एक्स्प्लोर
रिक्षावाला मायकल क्लार्क, व्हिडीओ व्हायरल
![रिक्षावाला मायकल क्लार्क, व्हिडीओ व्हायरल Video Michael Clarke Driving An Autorickshaw In Bengaluru रिक्षावाला मायकल क्लार्क, व्हिडीओ व्हायरल](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/03103143/Michael_Clarke.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
बंगळुरु : ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क बंगळुरुच्या रस्त्यांवर रिक्षा चालवताना दिसला. मायकलने त्याच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंटवर यासंदर्भातला व्हिडीओ पोस्ट केला आहे.
क्रिकेटमधून निवृत्त झाल्यापासून मायकल वैयक्तिक आयुष्यात काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करत आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी तो समालोचनही करत आहे.
पुण्यातील पहिल्या कसोटीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची दुसरी कसोटी बंगळुरुमध्ये रंगणार आहे. त्यामुळे मायकलही बंगळुरुला दाखल झाला आहे. मात्र सामन्याच्या एक दिवस आधी मायकल क्लार्कने प्रचंड धम्माल केली.
व्हिडीओच्या सुरुवातीला क्लार्क रिक्षा चालवण्याच्या टिप्स घेताना दिसत आहे. त्यानंतर स्वत:च वेगाने रिक्षा चालवताना दिसत आहे. मायकल क्लार्कचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
पाहा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)