Uttarkashi Tunnel Rescue : 17 दिवसांनी 41 कामगार बाहेर येणार, उत्तराखंडमधील रेस्क्यू ऑपरेशन अंतिम टप्प्यात
Uttarkashi Tunnel Rescue Operation : गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले आहेत. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आलं. या मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्यात 800 मिमी व्यासाची पाईप सोडण्यात आली. या पाईपमधून NDRF ची टीम मजुरांपर्यंत पोहोचली.
Uttarkashi Tunnel Rescue Operation : उत्तराखंडमधील (Uttarakhand) उत्तरकाशी (Uttarkashi) इथं बोगद्यात अडकलेल्या मजुरांची अखेर सुटका होत आहे. रेस्क्यू ऑपरेशनचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. गेल्या 12 नोव्हेंबरपासून म्हणजेच 17 दिवसांपासून तब्बल 41 मजूर बोगद्यात अडकून पडले होते. तेव्हापासून या मजुरांच्या सुटकेसाठी दिवसरात्र रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. उत्तरकाशीतील (Uttarkashi) सिल्क्यारा बोगद्यात (Silkyara Tunnel) 41 कामगार अडकल्याने देशासह जगाच्या नजरा या रेस्क्यू ऑपरेशनकडे लागल्या. 41 मजुरांना बाहेर काढल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येईल. त्यासाठी रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या आहेत. 41 मजुरांसाठी 41 बेड तयार करण्यात आले.
या मजुरांच्या सुटकेसाठी बोगद्यात 800 मिमी व्यासाची पाईप सोडण्यात आली. या पाईपमधून NDRF ची टीम मजुरांपर्यंत पोहोचली. या पाईपद्वारेच मजुरांच्या सुटकेचे प्रयत्न करण्यात आले.
दिवाळीपासून बोगद्यात अडकून
उत्तरकाशी टनेल रेस्क्यू ऑपरेशन (Uttarakhand Tunnel rescue operation) मागील 16 दिवसांपासून सुरु आहे. देशभरात दिवाळी सुर असताना दिवाळीच्या पहिल्या दिवशी माती कोसळून 41 मजूर बोगद्यामध्ये अडकले. तेव्हापासून म्हणजे 12 नोव्हेंबरपासून हे बचावकार्य सुरु आहे. आज या बचावकार्याचा 17 वा दिवस आहे.
बोगदा नेमका कशासाठी?
उत्तरकाशी जिल्हा मुख्यालयापासून 30 किमी अंतरावर बोगद्याचं काम सुरु आहे. केंद्र सरकारची महत्त्वकांक्षी चारधाम ऑल वेदर सडक सिल्कियारा ही योजना सुरु आहे. या प्रकल्पामुळे कोणत्याही ऋतुमध्ये, कोणत्याही वातावरणात रस्ते वाहतूक करता येणार आहे. ब्रह्मखाल-यमुनोत्री राष्ट्रीय राज्यमार्गावरील या बोगद्याचं काम सुरु आहे. हा बोगदा 4.5 किमी लांब आहे.
रेस्क्यू ऑपरेशनसाठी यंत्रणा एकवटल्या
कामगारांच्या सुटकेसाठी देशभरातील विविध यंत्रणा उत्तराखंडमध्ये एकवटल्या. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स (NDRF), उत्तराखंड स्टेट डिझास्टर रिस्पॉन्स फोर्स, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO), नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (NHIDCL), जे प्रकल्प बांधत आहेत आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस (ITBP-Indo Tibetan Border Police) यासह विविध एजन्सी बचाव कार्यात सहभागी आहेत.
VIDEO : उत्तराखंडमधील रेस्क्यू ऑपरेशन
#WATCH | Uttarkashi tunnel rescue | Union Minister General VK Singh (Retd), former advisor of PMO Bhaskar Khulbe and former Engineer-In-Chief and BRO DG Lieutenant General Harpal Singh (Retd) come out of the Silkyara tunnel.
— ANI (@ANI) November 28, 2023
Uttarakhand CM Pushkar Singh Dhami tweeted that the… pic.twitter.com/PonzSJanwK
संबंधित बातम्या
Uttarkashi Laboure Rescue : उत्तरकाशीतील बोगद्यातून कामगारांची सुटका कधी होणार ?
Tunnel Accident: मशिन्सही ठरल्या निरुपयोगी, आता मजुरांचा जीव वाचवण्यासाठी रॅट मायनिंगचा होणार वापर