एक्स्प्लोर

Arnold Dix : 41 कामगारांसाठी देवदूत बनला! मोठ्या रेस्क्यू ऑपरेशननंतर थेट मंदिरात, ऑस्ट्रेलियावरुन आलेले अर्नॉल्ड डिक्स कोण?

Who is Tunnelling Expert Arnold Dix : आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी सर्व कामगारांच्या सुटकेसाठी त्यांनी बाबा बौख नाथ देवतेकडे प्रार्थना केली होती. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Uttarakhand Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तराकाशी (Uttarkashi) येथील बोगद्यात अडकलेल्या 41 मजुरांना बाहेर काढण्यासाठी (Uttarkashi Tunnel Rescue) देश आणि विदेशातील तज्ज्ञांचं पथक गेले अनेक दिवस 24 तास बचावकार्य राबवत होतं. सिल्क्यरा बोगद्यातील 41 मजुरांना (Uttarkashi Tunnel Accident Update) मंगळवारी रात्री सुखरुप बाहेर काढण्यात आलं. यानंतर एका परदेशी तज्ज्ञाचा फोटो व्हायरल होत आहे. बाबा बौथ नाथ देवतेसमोर नतमस्तक होणारे आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांची सर्वत्र चर्चा आहे. सर्व कामगारांच्या सुटकेसाठी त्यांनी बाबा बौख नाथ देवतेकडे प्रार्थना केली होती. देवाने त्यांची प्रार्थना स्वीकारली आणि त्यानंतर त्यांनी बाबा बौख नाथ देवतेचे आभार मानले आहेत.

41 कामगारांसाठी देवदूत बनला

उत्तरकाशी बोगदा बचाव अभियाना अनेक परदेशी तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. यातीलच एक नाव अर्नोल्ड डिक्स यांचं आहे. सिल्क्यरा बोगद्यातून सर्व 41 कामगारांची यशस्वी सुटका केल्यानंतर आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ अर्नोल्ड डिक्स यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, "ही सेवा करणे हा माझा सन्मान आहे आणि एक पालक म्हणून, सर्व पालकांना त्यांच्या मुलांना घरी पोहोचवण्यास मदत करणे हा माझा सन्मान आहे.  मी सुरुवातीला म्हणालो की, 41 लोक सुखरुप आहेत आणि ख्रिसमसमुळे कोणालाही दुखापत होणार नाही. ख्रिसमस लवकर येत आहे." 

''भारताकडे सर्वोत्तम इंजिनिअर्स''

हे बचाव अभियान कशाप्रकारे यशस्वी झालं या प्रश्नाचं उत्तर देताना अर्नोल्ड डिक्स यांनी सांगितलं की, "आम्ही शांत होतो आणि आम्हाला नक्की काय हवे आहे, हे आम्हाला ठाऊक होतं. आम्ही एक अद्भुत संघ म्हणून काम केलं. भारताकडे सर्वोत्तम अभियंते आहेत. भारतातील उत्तम इंजिनिअर्स, भारतीय लष्कर आणि प्रशासन सर्वांचं हे यश आहे. या यशस्वी मोहिमेचा भाग बनणे, हे माझं भाग्य आहे. मी मंदिरात जाणार आहे कारण, मी जे घडले त्याबद्दल देवाला धन्यवाद करण्याचं वचन दिलं होतं. तुमच्या लक्षात आले नसेल, तर आपण सर्वांना एक अद्भूत चमत्कार पाहिला आहे."

रेस्क्यू ऑपरेशननंतर थेट मंदिरात

अर्नोल्ड डिक्स यांनी या मोठ्या रेस्क्यू ऑपरेशननंतर पुन्हा एकदा बाबा बौख नाग देवतेसमोर नतमस्तक होत आभार मानले आहेत. अर्नोल्ड डिक्स भूमिगत बांधकामाचे आंतरराष्ट्रीय सल्लागार आहेत. सर्व भारतीयांप्रमाणे त्यांनीही मजुरांच्या सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना केली होती सिल्क्यरा बोगद्याच्या बाहेर असलेल्या बाबा बोथ नाग देवतेसमोर त्यांनी हात जोडले होते. यानंतर त्यांनी यश मिळाल्यावर त्यांनी देवाचे आभार मानले आहेत.

कोण आहेत अर्नोल्ड डिक्स?

अर्नोल्ड डिक्स हे एक आंतरराष्ट्रीय बोगदा तज्ज्ञ आहेत, त्यांनी कामगारांना बोगद्यातून बाहेर काढलं. अर्नोल्ड डिक्स भूमिगत आणि वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये तज्ज्ञ आहेत. डिक्स ब्रिटिश इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेस्टिगेटर्समध्ये बॅरिस्टर देखील आहेत. त्यांना अभियांत्रिकी भूविज्ञान आणि जोखीम व्यवस्थापन प्रकरणांमध्ये तीन दशकांहून अधिक अनुभव आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Uttarkashi Tunnel Rescue : बोगद्यात काम करून जीव धोक्यात घालणाऱ्या 'त्या' मजुरांना पगार किती? गरीबीच्या ओझ्यामुळे बोगद्यात अडकले मजूर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget