रकार परिषद घेणार आहेत. विनेश फोगटनं ट्वीट केलं आहे की, 10 ऑगस्ट रोजी राजघाटावर पत्रकार परिषद घेणार आहे. अशातच कुस्ती महासंघाची निवडणूक होणार आहे. भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्धच्या आरोपपत्रावर सुनावणी सुरू आहे आणि काही कुस्तीपटूंना आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी सूट देण्यात आल्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आहे.
विनेश फोगटनं याचसंदर्भात एक ट्वीट केलं आहे. ट्विटरवर पोस्ट करत लिहिलंय की, "आम्ही उद्या (10 ऑगस्ट) दुपारी 12.30 वाजता दिल्लीतील राजघाटावर पत्रकार परिषद घेणार आहोत." त्याच्यासोबत बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांनीही ट्वीट करून याची घोषणा केली आहे. गेल्या महिन्यात विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना आशियाई क्रीडा स्पर्धेतील प्रवेशासाठी अॅड हॉक कमेटीला सूट देण्यात आली होती, ज्याला अनेक कुस्तीपटूंनी विरोध केला होता.
विनेश आणि पुनिया यांनी फेसबुक लाईव्ह करत आरोपांना दिलं उत्तर
23 सप्टेंबरपासून चीनमधील हांगझोऊ येथे आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू होत आहेत. रेसलर अंतिम पंघलनं विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांना ट्रायल्समधून सूट देण्याच्या निर्णयावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर दोन्ही कुस्तीपटूंनी फेसबुक लाईव्हवर येऊन आरोपांना उत्तर दिलं. विनेश फोगट म्हणाली की, ती ट्रायल्सच्या विरोधात नाही, तसेच अंतिम पंघलला दोषही देत नाही. ते म्हणाले की, अंतिम पंघल हे समजण्यास अजून लहान आहे, पण ते त्याच्या जागी बरोबर आहेत. विनेश म्हणाली की, अंतिम पलंघ आपल्या हक्कांसाठी लढत आहे, पण आमचीही चूक नाही.
कुस्तीपटू अंतिम पलंघकडून ट्रायल्समध्ये सूट देण्यावर प्रश्न उपस्थित
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) च्या एड हॉक कमेटीनं विनेश आणि बजरंग पुनिया यांना ट्रायल्समधून सूट देऊन आशियाई क्रीडा 2023 मध्ये थेट प्रवेश करण्याची परवानगी दिली होती. यावर अंतिम पंघलनं एका व्हिडीओच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करत न्यायालयातही पोहोचले. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयानं कुस्तीपटू अंतिम आणि सुजित कलकल यांच्या याचिका फेटाळून लावल्या.