एक्स्प्लोर

भारतात कोरोना व्हायरसच्या स्वरुपात कोणताही मोठा बदल नाही, लस संशोधनावरही परिणाम नाही: PMO

भारतातील कोरोना व्हायरस हा अनुवांशिकदृष्ट्या स्थिर असल्याचं अभ्यासातून स्पष्ट झालंयलसीच्या वाटपाबद्दल एक विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: जगातील अनेक देश लवकरात लवकर कोरोनावरील लस तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावेळी भारतातील कोरोनाच्या स्वरुपाबद्दल शनिवारी भारत सरकारने जाहीर केलेल्या एका निवेदनात असं म्हटलंय की कोरोनाच्या जीनोम संबंधी करण्यात आलेल्या वेगवेगळ्या दोन अभ्यासातून असं दिसून आलंय की भारतातील संक्रमित कोरोना हा अनुवांशिकदृष्ट्या स्थिर आहे. त्याच्या स्वरूपात अजून कोणताही बदल झाला नाही. यामुळे कोरोनावरील लसीच्या संशोधनावर कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. म्युटेशन नंतरही कोणताही परिणाम होणार नाही. काही तज्ञांनी असं सांगितलं होतं की कोरोना व्हायरसच्या स्वरूपात जर बदल झाला तर त्याचा परिणाम लसीच्या संशोधनापर होऊ शकतो. परंतु अलिकडेच जागतिक स्तरावर झालेल्या काही अभ्यासातून असं दिसून आलंय की जरी कोरोना व्हायरसच्या स्वरूपात काही बदल झाले तरी सध्या विकसित करण्यात येणाऱ्या लसींच्या कार्यक्रमावर कोणताही परिणाम होणार नाही. देशात 3 लसींचे संशोधन विकासाच्या अंतिम टप्प्यावर भारतातील कोरोना संकटासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली एक आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर PMO कडून एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. त्यात असं म्हंटले आहे की देशात तीन लसींचे संशोधन विकासाच्या अंतिम टप्प्यावर आहेत. त्यापैकी दोन लसींचे संशोधने ही विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात आहेत तर एक संशोधन हे विकासाच्या तिसऱ्या टप्प्यात आहे. या आढावा बैठकीत पंतप्रधानांनी सांगितले आहे की ICMR आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाने सार्स-कोव-2 या जिनोमवर अखिल भारतीय स्तरावर करण्यात आलेल्या अभ्यासात असं लक्षात आलं आहे की कोरोना व्हायरस हा त्याच्या स्वरुपाबाबत स्थिर आहे. त्यात कोणताही मोठा बदल झालेला दिसून आला नाही. गेल्या महिन्यात केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले होते की कोविडच्या स्ट्रेनमध्ये कोणताही बदल झाल्याचं दिसून आलं नाही. त्यांनी असेही सांगितले की ICMR हे देशातील कोरोनाच्या स्वरूपावर मोठ्या प्रमाणात अभ्यास करत आहे आणि हा अभ्यास ऑक्टोंबरच्या अखेरपर्यंत होणे अपेक्षित आहे. पंतप्रधानांनी दिले हे निर्देश PMO कडून करण्यात आलेल्या या निवेदनात असं सांगण्यात आलं आहे की नेश्चल एक्सपर्ट ग्रुप ऑन वॅक्सिन अॅडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड-19 ने देशातील सर्व राज्ये आणि यासंबंधीचे सर्व भागधारकांच्या मदतीने या लसींच्या वाटपाबाबत एक विस्तृत आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत तज्ञांचा एक गट राज्यांशी समन्वय ठेवून या लसींची प्राथमिकता आणि वाटपाबाबत सल्लामसलत करत आहे आणि या प्रश्नावर वेगाने काम करत आहे. याबाबत पंतप्रधान मोदींनी आढावा बैठकीत असे निर्देश दिले आहेत की देशाची भौगोलिक स्थिती आणि विविधता लक्षात घेता लसीचे वाटप वेगाने होईल हे सुनिश्चीत करा.

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Maharashtra Live News Updates: निवडणूक आयोगाविरोधात 'इंडिया'ची याचिका; सुप्रीम कोर्टाकडे भव्य मोर्चा काढून याचिका
Eknath Shinde: मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले
मोदीजींना 36 देशांनी त्यांच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवलं, का तुमच्या पोटात दुखतंय? अमितभाईंना वाटेल ते बोलले; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे इंडिया आघाडीच्या मोर्चावर संतापले

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकांचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
Rahul Gandhi: राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
'आणि हे आंदोलन सुरुच राहणार..' राहुल गांधींची विरोधी नेत्यांसोबत चाय पे चर्चा, 8 दिवसांत ज्ञानेश कुमारांविरोधात 5 आंदोलने; अवघ्या चार शब्दातील एका वाक्यानं लक्ष वेधलं!
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
Embed widget